एक्स्प्लोर

महाराष्ट्रात MBBS च्या 970 जागा वाढल्या, देशभरात 4465 जागा वाढवण्यासाठी केंद्र सरकारची मान्यता

राज्यात डॉक्टरांची कमतरता लक्षात घेता अधिकाधिक तज्ज्ञ डॉक्टर तयार व्हावेत, हा मुख्यमंत्री आणि गिरीश महाजन पाठपुरावा करत होते. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळालं आहे.

मुंबई : केंद्र सरकारने देशभरात एमबीबीएसच्या 4465 जागा वाढवल्या असून सर्वाधिक 970 जागा महाराष्ट्रात वाढवल्या आहेत. महाराष्ट्रात खुल्या वर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (Economically Weaker Section) 10 टक्के आरक्षण लागू करण्यासाठी केंद्र सरकारने जागा वाढवण्यासाठी मान्यता दिली. राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने MBBS च्या जागा वाढवण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे प्रस्ताव सादर केला होता. मंत्रालयाने प्रस्तावाला मान्यता देत 2019-20 च्या प्रवेश प्रक्रिया आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (Economically Weaker Section) लागू करण्यात आलेल्या आरक्षणाअंतर्गत भराव्यात, असे आदेश दिले आहेत. "राज्यात वाढलेल्या एमबीबीएसच्या जागा खुल्या वर्गातील वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर ठरतील. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांच्या प्रयत्नांना यश आलं आहे. राज्य सरकारने हा प्रश्न सातत्याने दिल्लीत उपस्थित केला होता", असं राज्याचे वैद्यकीय शिक्षण आणि संचलनालयाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने म्हणाले. यंदा महाराष्ट्राला मेडिकलच्या जागा वाढवून मिळणार, तात्याराव लहानेंची माहिती विशेषतः महाराष्ट्रात एमबीबीएस अभ्यासक्रमात प्रवेशातील जागा वाढल्या पाहिजेत, यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी विशेष प्रयत्न केले होते. राज्यात डॉक्टरांची कमतरता लक्षात घेता अधिकाधिक तज्ज्ञ डॉक्टर तयार व्हावेत, हा मुख्यमंत्री आणि गिरीश महाजन पाठपुरावा करत होते. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळालं आहे. महाराष्ट्राच्या तुलनेत इतर राज्यांना जास्तीत जास्त 450 जागा वाढवून मिळाल्या आहेत. राज्यात मेडिकल कॉलेजमधील जागांची यादी बी जे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, पुणे - 50 जागा डॉ. वैश्यंपायन मेमोरियल मेडिकल कॉलेज, सोलापूर - 50 जागा डॉ. शंकरराव चव्हाण गव्हर्नमेंट कॉलेज, नांदेड - 50 जागा गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, अकोला - 50 जागा गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, औरंगाबाद - 50 seats गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, चंद्रपूर - 50 seats गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, गोंदिया - 50 seats गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, जळगाव - 50 seats गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, मिरज - 50 seats गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, नागपूर - 50 seats गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, मुंबई - 50 seats एच बी टी मेडिकल कॉलेज आणि डॉ. आर एन कुपर महापालिका रुग्णालय, जुहू, मुंबई - 50 जागा इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज आणि रुग्णालय, नागपूर - 50 जागा लोकमान्य टिळक महापालिका मेडिकल कॉलेज, सायन, मुंबई - 50 जागा राजीव गांधी मेडिकल कॉलेज आणि छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, ठाणे - 20 जागा सेठ जीएस मेडिकल कॉलेज, मुंबई - 70 जागा श्री वसंतराव नाईक गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, यवतमाळ - 50 जागा श्री भाऊसाहेब हिरे मेडिकल कॉलेज, धुळे - 50 जागा एसआरटीआर मेडिकल कॉलेज, अंबाजोगाई - 50 जागा टोपीवाला नॅशलन मेडिकल कॉलेज, मुंबई - 30 जागा

महत्त्वाच्या बातम्या

Amravti hospital fire new born baby death: मोठी बातमी: अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिशु कक्षात भीषण आग, तीन बालकांचा होरपळून मृत्यू
मोठी बातमी: अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिशु कक्षात भीषण आग, तीन बालकांचा होरपळून मृत्यू
Sambhajinagar News: तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
महाराष्ट्रात पावसाचा यू-टर्न! पुढील दोन दिवस महत्वाचे, 'या' भागात मुसळधार पावसाचा इशारा, पंजाबराव डखांचा अंदाज
महाराष्ट्रात पावसाचा यू-टर्न! पुढील दोन दिवस महत्वाचे, 'या' भागात मुसळधार पावसाचा इशारा, पंजाबराव डखांचा अंदाज
Chhatrapati Sambhajinagar News: हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर

व्हिडीओ

Solpaur Drought Marriage Special Report : 350 तरुणांची लग्न पाण्याखाली रखडली? ABP Majha
Bhuleshwarcha Raja Special Report : भुलेश्वरच्या दुर्घटनेचं कारण काय? मुंबईतील गणेश मंडळं सावध
Gen Z Special Report : नेत्यांची व्होट बँक जेन झी, राजकीय नेत्यांकडून मेळावे : ABP Majha
Ravindra Sathe Majha Katta : आम्ही ठाकर, ठाकरss अजरामर गाण्याचा जादुई आवाज, रवींद्र साठेंसोबत गप्पा
Rahul Gandhi Pune: तरुणीने कडक मराठी शब्दात सरकारला झापलं; राहुल गांधीही बघत बसले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : विदेशी गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, ऑगस्टमध्ये भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले, जाणून घ्या सविस्तर 
जुलैचा ट्रेंड ऑगस्टमध्ये कायम ठेवला, FPI नं भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले,तज्ज्ञ म्हणतात... 
Sambhajinagar News: तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
Amravti hospital fire new born baby death: मोठी बातमी: अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिशु कक्षात भीषण आग, तीन बालकांचा होरपळून मृत्यू
मोठी बातमी: अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिशु कक्षात भीषण आग, तीन बालकांचा होरपळून मृत्यू
Chhatrapati Sambhajinagar News: हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
Embed widget