एक्स्प्लोर

Kolhapur : 'जणाची नाहीतर मनाची तरी लाज ठेवा'; रस्त्यांवरील पॅचवर्कच्या निकृष्ट दर्जावरून ज्येष्ठ नागरिकांनी पालिका कंत्राटदार, अधिकाऱ्याचे काढले वाभाडे

कोल्हापूर शहरातील रस्त्यांवरून चौफेर टीका सुरु झाल्यानंतर कोल्हापूर मनपा प्रशासनाकडून पॅचवर्कचे काम सुरु करण्यात आले आहे. मात्र, भंगार पद्धतीने करण्यात येत असलेल्या पॅचवर्कने संतापाची लाट उसळली आहे.

Kolhapur Worst Road : खड्ड्यात गेलेल्या कोल्हापूर शहरातील रस्त्यांवरून चौफेर टीका सुरु झाल्यानंतर कोल्हापूर मनपा प्रशासनाकडून पॅचवर्कचे काम सुरु करण्यात आले आहे. मात्र, भंगार पद्धतीने करण्यात येत असलेल्या पॅचवर्कमुळे पुन्हा एकदा संतापाची लाट उसळली आहे. कोल्हापूर शहरातील आपटेनगर परिसरातील सिनिअर सिटीझन यांनी पालिका अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरताना कानउघडणी केली. 'जणाची नाहीतर मनाची तरी लाज ठेवा' अशा शब्दात सिनिअर सिटीझनकडून अधिकाऱ्यांना फैलावर घेण्यात आले. त्यामुळे अधिकाऱ्यांचा चेहरा पडलेल्या खड्ड्यापेक्षा अधिक पडलेला दिसून आला. 

चला खड्डे पडलेले दाखवतो

महापालिकेकडून पॅचवर्क करताना सुरु असलेली चिंधीगिरी पाहून आपटेनगर परिसरातील वरिष्ठ नागरिकांचा पारा चांगलाच चढल्याचे दिसून आले. चला खड्डे पडलेले दाखवतो, असे म्हणतच त्यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांचे वाभाडे काढले. जणाची नाहीतर मनाची तरी लाज ठेवा, का पाकिट संस्कृती आहे तुमची? पाकिट घेतलं की झालं? कंत्राटदारांनी पाकिट घेऊन तुमच्या सारख्या लोकांना (पालिका अधिकारी) बदनाम केल्याचेही सिनिअर सिटीझन म्हणाले. आम्ही दंगा केल्यानंतर करून देतो म्हणण्याची पद्धत नको असल्याचेही ते म्हणाले. 

खड्ड्यातील कोल्हापुराने नाचक्की

सपूर्ण शहर खड्ड्यात गेल्याने शहरातील वाहनांसह नागरिकांच्या हाडांचा खुळखुळा झाला आहे. खड्डा नेमका कोणता चुकवायचा आणि चुकवला तरी दुसऱ्या खड्ड्यात गेल्याशिवाय राहत नाही, अशी परिस्थिती झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून एबीपी माझाने कोल्हापुरातील रस्त्यांचा प्रश्न लावून धरला आहे. 

काही दिवसांपूर्वीच कोल्हापूर महापालिकेतील अभियंत्याच्या आईचा खड्ड्यात पडून मृत्यू झाला होता. यानंतर एबीपी माझाने बातमी प्रसिद्ध केल्यानंतर मनपाकडून पॅचवर्कचे कामी हाती घेण्यात आले आहे. मात्र, ते करताना त्यामध्ये कोणताही दर्जा नसल्याचेही एबीपी माझाने दाखवून दिले होते. दुसरीकडे आईच्या मृत्यूला कारणीभूत ठरवत संबंधित अभियंत्यावर गुन्हा दाखल करण्याचा पराक्रम कोल्हापूर पोलिस आणि मनपा प्रशासनाने केला होता.  

इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
मोठी बातमी! भिवंडीत राजकीय भूकंप, समाजवादी पक्षाच्या 6 नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी; स्वीकृत निवडीवरुन वाद
मोठी बातमी! भिवंडीत राजकीय भूकंप, समाजवादीच्या 6 नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी; स्वीकृत निवडीवरुन वाद
सुनेत्रा पवारांचं भाषण, शरद पवारांच्या बाजुला मुख्यमंत्री फडणवीसांची जयंत पाटलांसोबत चर्चा; अनेकांच्या भुवया उंचावल्या
सुनेत्रा पवारांचं भाषण, शरद पवारांच्या बाजुला मुख्यमंत्री फडणवीसांची जयंत पाटलांसोबत चर्चा; अनेकांच्या भुवया उंचावल्या

व्हिडीओ

Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
Dhruv Rathee : आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
प्रत्येक रेल्वे तिकिटावर विमा सुविधा देणं बंधनकारक, सुप्रीम कोर्टाचे भारतीय रेल्वेला आदेश, 27 ऑक्टोबरपासून नवा नियम लागू होणार
मोठी बातमी, रेल्वे काऊंटरवरुन खरेदी केलेल्या तिकिटाला विमा सुविधा द्या, सुप्रीम कोर्टाचे आदेश
Mhada Pune Lottery : पुणेकरांसाठी गुड न्यूज, म्हाडाच्या 4462 घरांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ, 'या' तारखेपर्यंत अर्ज करण्याची संधी
पुणेकरांसाठी गुड न्यूज, म्हाडाच्या 4462 घरांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ, 'या' तारखेपर्यंत अर्ज करण्याची संधी
Raju Shetti : राजू शेट्टींनी आंदोलनाची दिशा बदलली, महामार्गावरील आंदोलन बंद, आता कारखाने बंद पाडणार
राजू शेट्टींनी आंदोलनाची दिशा बदलली, महामार्गावरील आंदोलन बंद, आता कारखाने बंद पाडणार
अंजली पाटीलच्या ‘सेल्वी’ चित्रपटाची आंतरराष्ट्रीय भरारी; दोन प्रतिष्ठित पुरस्कारांवर कोरले नाव

Embed widget