Navratri Special: सारखे तेच उपवासाचे पदार्थ खाऊन कंटाळा आला? ट्राय करा या टेस्टी डिशेस
सारखे तेच उपावासाचे पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही हे हटके पदार्थ नक्की ट्राय करू शकता.
Navratri Special: नवरात्री उत्सव लवकरच सुरू होणार आहे. या उत्सवात अनेक लोक उपवास करतात. उपवासासाठी वेगवेगळे पदार्थ तयार केले जातात. सर्वसाधारणपणे खिचडी, वरईचा भात, साबूदाणा वडे इत्यादी पदार्थ लोक उपवासाला खातात. पण जर तुम्हाला सारखे तेच उपावासाचे पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही हे हटके पदार्थ नक्की ट्राय करू शकता. हे पदार्थ चवीला देखील चांगले आहेत. ड्राय फ्रुट्स, दूध आणि फळे इत्यादी पौष्टीक गोष्टी वापरून तुम्ही हे पदार्थ तयार करू शकता.
स्मूदी बाउल
उपवासाला स्मूदी बाउल तयार करून खाल्ल्याने तुम्हाला ताकद मिळेल तसेच थकवा देखील जाणवणार नाही.
स्मूदी बाउल तयार करण्याची सोपी पद्धत-तुमची आवडती फळं एक तास फ्रिजमध्ये ठेवा. त्यानंतर ही फळे ग्राइंडरमध्ये टाकून त्याबरोबर खजूर आणि दूध घालून मिक्स करा
Health Care Tips: फळांच्या साली आहेत आरोग्यासाठी उपयुक्त; जाणून घ्या फायदे
ज्यूस
उपवासाठी तुम्ही भाज्यांचा ज्यूस तयार करू शकता. भाज्यांच्या ज्यूसने बॉडी डिटॉक्स होते. भाज्यांचा ज्यूस तयार करून त्यामध्ये लिंबू आणि मिठ टाकून प्यावे.
क्रन्ची फ्रूट बाउल
क्रन्ची फ्रूट बाउल बनवण्यासाठी रात्री सर्व ड्राय फ्रूट्स भिजवून ठेवावेत. सकाळी ताजी फळे बारीक कापा. तसेच रात्री भिजवलेले ड्रायफ्रुट्स देखील कापून घ्या. एका बाउलमध्ये दूध ओता. त्यामध्ये फळांची एक लेअर आणि ड्रायफ्रुटची एक लेअर टाकावी. त्यानंतर वरून थोडे आणखी कोरडे ड्राय फ्रुट्स घालून खावे.
Health Care Tips: चहामध्ये साखरे ऐवजी करा गुळाचा वापर; जाणून घ्या फायदे
ग्ल्यूटन फ्रि लाडू
नारळाच्या पावडरमध्ये गुळाचा पाक मिक्स करून त्याचे लाड्डू तयार करा. जर तुम्हाला आणखी पौष्टीक लाडू हवा असेल तर खजूरला भिजवून त्याची पेस्ट तयार ती लाडूमध्ये वापरू शकता. तसेच तुम्ही यामध्ये ड्राय फ्रुट्स देखील घालू शकता.
Navratri 2021 : यंदा नऊ नाहीतर 8 दिवसांचा नवरात्रोत्सव, गुरुचा विशेष योग
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )