Mother Dairy Milk Price: पराग आणि अमूलनंतर आता मदर डेअरीनेही केली दूध दरात वाढ
पराग (Parag) आणि अमूलच्या (Amul) दरात वाढ झाल्यानंतर आता मदर डेअरीनेही (Mother Dairy) दुधाच्या दरात लिटरमागे दोन रुपयांची वाढ केली आहे. आजपासून नवीन दर लागू करण्यात आले आहेत.
Mother Dairy Milk Price : दिल्ली एनसीआरमध्ये आजपासून दूध महाग झाले आहे. पराग (Parag) आणि अमूलच्या (Amul) दरात वाढ झाल्यानंतर आता मदर डेअरीनेही (Mother Dairy) दुधाच्या दरात लिटरमागे दोन रुपयांची वाढ केली आहे. आजपासून नवीन दर लागू करण्यात आले आहेत. आता मदर डेअरीतून एक लिटर दूध घेण्यासाठी दोन रुपये जास्त मोजावे लागणार आहेत. काही दिवसांपूर्वी अमूल आणि परागने दुधाच्या दरात लिटरमागे 2 रुपयांची वाढ केली होती.
कोणते दूध किती दराने मिळणार?
मदर डेअरी दुधाची दिल्ली-एनसीआरमध्ये मोठ्या प्रमाणात विक्री होते. दररोज 30 लाख लिटरहून अधिक दूध विकले जाते. मदर डेअरीचे टोकनाइज्ड दूध, जे आधी 44 रुपये लिटरने मिळत होते, ते आता 46 रुपयांना लिटर मिळत आहे. अर्धा लिटर अल्ट्रा प्रीमियम दूध पूर्वी 31 रुपयांना मिळत होते, आजपासून ते 32 रुपयांना मिळत आहे. आधी 57 रुपयांना मिळणारे 1 लिटर फुल क्रीम दूध आता 59 रुपयांना मिळत आहे. पूर्वी 47 रुपये लिटरला मिळणारे टोन्ड दूध आता 49 रुपयांना मिळत आहे. दुहेरी टोन्ड दूध, जे आधी 41 रुपये प्रति लिटर दराने उपलब्ध होते, ते आता 43 रुपये प्रति लिटरने उपलब्ध आहे. पूर्वी 49 रुपये लिटरने मिळणारे गायीचे दूध आता 51 रुपयांना मिळत आहे.
दुधाचे दर का वाढले?
इंधनाचे वाढते दर आणि महागडे पॅकेजिंग यामुळे दुधाचे दर वाढवले जात असल्याचे मदर डेअरीचे म्हणणे आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार शेतीचा खर्चही वाढला आहे. त्यामुळे कंपनीचे नुकसान होत होते. मदर डेअरी आपल्या विक्रीतील 75 ते 80 टक्के रक्कम दुधाच्या खरेदीत गुंतवत आहे.
याआधी अमूल आणि गोवर्धन या कंपन्यानी 1 मार्चपासून दुधाच्या भाव वाढवले होते. देशाच्या प्रमुख एफएमसीजी डेअरी पराग मिल्क फुड्स लिमटेडने गोवर्धन ब्रँन्डच्या गायीच्या दुधाच्यी किंमतीमध्ये दोन रुपये प्रति लीटर वाढ करण्याची घोषणा केली होती. यामध्ये वाढीनंतर गोवर्धन गोल्ड मिल्कची किंमत 48 रुपयांवरून वाढून 50 रुपये झाली आहे. अशा प्रकारे गोवर्धन फ्रेशची किंमत 46 रुपयांपासून 48 रुपयांवर पोहोचली आहे. वीज, पॅकेजिंग, लॉजिस्टिक आणि चारा यांच्या वाढत्या किंमतीमुळे दुधाच्या किंमती वाढवण्याशिवाय पर्याय नव्हता असे अमूल ब्रँडचे संचालन करणाऱ्या गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनने म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या: