एक्स्प्लोर

Air India : एअर इंडिया अमेरिकेकडून 840 विमानं खरेदी करणार, विमान कंपन्यांच्या इतिहासातील सर्वात मोठा करार

Air India Boeing Deal : एअर इंडिया (Air India) 840 विमानं (Boeing Airplane) खरेदी करणार आहे. ही एअर इंडियाच्या इतिहासातील सर्वात मोठा करार असणार आहे.

Air India Boeing Deal : एअर इंडिया (Air India) 840 विमानं (Airplane) खरेदी करणार आहे. ही एअर इंडियाच्या इतिहासातील सर्वात मोठा करार असणार आहे. टाटाच्या (TATA) मालिकी एअर इंडिया अमेरिकेकडून 470 बोईंग विमानं (Boeing Airplane) खरेदी करणार अशी माहिती, याआधी समोर आली होती. मात्र आता एअर इंडियाच्या  (Air India) अधिकाऱ्यांनी बोईंग विमानासंदर्भातील कराराबाबत मोठी अपडेट दिली आहे. यानुसार, एअर इंडिय एकूण 840 एअरबस (Airbus) आणि बोईंग विमानं (Boeing Airplane) खरेदी करणार आहे. अमेरिका आणि एअर इंडिया यांच्यातील हा करार विमान कंपन्यांच्या इतिहासातील मोठा करार ठरणार आहे.

एअर इंडिया अमेरिकेकडून 840 विमानं खरेदी करणार

एअर इंडियाचे चीफ कमर्शियल आणि ट्रान्सफॉर्मेशन ऑफिसर निपुण अग्रवाल यांनी एका लिंक्डइन पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "एअर इंडियाच्या कराराबद्दल संपूर्ण जगभरात उत्सुकता पाहायला मिळत आहे. हा प्रतिसाद पाहता आम्ही कृतज्ञ आहोत." निपुण अग्रवाल यांनी पुढे सांगितलं आहे की, एअर इंडियाच्या विमान खरेदीचा नवीन करार हा सुमारे दोन वर्षांपूर्वी एअर इंडियाच्या खाजगीकरणापासून सुरू झालेल्या अद्भुत प्रवासाचा एक भाग आहे. येत्या दशकात एअर इंडियाने 470 हलकी विमानं आणि 370 विमानं खरेदी करण्यासाठी बोईंग आणि एअरबसशी करार केला असल्याचे त्यांनी सांगितलं आहे.

आधी 470 विमान कराराची बातमी

एअर इंडिया फ्रेंच आणि अमेरिकन कंपनी एअरबस आणि बोईंगकडून 470 विमाने खरेदी करणार आहे, अशी बातमी 14 फेब्रुवारी रोजी समोर आली होती. यामध्ये 250 एअरबस विमानं आणि 220 बोईंग विमानांचा समावेश होता. तसेच या करारामध्ये अतिरिक्त 370 विमाने खरेदी करण्याचा पर्याय आहे. या करारामुळे टाटाच्या मालकीच्या एअर इंडियाच्या ताफ्यात 40 पूर्ण आकाराची A350 आणि 210 लहान आकाराची विमाने समाविष्ट होतील. यामध्ये एअरबस कंपनीच्या A-320/321, NEO/XLR आणि A350-900/1000 या विमानांचा समावेश आहे. याशिवाय, 190 737-MAX, 20 787 आणि दहा 777 या बोईंग विमानांचा समावेश आहे. या करारानंतर एअर इंडियाच्या ताफ्यात B737-800 विमानाचाही समावेश होईल.

एअर इंडियाची मालकी TATA कडे

तब्बल 67 वर्षांनी एअर इंडियाची मालकी पुन्हा एकदा टाटा सन्सकडे आली आहे. त्यानंतर टाटा विमान वाहतूक वाढवण्याच्या दृष्टीने अनेक प्रयत्न करताना दिसत आहेत. एअर इंडियाला 1932 मध्ये टाटा ग्रुपनं सुरु केलं होतं. टाटा समूहाकडे जे.आर.डी.टाटा यांनी या विमान कंपनीची सुरुवात केली होती. तेव्हा एअर इंडियाचं नाव टाटा एअर सर्विस ठेवण्यात आलं होतं. 1938 पर्यंत या कंपनीनं देशांतर्गत उड्डाणं सुरु केली होती. दुसऱ्या महायुद्धानंतर या कंपनीचं सरकारी कंपनीत रुपांतर करण्यात आलं. त्यानंतर पुन्हा या कंपनीची मालकी टाटा सन्सकडे आली आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Job Majha : दहावी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी, एअर इंडिया एअर सर्विसेस गोवा येथे विविध पदांसाठी भरती

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nawab Malik at Ajit Pawar : अजित पवार यांच्या घरी डिनर डिप्लोमसी, नवाब मलिकांची खास उपस्थिती!Deekshabhoomi Underground Parking Issue : नागपूर दीक्षाभूमी आंदोलन कुणी भडकवलं? Spcial ReportTop 25 : रात्रीच्या राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 July 2024 : ABP MajhaVidhan Parishad Election Special Report : घेणार माघार की होणार घोडेबाजार? विधानपरिषदेत कुणाचा गेम?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Embed widget