एक्स्प्लोर
Advertisement
एबीपी माझा इम्पॅक्ट | परदेशात वापरलेले मास्क विक्रीसाठी आणण्याचा घाट, बातमी दाखवल्यानंतर मास्क फेकले
जगभर कोरोना व्हायरसने थैमान घातले असताना भारतात त्याचा शिरकाव झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग दक्षता घेत आहे. नागरिक सुध्दा स्वतःच्या आरोग्याची काळजी घेत आहेत. मात्र भिवंडीत पारदर्शी वापरलेल्या मास्कच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न होत आहे.
भिवंडी : सध्या जगभर कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. भारतात त्याचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणावर तोंडाला लावण्याच्या मास्कची मागणी वाढली आहे. त्या पार्श्वभूमीवर भिवंडी तालुक्यातील गोदाम पट्ट्यात मोठ्या प्रमाणावर परदेशातून भंगार येत असून त्यामध्ये परदेशात वापरलेले मास्क सुध्दा मोठ्या प्रमाणावर आहेत. सध्या बाजारात मास्कचा तुटवडा असल्याने परदेशातून वापरलेले मास्क येथील गोदामात धुवून पुन्हा विक्रीसाठी आणण्याचा घाट होता. मात्र या मास्कचा एक व्हिडीओ शनिवारी रात्री व्हायरल झाला. त्याबाबत एबीपी माझाने बातमी दाखवल्यानंतर पोलीस आणि आरोग्य विभाग यंत्रणा खडबडून जागी झाली. त्यानंतर हे मास्क कचरा टाकण्याच्या जागेत टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान या व्हायरल व्हिडीओचा तपास ग्रामीण भागात करत असताना स्थानिक नागरीकांनी सदरचे गोदाम हे वळ ग्रामपंचायत हद्दीतील पारसनाथ कंपाऊंड मधील इमारतीमध्ये असल्याचे सांगितले. परंतु त्या ठिकाणी रात्री कोणी नसल्याने सकाळी पुन्हा त्या ठिकाणी पाहणी करण्यासाठी स्थानिक पंचायत समिती सदस्य विकास भोईर ग्रामस्थांसह बी - 108 या गोदामात गेले असता तिथल कामगाराने मास्कचा माल पुर्णा ग्रामपंचायत हद्दीत मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईन शेजारील कचरा टाकण्याच्या जागेत टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.
एबीपी माझा इम्पॅक्ट | एन 95 मास्कचा काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई होणार
पाईपलाईन शेजारी वापरलेल्या मास्कचा भंगार माल फेकून दिल्याची माहिती पंचायत समिती, तहसीलदार कार्यालय , स्थानिक नारपोली पोलीस ठाणे , जिल्हा आरोग्य अधिकारी यांना कळवल्यावर सर्व यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या आणि त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
दरम्यान या मुद्देमलावर कारवाई करायची कुणी? या बाबत बरीच खलबते झाल्यावर जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी याबाबत घटनास्थळी पंचनामा करून नारपोली पोलिसांकडे तक्रार दिली आहे. सदरचा मुद्देमाल नष्ट करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांना आदेश दिले आहेत.
ठाणे जिल्ह्यात कोरोना व्हायरसचा अजूनही शिरकाव झाला नसला तरी खबरदारी म्हणून आरोग्य विभाग दक्ष आहे. नागरिकांनी घाबरून न जाता मास्क विकत घेताना ते नवे असल्याची खात्री करावी. तसेच हातरुमाल सुध्दा मास्कचे काम करू शकतात, असा सल्ला देखील दिला आहे.
#CoronaMask Sting operation 30₹चा कोरोनाचा N95 मास्क 400रुपयांना? मास्कचा काळा बाजार कोण करतंय?
संबंधित बातम्या :
Coronavirus | देशभरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या 30 वर, दिल्लीतील प्राथमिक शाळा 31 मार्चपर्यंत बंद
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement