एक्स्प्लोर
विविध मागण्यांसाठी ब्राह्मण समाजाचं आझाद मैदानात आंदोलन
ब्राह्मण आर्थिक विकास महामंडळ,आरक्षण, विद्यार्थ्यांना वसतिगृह अशा अशा अनेक मागण्या ब्राह्मण समाजाच्या आहेत. आझाद मैदानात ब्राह्मण समाजातील लोक आपल्या मागणांसाठी धरणे आंदोलन करत आहेत.
मुंबई : ब्राह्मण समाज आपल्या विविध मागण्यांसाठी आज आझाद मैदानात दाखल झाला आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आणि देशभातून ब्राह्मण समाजातील अनेक लोक आझाद मैदानात जमले आहेत.
ब्राह्मण आर्थिक विकास महामंडळ,आरक्षण, विद्यार्थ्यांना वसतिगृह अशा विविध मागण्या ब्राह्मण समाजाच्या आहेत. आझाद मैदानात ब्राह्मण समाजातील लोक आपल्या मागणांसाठी धरणे आंदोलन करत आहेत. महाराष्ट्रतील जवळपास 40 ब्राह्मण संघटना या आंदोलनात सहभागी झाल्या आहेत.
ब्राह्मण समाजाच्या मागण्या काय आहेत?
- ब्राह्मण समाजातील आर्थिक मागास तरुणांना शैक्षणिक, व्यावसायिक आणि रुग्णाच्या मदतीसाठी आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करावी. त्यासाठी 500 कोटींची तरतूद करावी.
- ब्राह्मण समाजाला आरक्षण मिळावे.
- ब्राह्मण समाजावर आणि महापुरुषांवर होणारी जातीय चिखलफेक रोखण्यासाठी महापुरुष बदनामी विरोधी कायदा करावा.
- ब्राह्मण पुरोहितांना मासिक 500 रुपये मानधन आणि विविध मंदिरात त्यांची नित्यपूजेसाठी नियुक्ती केली जावी.
- ब्राह्मण विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह स्थापन करण्यात यावे.
- केजी ते पीजीपर्यंत शिक्षण शुल्क मोफत करावे.
- दादोजी कोंडदेव आणि राम गणेश गडकरी यांच्या पुतळ्याची सन्मानपूर्वक पुनः स्थापना करावी.
- छत्रपती शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रातील स्मारक लवकर पूर्ण करावे.
- ब्राह्मण समाजातील सेवकांना मिळालेल्या जमिनी वर्ग 2 मधून वर्ग 1 मध्ये बदल करुन त्यांचा मालकी हक्क कायम करण्यात यावा.
- पहिले पेशवे श्रीमंत बाळाजी विश्वनाथ यांच्या श्रीवर्धन येथील जन्मस्थळाचा जीर्णोद्धार आणि स्मारक करावे.
- स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा. तसेच लंडन येथे ते ज्या घरात राहिले ते भारत सरकारने विकत घेऊन तिथे त्यांचे स्मारक बनवावे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
पुणे
भारत
शेत-शिवार
Advertisement