(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Taliban on Indian Wheat: भारताचा गहू उत्तम प्रतिचा तर पकिस्तानचा निकृष्ट दर्जाचा, तालिबानी अधिकाऱ्यांची माहिती
पाकिस्तानने पाठवलेला गहू निकृष्ट दर्जाचा असल्याचे तालिबान्यांनी म्हटले आहे. तर याउलट भारताने पाठवलेला गहू चांगल्या प्रतीचा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
Taliban on Indian Wheat: सध्या अफगाणिस्तानवर मोठे संकट आले आहे. तेथील नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर तिथे अन्नाचा मोठा तुटवडा भासत आहे. अशा काळात भारताने अफगाणिस्तानला मदतीचा हात दिला आहे. भारताने 2,000 मेट्रिक टन गव्हाची दुसरी खेप पाकिस्तानी मार्गाने अफगाणिस्तानला पाठवली. पाकिस्ताननेही भारताच्या मदतीनंतर अफगाणिस्तानला मदत पाठवली आहे. मात्र, पाकिस्तानने पाठवलेला गहू निकृष्ट दर्जाचा असल्याचे तालिबान्यांनी म्हटले आहे. याउलट भारताने पाठवलेला गहू चांगल्या प्रतीचा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
भारतातून अफगाणिस्तानला गहू
पाकिस्तानने अत्यंत निकृष्ट दर्जाचा गहू अफगाणिस्तानात पाठवला आहे. खुद्द तालिबानी अधिकाऱ्यांनीच याचा खुलासा केला आहे. ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तालिबानी अधिकारी पाकिस्तानच्या गव्हाबाबत तक्रार करत असल्याचा दावा केला जात आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, 'तालिबानी अधिकारी सांगत आहेत की पाकिस्तानमधून पाठवलेला गहू अत्यंत निकृष्ट दर्जाचा आहे, तर भारतीय गहू त्यापेक्षा खूपच चांगला आहे. भारताने मानवतेच्या नात्याने गेल्या महिन्यापासून अफगाणिस्तानला गहू पाठवण्यास सुरुवात केली आहे.
गेल्या वर्षी 24 नोव्हेंबर रोजी देखील इस्लामाबादकडून यावर सकारात्मक प्रतिसाद मिळाला होता. इम्रान खान रशियातून गव्हाचे व्यवहार करून परतले आहेत. अशात पाकिस्तानने निकृष्ट दर्जाचा गहू अफगाणिस्तानला पाठवला आहे. रशिया दौऱ्यावर असलेल्या इम्रान खान यांनी व्लादिमीर पुतीन यांच्यासोबत गहू आणि नैसर्गिक वायूचा करार केला आहे. इम्रान खान यांनी गेल्या गुरुवारी पुतीन यांची भेट घेतल्यानंतर सुमारे वीस लाख टन गहू आणि नैसर्गिक वायू आयात करण्याचा करार केल्याचे जाहीर केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
- Aamir Khan : सोयाबीनचे उत्पादन वाढवण्यासाठी अभिनेता अमीर खानचा पुढाकार, पाणी फाऊंडेशनने तयार केलेल्या पुस्तकाचे प्रकाशन
- Raju shetti : सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या अन्नात माती कालवली; आता संघर्ष अटळ, राजू शेट्टींचा इशारा
- साखर कारखानदारी महाराष्ट्राची आणि उत्तर प्रदेशची...काय फरक, काय साम्य? उसाचं राजकारण महत्वाचं!