एक्स्प्लोर
ZP Election : राज्यातील सहा जिल्हा परिषदांचे निकाल जाहीर, महाविकासआघाडीची सरशी
राज्यातील नागपूर, वाशिम, अकोला, धुळे, नंदुरबार आणि पालघर या जिल्हा परिषदांसाठी काल मतदान पार पडलं.
मुंबई : विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातल्या 6 जिल्हा परिषदांच्या निवडणुकीचा आज निकाल लागणार आहे. नागपूर, वाशिम, अकोला, धुळे, नंदुरबार आणि पालघर या जिल्हा परिषदांसाठी काल मतदान पार पडलं. त्यामुळे विदर्भात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह अनेक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. तर उत्तर महाराष्ट्रात गिरीश महाजन, के सी पाडवी यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
पालघर : पालघर जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत येणाऱ्या आठ पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची आज मतमोजणी पार पडली असून या निवडणुकीत शिवसेनेच वर्चस्व पाहायला मिळालं . ही निवडणूक जिल्हा परिषदेच्या 57 तर आठ पंचायत समित्यांच्या 114 जागांसाठी झाली होती . मात्र जिल्हा परिषदेच्या 57 जागांपैकी शिवसेनेला सर्वाधिक जागा मिळवण्यात यश आलं आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत 57 पैकी शिवसेना 18, राष्ट्रवादी काँग्रेस 15, भाजप 10, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष 6 , बहुजन विकास आघाडी 4 , अपक्ष 3, तर काँग्रेस ला अवघ्या एका जागेवर समाधान मानावं लागलं आहे.
एकूण जागा : 57
शिवसेना : 18
माकपा: 06
भाजप : 10
राष्ट्रवादी : 15
बविआ: 04
मनसे:0
अपक्ष : 03
काँग्रेस : 01
धुळे : धुळे जिल्हा परिषदेवर प्रथमच भाजपची एक हाती सत्ता आली आहे. दोन पंचायत समित्या देखील भाजपच्या ताब्यात आल्या आहेत. धुळे जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपने सर्वाधिक 39 जागा जिंकून धुळे जिल्हा परिषदेवर प्रथमच निर्विवाद वर्चस्व मिळवलं आहे . धुळे जिल्ह्यातील चार पैकी दोन पंचायत समितीवर (शिरपूर, शिंदखेडा पंचायत समिती) भाजपचाच झेंडा फडकला आहे.
एकूण जागा : 56
भाजप - 39
शिवसेना - 04
काँग्रेस - 07
राष्ट्रवादी - 03
अपक्ष -03
नंदुरबार : नंदुरबार जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून कोणत्याही राजकीय पक्षाला या निवडणुकीत स्पष्ट बहुमत न मिळाल्याने त्रिशंकू अवस्था निर्माण झाली आहे. शिवसेना ज्या राजकीय पक्षांसोबत जाईल त्या पक्षाची सत्ता जिल्हा परिषदेत सत्ता राहणार आहे. राज्याचे आदिवासी विकास मंत्री के सी पाडवी यांच्या पत्नी हेमलताताई पाडवी यांचा तोरणमाळ गटातून निसटता पराभव झाला आहे. नंदुरबार जिल्हा परिषदेच्या 56 गटांसाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसला 23 जागांवर विजय मिळवता आला आहे. तर भाजपही 23 जागांवर विजयी झाली आहे सेनेला सात जागा मिळाल्या आहेत राष्ट्रवादी तीन जागांवर विजयी झाले आहे.
एकूण जागा : 56
काँग्रेस - 23
भाजपा- 23
शिवसेना-0 7
राष्ट्रवादी-03
वाशिम : वाशिम जिल्हा परिषदेचे सर्व निकाल जाहीर झाले असून इथे कुणालाही स्पष्ट बहुमत मिळालं नाहीय. एकूण 52 जागांपैकी सर्वाधिक 12 जागांवर राष्ट्रवादीचा विजय झालाय. तर काँग्रेस 9, शिवसेना 6 तर भाजपने 7 जागांवर बाजी मारलीय. त्यामुळे येथेही महाविकास आघाडी एकत्र येण्याची शक्यता आहे.
एकूण जागा -52
भाजपा - 07
काँग्रेस - 09
शिवसेना - 06
राष्ट्रवादी - 12
वंचित - 08
जनविकास आघाडी - 06
अपक्ष- 03
स्वाभिमानी- 01
अकोला : अकोला जिल्हा परिषदेचे सर्व निकाल जाहीर झाले असून इथे कुणालाही स्पष्ट बहुमत मिळालं नाही. एकूण 53 जागांपैकी 23 जागांवर भारिपचा विजय झाला आहे. तर भाजप 7, शिवसेना 11, राष्ट्रवादी काँग्रेस 3 आणि काँग्रेसला ५ जागांवर समाधान मानावे लागले आहे.
एकूण जागा : 53
शिवसेना - 11
भारिप -23
भाजप - 07
राष्ट्रवादी - 03
काँग्रेस - 05
अपक्ष - 04
नागपूर : जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वात धक्कादायक निकाल नागपुरात लागलाय. सत्ताधारी भाजपच्या हातून सत्तार खेचून आणण्यात काँग्रेसला यश मिळाल आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. तर भाजप दोन नंबरवर आहे. त्यामुळं भाजपला सत्तेपासून रोखण्यात काँग्रेसला यश मिळालंय.राज्यातील नव्या समीकरणानुसार नागपुरात महाविकास आघाडीची सत्ता येणार हे आता स्पष्ट झालं आहे. या निकालामुळं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मोठा धक्का मानला जातं आहे. तर मंत्री सुनील केदार यांच्या सावनेर विधानसभा क्षेत्रातील सर्व जागांवर काँग्रेस उमेदवार विजयी झाले आहेत.
एकूण जागा : 58
जाहीर निकाल : 49
काँग्रेस- 25
भाजप- 15
राष्ट्रवादी काँग्रेस-06
शिवसेना- 01
अपक्ष-01
शेकाप-01
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement