(Source: ECI/ABP News/ABP Majha)
भाजीपाल्याच्या ट्रकमध्ये चक्क गुटखा वाहतूक, अपघातामुळे गुटखा तस्करी उघड
कोरोनाच्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन सुरु आहे. लॉकडाऊनच्या काळात जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी शासनाने जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या वाहनांना परवानगी दिली आहे.
मुंबई : सध्या संपूर्ण देश लॉक डाऊन असून सर्व राज्य आणि जिल्ह्यांच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत. मात्र मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मनोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वरई सातीवली येथे एक अत्यावश्यक सेवा लिहिलेला ट्रक पलटी झाला आणि भाजीपाल्याच्या ट्रक मध्ये चक्क गुटखा भरलेला होता. खरोखर देश लॉकडाऊन आहे का हा मोठा प्रश्न उपस्थित झाला.
कोरोनाच्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन सुरु आहे. लॉकडाऊनच्या काळात जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी शासनाने जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या वाहनांना परवानगी दिली आहे. मात्र त्याचा गैरफायदा घेत असल्याचे दिसत असून मोठ्या प्रमाणावर गुटख्याची तस्करी होत आहे. गुजरातहून मुंबईत रोज मोठ्या प्रमाणावर जीवनावश्यक वस्तू घेऊन जाणारी वाहने जात आहेत. अशाच भाजीपाला घेऊन जाणाऱ्या ट्रक पालघरमधील सातीवली येथे चालकचा ताबा सुटल्याने अपघात होऊन पलटी झाला. या पलटी झालेल्या ट्रकमध्ये भाजीपाल्यात लपवून मोठ्या प्रमाणावर गुटखा चालविला होता. या संदर्भात पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून सुमारे 15 लाख रुपये किंमतीचा गुटखा आणि 20 लाख रुपये किंमतीचा ट्रक असा एकूण 35 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला असून संबंधित गाडीचे मालक आणि चालकावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दरम्यान अपघातानंतर चालक पसार झाला आहे.
या ट्रकला दिल्ली सरकारचा अत्यावश्यक सेवेचा पास असल्याने मोठे संशयाचे वातावरण असून हा ट्रक पलटी झाल्याने पोलिसांच्या हाती लागला. मात्र संपूर्ण राष्ट्रीय महामार्ग पास करून मनोर पोलीस ठाण्याच्या हद्दी पर्यंत हा ट्रक पोचला कसा? याचा तपास सुरू आहे. आताच्या वेळी मनोर पोलिसांनी हा ट्रक गुटख्यासह जप्त केला असून कोविड 19 च्या आप्पाती व्यवस्थापन अंतर्गत येणाऱ्या सर्व कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे,अधिक तपास मनोर पोलीस करत आहेत.
#LockdownHelp | रोटरी क्लब ऑफ वर्सोवा आणि बॉम्बेकडून दररोज 30 हजार गरजूंना जेवणाची मदत, पीपीई किट, मास्क आणि सॅनिटायझरचंही वाटप
संबधित बातम्या :