Coronavirus | केरळमध्ये पाच आणि तामिळनाडूत एकाला कोरोनाची लागण, कोरोनाग्रस्तांची संख्या 40 वर
केरळमध्ये कोरोनाचे आणखी पाच रुग्ण आढळले आहेत. एकाच कुटुंबातील पाच जणांना कोरोनोची लागण झाल्याची माहिती केरळच्या आरोग्यमंत्री के. के. शैलजा यांनी दिली. तर तामिळनाडूतही कोरोनाचा एक रुग्ण आढळला आहे.
तिरुवनंतपुरम : भारतात कोरोना व्हायरस दिवसेंदिवस आणखी पाय पसरत चालला आहे. कारण केरळमध्ये कोरोनाचे आणखी पाच आणि तामिळनाडूमध्ये एक कोरोनाग्रस्त रुग्ण आढळला आहे. केरळमधील एकाच कुटुंबातील तीन जणांसह पाच जणांना कोरोनोची लागण झाल्याची माहिती केरळच्या आरोग्यमंत्री के. के. शैलजा यांनी दिली आहे. या पाच जणांमुळे भारतातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 40 वर पोहोचली आहे.
कोरोनाची लागण झालेल्या या कुटुंबातील तीन जण नुकतेच इटलीहून भारतात परतले होते. इटलीहून परतल्यानंतर त्यांना आपल्या काही नातेवाईकांची भेट घेतली. त्यामुळे या तिघांच्या संपर्कात आल्याने आणखी दोघांना कोरोनाची लागण झाली. त्यामुळे कोरोनोबाधित रुग्णांची संख्या पाचवर पोहोचली आहे. या पाच जणांमध्ये एका लहान मुलाचाही समावेश आहे. या सर्वांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
Kerala Health Minister KK Shailaja: 5 more #Coronavirus cases have been reported in Pathanamthitta. We are tracing their contact history. They are under medical treatment. People coming from other countries should show responsibility&get a medical checkup done as they reach India pic.twitter.com/sigTOXcwuU
— ANI (@ANI) March 8, 2020
Coronavirus | कोरोनापासून बचावासाठी भारतीय उपाय, इस्राईलच्या पंतप्रधानांचा 'हा' सल्ला
तामिळनाडूचे आरोग्य सचिव बीला राजेश यांनी दिलेल्या माहितीनुसार, 28 फेब्रुवारील एक व्यक्ती मस्कटहून परतला होता. त्याला 4 मार्चला ताप आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांची तपासणी केली असता त्याला कोरोना व्हायरस झाल्याचं समोर आलं.
Tamil Nadu Health Secretary Beela Rajesh: A person has been identified positive with #Coronavirus and is under surveillance here at a hospital. We are tracing contact history. Further, we are screening every person coming from outside. pic.twitter.com/wY87FwAdEh
— ANI (@ANI) March 8, 2020
Corona Virus | कसं रोखायचं कोरोनाच्या आक्रमणाला? पद्मश्री डॉ. रमण गंगाखेडकर यांची मुलाखत
संबंधित बातम्या :
- नाशिकमध्ये कोरोनाचा संशयित रुग्ण आढळल्याने खळबळ, मात्र संशयिताचे रिपोर्ट निगेटिव्ह
- #CoronaVirus देशात कोरोना व्हायरसचे दोन पॉझिटिव्ह रुग्ण, आरोग्य मंत्रालयाची माहिती
- Corona Virus | कोरोनाग्रस्त चीनमधून 119 भारतीयांना घेऊन विमान परतलं, मित्र देशाच्या 5 नागरिकांचाही समावेश
- उत्तर कोरियात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला, किम जोंग यांचे गोळ्या घालण्याचे आदेश