Maharashtra Political Crisis Eknath Shinde LIVE : आपापल्या मतदारसंघांमध्ये मेळावे घेण्याचे एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांना आदेश
Maharashtra Political Crisis Eknath Shinde LIVE :सध्याच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काल शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठका झाल्या.पाहा प्रत्येक अपडेट एका क्लिकवर
LIVE

Background
आपापल्या मतदारसंघांमध्ये मेळावे घेण्याचे एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांना आदेश
शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे गटाची गुवाहाटीतील बैठक संपली असून या बैठकीत आमदारांना आपापल्या मतदारसंघांमध्ये मेळावे घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. "बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचे विचार मेळाव्यातून पुढे न्या, आपण शिवसेनेतच आहोत, आपल्याबद्दलचे गैरसमज दूर करा, सगळ्या कार्यकर्त्यांना एकसंध ठेवा, आपली जी सुरवातीपासूनची हिंदूत्व ही भूमिका आहे आणि मराठी या भूमिकेवर आपण कायम आहोत हे लोकांना सांगा, अशा सूचना आमदारांना दिल्या आहेत.
शिवसेना 16 बंडखोरांना अपात्रतेबाबत नोटीस पाठवणार, आमदारांना 48 तासात आपलं म्हणणं मांडावं लागणार
शिवसेना 16 बंडखोर आमदारांना अपात्रतेबाबत नोटीस पाठवणार आहे. यानंतर बंडखोर आमदारांना 24 तासात आपली बाजू मांडावी लागणार आहे. विधानसभा उपाध्यक्ष आणि सेना नेत्यांच्या बैठकीत याबाबत चर्चा झाली असल्याची माहिती मिळत आहे.
Maharashtra Political Crisis : महाराष्ट्रभर सभा घेणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
शिवसेना ही मर्दांची सेना आहे. शिवसेनेत गद्दार नको आहेत असे म्हणत येत्या काळात महाराष्ट्रभर सभा घेणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
मविआ सरकार पडणार नाही : आदित्य ठाकरे
नगरसेवकांना संबोधित करण्यासाठी ऑनलाईन आलेल्या आदित्य ठाकरे यांनी मविआ सरकार पडणार नाही अशी खात्री देत उद्धव ठाकरे हे जनतेचे आवडते मुख्यमंत्री असंही म्हटलं आहे.
Maharashtra Political Crisis : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यातील बैठक संपली
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
