Dhule News : दोन वर्षांपासून कोट्यावधी रुपयांची देयके रखडली, शासकीय कंत्राटदारांचे लाक्षणिक साखळी उपोषण
Dhule News : धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील कंत्राटदारांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.
![Dhule News : दोन वर्षांपासून कोट्यावधी रुपयांची देयके रखडली, शासकीय कंत्राटदारांचे लाक्षणिक साखळी उपोषण hunger strike by pwd contractors in Dhule district maharashtra Dhule News : दोन वर्षांपासून कोट्यावधी रुपयांची देयके रखडली, शासकीय कंत्राटदारांचे लाक्षणिक साखळी उपोषण](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/17/fd5a2646b08f57b547475ecff644d3de1689594842344738_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Dhule News : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (Public Works Department) धुळे आणि नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातील कंत्राटदारांचे गेल्या दोन वर्षांपासून ते थकीत देयके मिळावे, या मागणीसाठी आज धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील कंत्राटदारांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करीत प्रशासनाचा निषेध व्यक्त केला. यावेळी धुळे (Dhule) आणि नंदुरबार जिल्ह्यातील कंत्राटदारांनी धरणे आंदोलनात सहभागी झाले होते.
धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील कंत्राटदारांनी सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत आणि इतरही शासकीय बांधकाम विभागात विकास कामे केलेली आहेत. मात्र मागील दोन वर्षांपासून कोट्यावधी रुपयांची देयके रखडली आहेत. प्रत्येक वेळी सादर केलेल्या बिलाच्या दहा ते वीस टक्के एवढीच रक्कम प्राप्त होते. यामुळे कंत्राटदारांना अत्यल्प मिळणाऱ्या रकमेतून विविध खर्च करावे लागतात, पूर्ण देयके न मिळाल्याने कंत्राटदारांना (Contractor) अडचणींचा मोठ्या प्रमाणावर सामना करावा लागतो. याच्या निषेधार्थ आज धुळे जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या वतीने धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील कंत्राटदारांनी एकत्र येत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन (protest) करीत प्रशासनाचा निषेध व्यक्त केला.
धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात आलेल्या कामांची कोट्यवधी रुपयांचा बिले थकली आहेत. यासाठी पाठपुरावा करून थकलेल्या कंत्राटदारांनी आता आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. गेल्या दोन वर्षांपासून थकीत बिले मिळाली नाहीत, तर त्यामुळे कंत्राटदारांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. 'कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, सर्व कंत्राटदारांची बिले वेळेवर मिळालीच पाहिजे', अशा प्रकारच्या घोषणा यावेळी आंदोलन कर्त्यांकडून देण्यात आल्या. यावेळी कंत्राटदारांच्या वतीने अधीक्षक अभियंता निवेदन देण्यात आले. मागील दोन वर्षांपासून रखडलेले थकीत देयके न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कंत्राटदारांनी दिला आहे.
दरम्यान दोन वर्षांपासून कामांची बिले थकली असल्याने अनेकांच्या बँकेच्या कर्जाची हफ्ते थकले आहेत, त्याचे व्याज वाढत आहे, कामगारांचे पगार देणे कठीण झाले आहे, यंत्रणेची इंधन बिले, पुरवठादारांचे देणे असे अनेकांचे देणे थकले आहे. यामुळे कंत्राटदारांसह हे सर्व घटक अडचणीत सापडले आहेत. यासाठी आंदोलन करीत असल्याचे आंदोलन कर्त्यांनी सांगितले. अधिकाऱ्यांना निवेदने देऊन झाली. निदर्शने करून झाली. त्यामुळे धुळे जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या वतीने धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील कंत्राटदारांनी एकत्र येत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करीत प्रशासनाचा निषेध व्यक्त केला.
कंत्राटदारांचे लाक्षणिक साखळी उपोषण
दरम्यान राज्यस्तरावर आंदोलनाचे हत्यार उपसले असून संबंधित जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयाच्या समोर हे आंदोलन करण्यात आले. राज्यातील जवळपास दहा हजार कोटींची बिले थकली असून त्या पार्श्वभूमीवर लाक्षणिक साखळी उपोषण आंदोलन करण्यात आले. 'कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, सर्व कंत्राटदारांची बिले वेळेवर मिळालीच पाहिजे', अशा प्रकारच्या घोषणा यावेळी आंदोलन कर्त्यांकडून देण्यात आल्या.
इतर संबंधित बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)