एक्स्प्लोर
ठाणे काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण पूर्णेकरांची मृत्यूशी झुंज अपयशी
औरंगाबाद-गंगापूर रोडवरील बस आणि स्कॉर्पिओच्या भीषण अपघातात जखमी झालेले ठाणे काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण पूर्णेकरांचा उपचारादरम्यान निधन झालं आहे.

औरंगाबाद : ठाणे काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष बाळकृष्ण पूर्णेकर यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आहे. औरंगाबादेत काल रात्री उशिरा त्याचं उपचारादरम्यान निधन झालं.
दोनच दिवसांपूर्वी औरंगाबाद-गंगापूर रोडवरील भेंडाला फाटाजवळ बस-स्कॉर्पिओचा भीषण अपघात झाला होता. या अपघातात काँग्रेसचे महाराष्ट्र सचिव संजय चौपाने यांचा जागीच मृत्यू झाला. तर ठाणे काँग्रेसचे माजी अध्यक्ष बाळकृष्ण पुर्णेकर, रमाकांत म्हात्रे, बलदिप सिंह बिस्त जखमी झाले होते.
जखमींवर औरंगाबादच्या सिग्मा हॉस्पीटलमध्ये उपचार सुरु होते. काल दिवसभर डॉक्टरांनी पूर्णेकरांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, डॉक्टरांना यात अपयश आलं.
दरम्यान, सिग्मा हॉस्पीटलमध्ये रमाकांत म्हात्रे आणि बलदिप सिंह यांच्यावर उपचार सुरु असून, दोघांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येत आहे.
संबंधित बातम्या
औरंगाबाद-गंगापूर रोडवर भीषण अपघात, काँग्रेस नेते संजय चौपानेंचा जागीच मृत्यू
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
राजकारण
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
