माढ्यात दोन गटात जोरदार हाणामारी, भाजप जिल्हा परिषद सदस्याच्या पतीसह चौघांवर गुन्हा दाखल
आज रंगपंचमी आणि महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर माढा तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन गटात झालेल्या जीव घेण्या हाणामारीत 10 जण गंभीर जखमी झाले आहेत.
Solapur Crime News : आज रंगपंचमी आणि महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर माढा तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन गटात झालेल्या जीव घेण्या हाणामारीत 10 जण गंभीर जखमी झाले आहेत. चिंचोली गावाजवळ सिना-माढा उपसा सिंचन योजनेच्या कॅनलवर दोन गटांमध्ये झालेल्या वादाचे रूपांतर जबर मारहाणीत झालं आहे. भाजपच्या जिल्हा परिषद सदस्य माधुरी मोरे यांचे पती मुन्ना मोरे यांच्यासह बावी गावातील चौघांवर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिना-माढा उपसा सिंचन योजनेच्या कॅनलवरून दोन गटांमध्ये वाद
माढा तालुक्यातील चिंचोली परिसरात ही घटना घडली आहे. सिना-माढा उपसा सिंचन योजनेच्या कॅनलवरून दोन गटांमध्ये आधी शाब्दिक वाद झाला आहे. मात्र काही वेळातच या वादाचे रुपांतर मोठ्या हाणामारीत झाले आहे. काठी-लाथाबुक्क्यांनी झालेल्या या मारहाणीत महिलांसह सुमारे दहा जण जखमी झाले आहेत. या प्रकरणी माढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपच्या जिल्हा परिषद सदस्य माधुरी मोरे यांचे पती मुन्ना मोरे यांच्यासह बावी गावातील चौघांवर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसऱ्या गटाकडूनही परस्पर विरोधी तक्रार दाखल करण्यात आली आहे.
Before You Go
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
महत्त्वाच्या बातम्या





















