एक्स्प्लोर

सकारात्मक! राज्यात आज 115 जण कोरोनामुक्त; आत्तापर्यंत 2 हजार 115 रुग्ण उपचारानंतर घरी

आज राज्यात 678 नवीन कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे आता एकूण रुग्णसंख्या 12 हजार 974 झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे आज 115 जणांना यशस्वी उपचारानंतर घरी सोडण्यात आले.

मुंबई : राज्यात आज कोरोनाच्या 678 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 12,974 झाली असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. दिलासादायक बाब म्हणजे आज 115 रुग्ण बरे होऊन घरी गेले. तर राज्यात आतापर्यंत एकूण 2115 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. दरम्यान, आज दिवसभरात 27 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 1 लाख 70 हजार 139 नमुन्यांपैकी 1 लाख 56 हजार 078 जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत. तर 12 हजार 974 जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 1 लाख 81 हजार 382 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून 13 हजार 158 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

नागपुरातून 1200 मजुरांना घेऊन विशेष 'श्रमिक' एक्स्प्रेस उत्तर प्रदेशला रवाना

आज राज्यात 27 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण संख्या 548 झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबईमधील 21, पुण्यातील 4 आणि नवी मुंबईतील एक आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी 16 पुरुष तर 11 महिला आहेत. आज झालेल्या 27 मृत्यूपैकी 60 वर्षे किंवा त्यावरील 14 रुग्ण आहेत. तर 10 रुग्ण हे वय वर्षे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. तर तीनजण 40 वर्षांखालील आहे.

राज्यातील जिल्हा व मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील: (कंसात मृत्यूंची आकडेवारी) मुंबई महानगरपालिका: 8800 (343) ठाणे: 60 (२) ठाणे मनपा: 488 (७) नवी मुंबई मनपा: 216 (4) कल्याण डोंबिवली मनपा: 212 (3) उल्हासनगर मनपा: 4 भिवंडी निजामपूर मनपा: 21 (1) मीरा भाईंदर मनपा: 141 (2) पालघर: 44 (1) वसई विरार मनपा: 152 (3) रायगड: 30 (1) पनवेल मनपा: 55 (2) नाशिक: 12 नाशिक मनपा: 43 मालेगाव मनपा: 229 (12) अहमदनगर: 27 (2) अहमदनगर मनपा: 16 धुळे: 8 (2) धुळे मनपा: 20 (1) जळगाव: 34 (11) जळगाव मनपा: 12 (1) नंदूरबार: 12 (1) नाशिक मंडळ एकूण: 413 (30) पुणे: 81 (4) पुणे मनपा: 1243 (99) पिंपरी चिंचवड मनपा: 72 (3) सोलापूर: 7 सोलापूर मनपा: 109 (6) सातारा: 37 (2) पुणे मंडळ एकूण: 1549 (114) कोल्हापूर: 10 कोल्हापूर मनपा: 6 सांगली: 29 सांगली मिरज कुपवाड मनपा:१ (१) सिंधुदुर्ग: 3 (1) रत्नागिरी: 11 (1) कोल्हापूर मंडळ एकूण: 61 (3) औरंगाबाद: 5 औरंगाबाद मनपा: 239 (8) जालना: 8 हिंगोली: 42 परभणी: 1 (1) परभणी मनपा: 2 औरंगाबाद मंडळ एकूण: 297 (10) लातूर: 12 (1) लातूर मनपा: ० उस्मानाबाद: 3 बीड: 1 नांदेड: 0 नांदेड मनपा: 31 लातूर मंडळ एकूण: 47 (2) अकोला: 12 (1) अकोला मनपा: 50 अमरावती: 3 (1) अमरावती मनपा: 31 (9) यवतमाळ: 79 बुलढाणा: 21 (1) वाशिम: 2 अकोला मंडळ एकूण: 198 (12) नागपूर: 6 नागपूर मनपा: 146 (2) वर्धा: 0 भंडारा: 1 गोंदिया: 0 चंद्रपूर: 0 चंद्रपूर मनपा: 4 गडचिरोली: 0 नागपूर मंडळ एकूण: 158 (2) इतर राज्ये: 28 (4) एकूण: 12974 (548) ( टीप – ही माहिती कोरोना पोर्टलवरील आय सी एम आरने दिलेल्या कोरोना बाधित रुग्णांच्या माहितीनुसार तयार करण्यात आलेली आहे.)

Coronavirus | नांदेडहून पंजाबमध्ये परतलेल्या आणखी 102 भाविकांना कोरोनाची लागण

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mahakumbh Stampede: महाकुंभ मेळ्यात मोठी चेंगराचेंगरी; फोटो आले समोर,  प्रत्यक्षदर्शींनी सांगितला, 'आँखो देखा हाल'
महाकुंभ मेळ्यात मोठी चेंगराचेंगरी; फोटो आले समोर, प्रत्यक्षदर्शींनी सांगितला, 'आँखो देखा हाल'
Horoscope Today 29 January 2025 : आज पौष अमावस्या; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज पौष अमावस्या; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Zeeshan Siddique : आपल्या जीवाला धोका, जबाबात ज्यांची नावं घेतली त्यांची पोलिस चौकशी करत नाहीत: झिशान सिद्दीकी
आपल्या जीवाला धोका, जबाबात ज्यांची नावं घेतली त्यांची पोलिस चौकशी करत नाहीत: झिशान सिद्दीकी
Anand Mahindra: नको थार, शितलसाठी लय भारी कार; महिंद्रांकडून शितलला गिफ्ट मिळालं, कुटुंबीयांना 'आनंद'
नको थार, शितलसाठी लय भारी कार; महिंद्रांकडून शितलला गिफ्ट मिळालं, कुटुंबीयांना 'आनंद'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhananjay Munde Resignation Demand : धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाव, अजितदादांकडून बचाव?Ajit Pawar Full PC : बीड प्रकरणातील दोषींना फाशी होणार, कुणाचा संबध नसेल तर...UNCUT PCTop 100 Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : 06 PM : 28 January 2025 : ABP MajhaABP Majha Headlines : 06 PM : 28 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mahakumbh Stampede: महाकुंभ मेळ्यात मोठी चेंगराचेंगरी; फोटो आले समोर,  प्रत्यक्षदर्शींनी सांगितला, 'आँखो देखा हाल'
महाकुंभ मेळ्यात मोठी चेंगराचेंगरी; फोटो आले समोर, प्रत्यक्षदर्शींनी सांगितला, 'आँखो देखा हाल'
Horoscope Today 29 January 2025 : आज पौष अमावस्या; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज पौष अमावस्या; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Zeeshan Siddique : आपल्या जीवाला धोका, जबाबात ज्यांची नावं घेतली त्यांची पोलिस चौकशी करत नाहीत: झिशान सिद्दीकी
आपल्या जीवाला धोका, जबाबात ज्यांची नावं घेतली त्यांची पोलिस चौकशी करत नाहीत: झिशान सिद्दीकी
Anand Mahindra: नको थार, शितलसाठी लय भारी कार; महिंद्रांकडून शितलला गिफ्ट मिळालं, कुटुंबीयांना 'आनंद'
नको थार, शितलसाठी लय भारी कार; महिंद्रांकडून शितलला गिफ्ट मिळालं, कुटुंबीयांना 'आनंद'
हार्वेस्टर मालकांचे पैसे न दिल्यास वाल्मिकच्या दुसऱ्या बायकोची संपत्ती ताब्यात घेऊ; शेतकरी संघटनेचा इशारा
हार्वेस्टर मालकांचे पैसे न दिल्यास वाल्मिकच्या दुसऱ्या बायकोची संपत्ती ताब्यात घेऊ; शेतकरी संघटनेचा इशारा
केसरकरांना दे धक्का; पुस्तकांना वह्यांची पाने लावण्याचा शासन निर्णय रद्द; पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकांचे वितरण
केसरकरांना दे धक्का; पुस्तकांना वह्यांची पाने लावण्याचा शासन निर्णय रद्द; पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकांचे वितरण
Solpaur News: सोलापूरात गुलियन बॅरे सिंड्रोमने चिंता वाढवली, जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक, नागरिकांना महत्त्वाच्या सूचना
सोलापूरात गुलियन बॅरे सिंड्रोमने चिंता वाढवली, जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक, नागरिकांना महत्त्वाच्या सूचना
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जानेवारी 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जानेवारी 2025 | मंगळवार
Embed widget