एक्स्प्लोर

Subhedar Review : 'सुभेदार' कसा आहे? वाचा रिव्ह्यू...

Subhedar Review : सिनेमागृहात धुमाकूळ घालणारा दिग्पाल लांजेकरचा (Digpal Lanjekar) बहुचर्चित 'सुभेदार' सिनेमा कसा आहे? जाणून घ्या...

Subhedar : नरवीर तानाजी मालुसरेंच्या (Tanaji Malusare) पराक्रमाची गाथा आपल्या प्रत्येकालाच मुखोद्गत आहे. हिंदवी स्वराज्यासाठी त्यांनी दाखवलेलं शौर्य आणि दिलेलं सर्वोच्च बलिदान म्हणजे आपल्या साऱ्यांचाच अभिमान. तेव्हा याच अभिमानाची गोष्ट रुपेरी पडद्यावर पाहायला जाताना मनात हाच विचार होता की या पराक्रमापलीकडे जे आपण आजवर कधीच पाहिलं नाही, ऐकलं नाही किंवा आपल्यापर्यंत पोहोचलं नाही अशा कोणत्या गोष्टी ‘सुभेदार’ आपल्या समोर मांडणार आणि एवढंच सांगेन की ‘सुभेदार’ने (Subhedar) नाराज केलं नाही.

सर्वसाधारणपणे आपल्या मुलाच्या लग्नाचं आमंत्रण शिवरायांना द्यायला  गेलेले तानाजी मालुसरे इथून कोंढाण्याच्या गोष्टीची सुरुवात होते. ही कलाकृती त्याला अपवाद आहे. शिवराय अष्टकातील हे पाचवं पुष्प तानाजी मालुसरेंच्या चरणी अर्पण करताना तो संपूर्ण काळ, प्रसंग, परिस्थिती आणि शेकडो अज्ञात मावळे या साऱ्याची अभ्यासपूर्ण दखल घेत लढाई पलीकडचे ‘सुभेदार’ (Subhedar Review) दिग्पाल लांजेकरने (Digpal Lanjekar) प्रेक्षकांसमोर उभे केलेत. या सिनेमाचे सरळ सरळ दोन भाग आहेत. पूर्वार्धात पार्श्वभूमी आणि उत्तरार्धात लढाई. अर्थात आपल्याला गोष्ट माहीत असल्याने आपला ओढा सहाजिकच लढाईकडे असतो. दिग्दर्शक मात्र त्याला काय दाखवायचं आहे यावर ठाम असल्यानं तो त्याच्या गतीने गोष्ट पुढे नेतो.

परफॉर्मन्सचा विचार केला तर यात दिसणारी जवळपास सारीच मंडळी आता मुरलेली आहेत. एकाच टीमसोबत, एकाच काळातले आणि जवळपास सारख्याच भूमिका असलेले चार सिनेमे गाठीशी असल्यानं या सिनेमात ती सहजता दिसते. तरीही अजय पूरकर (Ajay Purkar) यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच. नरवीर तानाजी मालुसरे त्यांनी खरंच जिवंत केलेत. प्रियांका मयेकरचा कॅमेरा हे या सिनेमाचं आणखी एक बलस्थान. अनेक मर्यादांच्या चौकटीत राहून उत्तम चित्रचौकटी टिपण्याचं काम तितक्याच ताकदीने केलं गेलंय. शिवराय अष्टकातील आजवरच्या साऱ्याच सिनेमात संगीताचा दर्जा नेहमीच वरचा होता. ‘सुभेदार’चं संगीतही त्याला साजेसं झालं आहे.

या साऱ्या जमेच्या बाजूमध्ये सर्वाधिक खटकतं काय तर ती पटकथा आणि संकलन. कोंढाण्याच्या पराक्रमापलीकडे जात जे काही दिग्दर्शक सांगण्याचा, दाखवण्याचा प्रयत्न करतोय ते सारंच महत्वाचं असलं तरी ते फार विस्कळीत वाटतं. म्हणजे वाढलेली लांबी कमी करण्याच्या प्रयत्नात दुवे हातून निसटल्यासारखं सिनेमा पाहाताना जाणवतं. प्रसंगांची निवड करताना दिग्पालने थोडी आणखी कठोरपणे कात्री चालवली असती तर ‘सुभेदार’ आणखी परिणामकारक होऊ शकला असता. र्थात खटकण्यासारखी ही काही कारणं असली तरी ‘सुभेदार’ आवडण्यासारखी आणि आर्वजून पाहाण्यासारखी अनेक कारणं आहेतच. त्यामुळं छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांची ही कथा, तानाजी मालुसरेंच्या पराक्रमाची ही गाथा थिएटरमध्ये जाऊन नक्की अनुभवा. या सिनेमाला मी देतोय तीन स्टार्स. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Bhaskar Jadhav On Nana Patole : Chhatrapati Sambhaji Nagar : गुगल मॅपने केला गोंधळ, UPSC चे विद्यार्थी परीक्षेपासून वंचितABP Majha Headlines : 2 PM : 16 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTop 50 : टॉप 50 बातम्यांचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा :16 June 2024 : ABP Majha

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
Rahul Gandhi : एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
Embed widget