एक्स्प्लोर
Coronavirus | हस्तांदोलन करु नका, रामराम ठोका; अजित पवारांचा सल्ला
कोरोना व्हायरस आता भारतातही वेगाने पसरताना दिसत आहे. यावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही सल्ला दिला आहे.
बारामती : कोरोना व्हायरससंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार चांगलेच जागृत आहेत. इंदापुरातील आपल्या भाषणात त्यांनी कार्यकर्त्यांनाही मोलाचा सल्ला दिलाय. सध्या देशात कोरोनाचं संकट आहे, त्यामुळे हस्तांदोलन करु नका, तर रामराम ठोका, असा सल्ला त्यांनी कार्यकर्त्यांना दिलाय. यासाठी त्यांनी त्यांच्या एका मित्राचंही उदाहरण दिलं. मला भेटायला माझा मित्र बाळू झगडे आला होता. मात्र, मी त्याच्याशी हस्तांदोलन केलं नाही. मी उपमुख्यमंत्री आहे म्हणून नाही, तर सध्या कोरोनाचं संकट आहे. त्यामुळं तू काही नाराज होऊ नकोस, असं सांगतानाच आपण लहानपणी काय केलं हे पत्रकारांना सांगू नकोस, असंही अजित पवार सांगायला विसरले नाहीत.
डॉ. रमेश भोईटे यांनी आयोजित केलेल्या कॅन्सर तपासणी शिबिराचं उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते झालं. यावेळी बोलताना आर.आर. पाटील यांची पुन्हा एकदा आज आठवण निघाली. बारामतीत कॅन्सरचे हॉस्पिटल उभारण्याचा पुनरुच्चार करतानाच `कोरोना`वरून घाबरू नका, असे आवाहन पवार यांनी केले. आर.आर. ब्रीच कॅण्डीमध्ये दाखल झाले. डॉक्टरांनी आर.आर. यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर साहेबांना याची माहिती दिली. मी देखील आर.आर. यांना भेटलो, तेव्हा आर. आर. यांनी हातात हात घेतला व दादा, तुमचे दहा वर्षांपूर्वी ऐकले असते, तर ही अवस्था झाली नसती असे म्हटले. अवघ्या 15 दिवसांत आर.आर. हे जग सोडून गेले हे सांगताना अजित पवार काहीसे भावनिक झाले.
पवारसाहेबांनी त्या डॉक्टरांना अगोदर तुम्हाला पोचवेन, नंतर मी जाईन असं सांगतिलं.
त्याचवेळी त्यांनी शरद पवार यांनी कॅन्सरशी दिलेल्या लढ्याचं उदाहरणंही उपस्थितांना दिलं. 2004 च्या निवडणुकीवेळी तुमचे सरसेनापती नाहीत, आता तुम्हालाच प्रचार करायचाय असं पवारसाहेबांनी सांगितल्यानंतर आमच्या डोळ्यात पाणी आलं. पवारसाहेबांनी तातडीने शस्त्रक्रिया केली. तेथे डॉक्टर त्यांना वेगळे काही सांगत होते. मात्र, पवारसाहेबांनी त्या डॉक्टरांना अगोदर तुम्हाला पोचवेन, नंतर मी जाईन असे सांगतिले होते. तेव्हापासून साहेब वेळोवेळी काळजी घेतात. सांगण्याचं तात्पर्य हेच की, इच्छाशक्ती फार महत्वाची, आजार झाला म्हणून घाबरून जाऊ नका, असं आवाहनही अजित पवार यांनी यावेळी केलं.
एबीपी माझा इम्पॅक्ट | परदेशात वापरलेले मास्क विक्रीसाठी आणण्याचा घाट, बातमी दाखवल्यानंतर मास्क फेकले
बारामतीत आज विविध कार्यक्रमांना अजित पवार यांनी हजेरी लावली. येथील जोगेश्वरी पार्कच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना अजित पवार यांनी या विकासकांना भरपूर सावली देणारी झाडे लावण्याचा सल्ला दिला. अशोकाची झाडे सावली देत नाहीत, त्यामुळे बारामतीच्या वातावरणात टिकतील आणि भरपूर सावली देतील अशी झाडे लावण्याचा सल्ला देतानाच अजित पवार यांना अशोकाच्या झाडावरून केलेल्या 'त्या' वक्तव्याची आठवण झाली.
अशोकाचं झाड बघा ते फक्त स्वतःपुरतंच सावली देतं
अजित पवार म्हणाले, असं काम करा की, आपल्या सावलीचा आजूबाजूला फायदा झाला पाहिजे. अशोकाचं झाड बघा. ते फक्त स्वतःपुरतंच सावली देतं. अशोकावरून आठवलं, मी एका कार्यक्रमात होतो. तिथे तेव्हाचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण उपस्थित होतो. मी सांगत होतो, अशोकाची झाडं लावू नका. स्वतःपुरतीच ती सावली घेतात. आणि तेवढ्यात अशोकरावांकडे लक्ष गेले, मी ओशाळलो, म्हणालो,`सॉरी हो माझ्या मनात काही नव्हतं. मी चांगल्या भावनेने सांगितले.` हा प्रसंग घडला. मात्र, तुम्ही कधी अशोकाच्या झाडाखाली सावलीत उभा राहीला का? तेव्हा बारामतीच्या हवामानात टिकतील, आपल्या पशुपक्ष्यांना आकर्षित करतील अशी झाडे लावा.
Coronavirus | केरळमध्ये पाच आणि तामिळनाडूत एकाला कोरोनाची लागण, कोरोनाग्रस्तांची संख्या 40 वर
जनतेचा पैसा आहे, कामे झटपट झाली पाहिजेत
रस्ते महामार्गाच्या कामानिमित्त केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत बैठक झाली. दत्तात्रेय भरणे, अशोक चव्हाण, मी या बैठकीस होतो. गडकरीसाहेब मला म्हणाले की, अजित तुच दर महिन्याला बैठक घे. हायवेच्या कामात मोठी आडकाठी येत असून ज्या तालुक्यात कामे सुरू आहेत, तेथील आमदार, खासदार इथे एवढ्या कोटींचे काम सुरूय, मग आमच्याकडे कोण लक्ष देणार? असे विचारताहेत, त्यामुळे कंत्राटदार वैतागलेत. नितीन गडकरींनी आता सांगितलेय की, मी ही माहिती सीबीआयलाच देणार आहे. खरेतर हा जनतेचा पैसा आहे. कामे झटपट झाली पाहिजेत. तुम्ही निवडून दिलेले आमदार, खासदार हे ज्या पद्दतीने कामे करतात व त्यावरती विकासाची कामे अवलंबून असतात.
Gold rate rise | कोरोनामुळे सोन्याच्या दरात मोठी वाढ, प्रतितोळा 44 हजार 380 | ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement