Shani Ast 2026 : साडेसाती-ढैय्याची भीती होणार कायमची दूर, शनिच्या अस्ताने 13 मार्चपासून 'या' राशी जगतील टेन्शन फ्री; हातात खेळणार पैसा
Shani Ast 2026 : द्रिक पंचांगानुसार, 13 मार्च 2026 रोजी संध्याकाळी 7 वाजून 14 मिनिटांनी शनि अस्त होणार आहे. शनिचा मीन राशीत अस्त होणार आहे.

Shani Ast 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, कर्मफळदाता शनिचा (Shani Dev) लवकरच अस्त होणार आहे. शनि सूर्याच्या मीन राशीत येताच त्याचं ते कमी होईल. शनि अस्त (Shani Ast) होताच ज्या राशीवर शनिची साडेसाती सुरु आहे अशा 2 राशींना चांगला लाभ मिळणार आहे.
द्रिक पंचांगानुसार, 13 मार्च 2026 रोजी संध्याकाळी 7 वाजून 14 मिनिटांनी शनि अस्त होणार आहे. शनिचा मीन राशीत अस्त होणार आहे. शनिच्या अस्ताने याचा परिणाम सर्व 12 राशींवर होणार आहे. मात्र, यातील 3 राशींना या कालावधीत चांगलाच लाभ मिळेल. या लकी राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीच्या लोकांवर शनिच्या साडेसातीचा पहिला टप्पा सुरु आहे. शनिच्या अस्ताने या राशीला आराम मिळणार आहे. तसेच, साडेसातीपासून या राशीची सुटका होऊ शकते. तसेच, या कालावधीत तुमच्या खर्चात देथखली चांगलीच घट झालेली दिसेल. जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांना चांगली नोकरी मिळेल. तसेच, या कालावधीत तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. परदेशात जाण्याची संधी मिळू शकते.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
वृश्चिक राशीच्या लोकांसाटी शनिचा अस्ताचा परिणाम फार अनुकूल असणार आहे. या काळात तुमच्यातील साहस आणि आत्मविश्वास दिसून येईल. तसेच, काही जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवण्यात येतील. त्या तुम्ही प्रामाणिकपणे पार पाडणं गरजेचं आहे. करिअरमध्ये प्रगतीचे शुभ संकेत आहेत. नोकरदार वर्गातील लोकांच्या पगारात लवकरच वाढ होणार आहे.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
कुंभ राशीच्या लोकांवर शनिच्या साडेसातीचा तिसरा टप्पा सुरु आहे. शनिच्या अस्तामुळे या राशीच्या लोकांना चांगला लाभ मिळेल. उत्पन्नाचे नवे सोर्स तुमच्यासमोर खुले होतील. तसेच, जर तुम्हाला एखादी प्रॉपर्टी किंवा वाहन विकत घ्यायचं असेल तर हा काळ तुमच्यासाठी चांगला असणार आहे.
हे ही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)




















