(Source: Poll of Polls)
ED: राज्यभरात ईडीची मोठी कारवाई; जळगाव, मुंबई, ठाणे, सिल्लोड, कच्छमधील 315 कोटींच्या 70 मालमत्ता जप्त
जळगाव, मुंबई, ठाणे, सिल्लोड आणि कच्छमधील 70 स्थावर मालमत्ता आणि जंगम मालमत्ता तात्पुरत्या स्वरुपात जप्त केल्या आहेत.
मुंबई : राज्यभरात ईडीने (ED) मोठी कारवाई केली आहे. ईडीने केलेल्या कारवाईत 70 मालमत्ता जप्त करण्यात आल्या असून मालमत्तांची किंमत अंदाजे 315 कोटी आहे. राजमल लखीचंद ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड, आर एल गोल्ड प्रायव्हेट लिमिटेड व मनराज ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि इतर बँक फसवणूक प्रकरणात ही जप्ती करण्यात आली आहे. त्यामुळे खळबळ माजली आहे.
ईडीने जळगाव, मुंबई, ठाणे, सिल्लोड आणि कच्छमधील 70 स्थावर मालमत्ता आणि जंगम मालमत्ता तात्पुरत्या स्वरुपात जप्त केल्या आहेत. 13 ऑक्टोबर 2023 रोजी पीएमएलए, 2002 अंतर्गत ही कारवाई करण्यात आलेली आहे.
ED has provisionally attached 70 immovable assets located in Jalgaon, Mumbai, Thane, Sillod and Kutch among other areas and movable assets, all valued at Rs.315.60 Crore in bank fraud case of M/s Rajmal Lakhichand Jewelers Pvt. Ltd., M/s R L Gold Pvt. Ltd., and M/s Manraj… pic.twitter.com/XrLHcC4LR2
— ED (@dir_ed) October 15, 2023
राजमल लखीचंद ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड, आरएल गोल्ड व मनराज ज्वेलर्स आणि त्यांचे प्रवर्तक ईश्वरलाल शंकरलाल जैन लालवानी, मनीष ईश्वरलाल जैन लालवानी आणि आहे. इतरांनी मिळवलेल्या बेनामी मालमत्तांचा समावेश आहे. ED ने जळगाव, नाशिक आणि ठाणे (महाराष्ट्र) येथील राजमल लखीचंद समूहाच्या 13 ठिकाणी छापे टाकले. या छापेमारीत गुन्हेगारी कागदपत्रांसह सोने, चांदी आणि हिऱ्यांचे दागिने/सराफा आणि भारतीय चलन जप्त करण्यात आले.
1.11 कोटी रुपयांची रक्कम जप्त
ईडीने केलेल्या कारवाईत राजमल लखीचंद ग्रुपच्या 60 मालमत्तेचा तपशील हाती लागला आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीने जळगाव, नाशिक आणि ठाण्यात 13 ठिकाणी शोधमोहीम राबवली. अंमलबजावणी संचालनालयाने गेल्या तीन दिवसात मनी लाँड्रिंग प्रकरणात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय ईश्वरलाल जैन आणि त्याचा साथीदारांच्या जवळपास 13 ठिकाणांची झडती घेतली. ईडीने गेल्या तीन दिवसांत टाकलेल्या छाप्यांमध्ये 24.7 कोटी रुपयांचे 39.33 किलो सोने आणि हिऱ्यांचे दागिने आणि 1.11 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे. त्याशिवाय, ईडीला काही महत्त्वाच्या गोष्टी आढळून आल्या आहेत.
हे ही वाचा :