एक्स्प्लोर
Advertisement
स्मार्ट बुलेटिन | 04 एप्रिल 2020 | शनिवार | एबीपी माझा
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
- राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 490 वर, काल दिवसभरात 67 नव्या रुग्णांची भर; देशात 62 तर जगभरात 55 हजार जणांचा कोरोनामुळे मृत्यू
- निजामुद्दीन तबलिगी जमातच्या कार्यक्रमातील 647 जणांना कोरोनाची लागण, देशभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या तीन हजारांच्या पुढे
- येत्या रविवारी रात्री नऊ वाजता, दिवे लावा, पंतप्रधान मोदींचं जनतेला आवाहन; रोहित पवारांकडून स्वागत, तर जितेंद्र आव्हाड, नवाब मलिक आणि बाळासाहेब थोरांताकडून टीकास्त्र
- नऊ मिनिट लाईट बंद केल्यास तांत्रिक बिघाड होऊन संपूर्ण राज्य व देश अंधारात जाण्याचा धोका, उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत याचं मत, तर जनतेने लाईट बंद न करता दिवे लावण्याचं आवाहन
- राज्यातील सहा जिल्ह्यात मास्क, टेस्टींग, पीपीई किट्स्, व्हेंटिलेटर्सचा तुटवडा, केंद्राच्या सर्वेत धक्कादायक माहिती उघड
- होम क्वॉरन्टाईन व्यक्तीला शिवभोजन केंद्र चालवण्याची परवानगी, सिंधुदुर्गातील वैभववाडी तालुक्यातील धक्कादायक प्रकार, शिवभोजन केंद्र सील
- शिरूरमध्ये क्वॉरन्टाईन असलेल्या तब्लिगी जमातीच्या 10 सदस्यांचे पलायन, सर्वांवर शिरुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; तर दिल्लीतील मरकजशी कोणताही संबंध नसल्याचं पोलिसांकडून स्पष्ट
- कन्टेन्मेंट झोन जाहिर केलेल्या मुंबईतल्या दहा भागात आजपासून कोरोना तपासणी क्लिनिक सकाळी नऊ ते एक सुरू राहणार
- नवी मुंबईतील केंद्रीय सुरक्षा बलाच्या आणखी सहा जवांनाची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह, माहिती विभागीय आयुक्त शिवाजी दौंड यांची माहिती, एकूण 11 जणांना कोरोनाची लागण
- कर्नाटकातल्या हुबळीत नमाज पठानासाठी आलेल्या नागरिकांचा पोलिसांवर हल्ला, काही पोलिस कर्मचारी जखमी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
परभणी
भारत
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement