कळवण-नाशिक मार्गावर भीषण अपघात, दोन बसची समोरासमोर जोरदार धडक, वाहतूक ठप्प
नाशिक जिल्ह्यात भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. दोन बसची समोरासमोर धडक झाली आहे. यामध्ये 8 ते 10 प्रवासी जखमी झाले आहेत.
Nashik Accident News : नाशिक जिल्ह्यात भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. दोन बसची समोरासमोर धडक झाली आहे. यामध्ये 8 ते 10 प्रवासी जखमी झाले आहेत. सुदैवाने कोणतीही जीवीतहानी झाली नाही. कळवण - नाशिक मार्गावरील अहिवंतवाडी फाट्याजवळ ही अपघाताची घटना घडली आहे. जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
नाशिकच्या कळवण-नाशिक मार्गावर अहिवंतवाडी फाट्याजवळ
नाशिकच्या कळवण-नाशिक मार्गावर अहिवंतवाडी फाट्याजवळ राज्य परिवहन महामंडळाच्या दोन एसटी बसची समोरासमोर धडक झाली आहे. या अपघातात 8 ते 10 प्रवाशी किरकोळ जखमी झाले आहेत. सुदैवाने अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही. स्थानिक नागरिकांनी मदतकार्य राबवून जखमींना वणी शासकीय ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. कळवण व जव्हार या आगाराच्या बसचा अपघात झाला.अपघातात दोन्ही बसचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अपघातामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.
बारामती-पारवडी रस्त्यावर भीषण अपघात, मायलेकीचा दुर्दैवी मृत्यू
कार चालकाच्या चुकीमुळे लातूर जिल्ह्यात अपघात, एका महिलेचा मृत्यू
लातूर जिल्ह्यातील जळकोट शहरात 3 फेब्रुवारी रोजी रात्री साडेनऊ वाजता महात्मा फुले चौकातील राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला होता. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला भरधाव स्विफ्ट कारने पाठीमागून धडक दिली. या अपघातात कारमधील एका महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर तिघेजण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी उदगीर येथे हलविण्यात आले आहे. कार चालक किरकोळ जखमी झाला.धर्माबादहून हरभरा घेऊन येणाऱ्या ट्रकचे टायर फुटल्याने तो रस्त्याच्या कडेला उभा करण्यात आला होता. नांदेडहून डोनगावकडे अंत्यविधीसाठी जाणारी कार ट्रकवर आदळल्याचे सीसीटीव्हीत दिसून आले. कार चालकाच्या चुकीमुळे अपघात झाल्याचे ट्रक चालक अक्रम शेख यांनी सांगितले. पुढील तपास सुरू आहे.
महत्त्वाच्या बातम्या




















