एक्स्प्लोर

अपणा अजेंडा क्लियर है, भाजप को दबाना है! शिंदेसेनेत प्रवेश करण्याआधीच उन्मेष पाटलांची क्लीप व्हायरल, भाजप आमदाराच आक्षेप

उन्मेष पाटील यांची एक क्लिप सध्या जोरदार व्हायरल झाली आहे. या क्लीपवर भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी आक्षेप घेतला आहे

Mangesh Chavan on Unmesh Patil :  जळगाव जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणात  शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महत्त्वाचे नेते आणि माजी खासदार उन्मेष पाटील यांनी मशाल सोडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय. येत्या शुक्रवारी, 6 मार्च रोजी मुंबईत आपल्या शेकडो समर्थकांसह ते अधिकृतपणे शिंदेसेनेत प्रवेश करणार आहेत. मात्र, त्यापूर्वी उन्मेष पाटील यांची एक क्लिप सध्या जोरदार व्हायरल झाली आहे. या क्लीपवर भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी आक्षेप घेतला आहे. याबबात आमच्या वरिष्ठांकडे तक्रार करणार असल्याचे चव्हाण म्हणाले. 

नेमकं प्रकरण काय?

भाजपमधून ठाकरेंच्या शिवसेनेत दाखल झालेले आणि खासदारकीची निवडणूक लढवलेले उन्मेष  पाटील हे आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत उद्या प्रवेश करणार आहेत. मात्र त्यांची एक क्लिप सध्या व्हायरल होत आहे. अपणा अजेंडा क्लियर है भाजप को दबाना है, अशा आशयाची उन्मेष  पाटील यांची क्लीप आहे. यावर भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी आक्षेप घेतला आहे. एकनाथ शिंदेंनी कोणाला प्रवेश द्यावा हा त्यांचा विषय आहे. मात्र, आपणा अजेंडा  क्लियर है भाजप को दबाना है हे नेमकं काय? असा सवाल मंगेश चव्हाण यांनी केला आहे. आम्ही यासंदर्भात आमच्या वरिष्ठांकडे तक्रार करणार आहोत असं मंगश चव्हाण यांनी सांगितलं आहे. 

2024 च्या लोकसभेला भाजपकडून तिकीट नाकारल्यामुळे उन्मेष पाटलांचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश

शिवसेनेत उभी फूट पडल्यापासून अनेक नेते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झाले. अनेक आमदार, विविध जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्षांनी तीन वर्षांपूर्वी शिंदे सेनेत प्रवेश केला. तर आता कोणत्याही निवडणुका नसतानाही इतर काही कारणांमुळे उन्मेष पाटील हे शिंदेच्या शिवसेनेतदाखल होत आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या बँकेकडून उन्मेष पाटील यांच्या मालमत्तेची जप्तीची कारवाई सुरू होताच त्यांनी शिंदे सेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. त्यामुळं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पाटील यांनी 2024 च्या लोकसभेला भाजपकडून तिकीट नाकारल्यामुळे शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला होता. ठाकरेंच्या शिवसेनेकडून 2024 ला चाळीसगाव विधानसभा देखील लढवली होती, मात्र त्यांचा पराभव झाला होता. आता त्यांच्या या पक्ष सोहळ्याने चाळीसगावसह जळगावच्या राजकारणात शिंदे सेनेत गट तट तयार होतील की शिवसेना अधिक मजबूत होईल ही चर्चा होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उन्मेष पाटील यांनी गेल्या महिन्यात श्रीकांत शिंदे यांची भेट घेत प्राथमिक चर्चा केली होती. 2019 मध्ये भाजपच्या तिकिटावर लोकसभेत निवडून आलेल्या पाटील यांना 2024 मध्ये उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र, विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर त्यांची सक्रियता कमी झाली होती. आता त्यांच्या शिंदेसेनेतील प्रवेशामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे पुन्हा एकदा बदलण्याची चिन्हे आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra live blog updates: अकोल्यात वेगवान राजकीय घडामोडी, एकनाथ शिंदेंचा खास माणूस अभय पाटील यांच्या भेटीला
Maharashtra live blog updates: अकोल्यात वेगवान राजकीय घडामोडी, एकनाथ शिंदेंचा खास माणूस अभय पाटील यांच्या भेटीला
Akola Abhay Patil and Shinde Camp: एकनाथ शिंदेंचा खास माणूस रात्री अकोल्यात पोहोचला, अभय पाटलांसोबत दोन तास गुप्त खलबतं, महत्त्वाच्या घडामोडींचे संकेत
एकनाथ शिंदेंचा खास माणूस रात्री अकोल्यात पोहोचला, अभय पाटलांसोबत दोन तास गुप्त खलबतं, महत्त्वाच्या घडामोडींचे संकेत
Praniti Shinde: सोनिया गांधींनंतर आता प्रणिती शिंदेंच्या कार्यक्रमात ‘वंदे मातरम्’वरून नवी चर्चा, संपूर्ण वंदे मातरम् न म्हटल्याने वादाला तोंड फुटण्याची शक्यता
सोनिया गांधींनंतर आता प्रणिती शिंदेंच्या कार्यक्रमात ‘वंदे मातरम्’वरून नवी चर्चा, संपूर्ण वंदे मातरम् न म्हटल्याने वादाला तोंड फुटण्याची शक्यता
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया

व्हिडीओ

Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Maharashtra live blog updates: अकोल्यात वेगवान राजकीय घडामोडी, एकनाथ शिंदेंचा खास माणूस अभय पाटील यांच्या भेटीला
Maharashtra live blog updates: अकोल्यात वेगवान राजकीय घडामोडी, एकनाथ शिंदेंचा खास माणूस अभय पाटील यांच्या भेटीला
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
Akola Abhay Patil and Shinde Camp: एकनाथ शिंदेंचा खास माणूस रात्री अकोल्यात पोहोचला, अभय पाटलांसोबत दोन तास गुप्त खलबतं, महत्त्वाच्या घडामोडींचे संकेत
एकनाथ शिंदेंचा खास माणूस रात्री अकोल्यात पोहोचला, अभय पाटलांसोबत दोन तास गुप्त खलबतं, महत्त्वाच्या घडामोडींचे संकेत
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
Embed widget