एक्स्प्लोर

Iran Israel War : इराण वि. इस्त्रायल-अमेरिका! पाकिस्तान इराणसोबत, तर इटलीच्या मेलोनींचीही स्पष्ट भूमिका; कोण कुणाच्या बाजूने? 

Iran Israel Conflict : अमेरिका-इस्त्रायलच्या हल्ल्यानंतर आणि अयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूनंतर युरोप, रशिया, चीन, पाकिस्तान आणि GCC देशांनी तीव्र प्रतिक्रिया नोंदवली. 

Iran Israel Conflict : अमेरिका आणि इस्त्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर आणि तेहरानकडून झालेल्या प्रत्युत्तरात्मक कारवाईनंतर जागतिक पातळीवर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. विशेषतः इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर अनेक देशांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. 

अमेरिका-इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारताने शांततेची भूमिका कायम ठेवली आहे. युद्धापेक्षा चर्चा आणि मध्यस्थीतून मार्ग काढावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दोन्ही बाजूंना केलं आहे. तसेच आखाती देशात अडकलेल्या भारतीयांच्या सुखरुप सुटकेचंही आश्वासन त्यांनी दिलं. 

European Reaction : आंतरराष्ट्रीय कायद्याचे पालन करण्याचे आवाहन

युरोपीय आयोगाच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयेन यांनी इराणच्या ‘हत्यारे शासनाविरुद्ध’ युरोपियन युनियनने व्यापक निर्बंध लावल्याची आठवण करून दिली. सर्व पक्षांनी संयम बाळगावा, नागरिकांचे संरक्षण करावे आणि आंतरराष्ट्रीय कायद्याचा पूर्ण सन्मान करावा, असे त्यांनी म्हटलं आहे.

इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी इराणच्या सामान्य जनतेबरोबर एकजूट दर्शवली. नागरिक आणि राजकीय अधिकारांचा सन्मान कायम ठेवण्याची मागणी त्यांनी केली असून तणाव कमी करण्यासाठी सहयोगी आणि प्रादेशिक नेत्यांशी चर्चा करणार असल्याचे स्पष्ट केले.

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बनीज यांनी दमनाविरुद्ध लढणाऱ्या इराणी जनतेला पाठिंबा दर्शवला आणि इराणला अण्वस्त्रे मिळू नयेत यासाठी अमेरिकेच्या प्रयत्नांना समर्थन दिले.

GCC Meeting : आखाती देशांची तीव्र निषेध

गल्फ कोऑपरेशन कौन्सिलच्या (GCC) सदस्य देशांची रविवारी बैठक झाली. यूएई, बहरीन, सौदी अरेबिया, ओमान, कतार आणि कुवैत या देशांनी इराणी हल्ल्यांची तीव्र निषेध केला. नागरी भाग आणि निवासी क्षेत्रांना लक्ष्य करण्यात आल्याचा आरोप करत त्यांनी इराणवर सार्वभौमत्व आणि आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवला.

जीसीसीने इराणला हल्ले थांबवण्याचे आणि संवादाचा मार्ग स्वीकारण्याचे आवाहन केले. मात्र गरज पडल्यास सुरक्षेसाठी सर्व आवश्यक पावले उचलण्याचा इशाराही दिला.

Iran Foreign Minister Response : शेजारी देशांना लक्ष्य नाही

इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनी आखाती देशांवर हल्ला केल्याचा आरोप फेटाळला. त्यांनी स्पष्ट केले की, आखातातील शेजाऱ्यांना नव्हे तर त्या देशांतील अमेरिकन तळांना लक्ष्य करण्यात येत आहे.

Russia and China Stand : सार्वभौमत्वाच्या उल्लंघनाचा आरोप

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी खामेनी यांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला. त्यांनी या हत्येला ‘मानव नैतिकता आणि आंतरराष्ट्रीय कायद्याविरुद्धची हत्या’ असे संबोधले. रशियन परराष्ट्र मंत्रालयाने तात्काळ राजकीय आणि राजनैतिक तोडग्याचा मार्ग स्वीकारण्याची मागणी केली.

चीननेही अमेरिका आणि इस्त्रायलच्या कारवाईचा तीव्र निषेध केला. संयुक्त राष्ट्रांच्या सनदेत नमूद केलेल्या उद्दिष्टे आणि तत्त्वांच्या विरोधात ही कारवाई असल्याचे चीनने म्हटलं. इराणच्या सार्वभौमत्वाचे गंभीर उल्लंघन झाल्याचा आरोप करत तात्काळ लष्करी कारवाई थांबवण्याचे आणि तणाव न वाढवण्याचे आवाहन केले.

Pakistan Reaction : खामेनींच्या मृत्यूवर शोक

पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी अयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूवर दुःख व्यक्त केले. पाकिस्तान सरकार आणि जनता या दुःखाच्या काळात इराणसोबत असल्याचे त्यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन झाल्याची चिंता व्यक्त करत कोणत्याही देशाच्या प्रमुखाला लक्ष्य करणे ही चुकीची परंपरा असल्याचे त्यांनी नमूद केले.

पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनीही इराणवरील हल्ले ‘अत्यंत दुर्दैवी’ असल्याचे म्हटले असून संयुक्त राष्ट्रांत पाकिस्तानने या कारवाईची स्पष्ट निंदा केल्याचे सांगितले.

Global Tension Rising : मध्यपूर्वेतील तणाव वाढला

इराण-इस्त्रायल संघर्षामुळे मध्यपूर्वेत तणाव शिगेला पोहोचला आहे. विविध देशांनी शांततेचे आवाहन केले असले तरी परिस्थिती अधिक चिघळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पुढील काही दिवसांत राजनैतिक प्रयत्न किती यशस्वी ठरतात यावरच या संघर्षाचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.

ही बातमी वाचा:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Hormuz Strait Attack : हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत युद्धाचा भडका, ब्रिटिश कंटेनर जळून खाक, इराणकडे बोट?
हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत युद्धाचा भडका, ब्रिटिश कंटेनर जळून खाक, इराणकडे बोट?
Benjamin Netanyahu: इराण-इस्रायल युद्धाच्या धामधुमीत वेगळीच चर्चा, बेंजामिन नेत्यानाहू गेले कोणीकडे? उलटसुलट चर्चांना उधाण
इराण-इस्रायल युद्धाच्या धामधुमीत वेगळीच चर्चा, बेंजामिन नेत्यानाहू गेले कोणीकडे? उलटसुलट चर्चांना उधाण
Iran War Live Update: तेलसाठ्यांवरील हल्ल्यानंतर इराणकडून इस्रायलवर सर्वात मोठ्या हल्ल्याला सुरुवात; अमेरिकन तळांवर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली, गुगल आणि अमेझॉन कार्यालये सुद्धा टार्गेटवर?
तेलसाठ्यांवरील हल्ल्यानंतर इराणकडून इस्रायलवर सर्वात मोठ्या हल्ल्याला सुरुवात; अमेरिकन तळांवर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली, गुगल आणि अमेझॉन कार्यालये सुद्धा टार्गेटवर?
Israel America Iran War: गेल्या 12 दिवसांपासून अमेरिका-इस्त्रायलकडून हल्ले; इराणचा एक प्लॅन समोर येताच डोनाल्ड ट्रम्पही चक्रावले, समुद्रात नेमकं काय लपवलंय?
अमेरिका-इस्त्रायलकडून हल्ले; इराणचा एक प्लॅन समोर येताच डोनाल्ड ट्रम्पही चक्रावले, समुद्रात नेमकं काय लपवलंय?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Zero Hour : इराण युद्धामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीला सरकार हाताळतंय असं वाटतं का? ABP Majha
Navi Mumbai Hospital : नवी मुंबईत हॉस्पिटलमध्ये LPG चा तुटवडा, रुग्णांना जेवण पुरवणे अवघड
PM Kisan 22th Installment: 'पीएम किसान योजने'चा २२ वा हप्ता कधी मिळणार? तारीख आली समोर, सर्वाधिक लाभार्थी अहिल्यानगरचे
Devendra Fadnavis Vidhan Sabha : देशातील पहिली ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्था महाराष्ट्रच होणार
Navi Mumbai Gas Issue : व्यावसायिक सिलिंडरचा तुटवडा, जगदंब हॉटेलकडून चुलीवरच जेवण सुरू

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Indians : मुंबईची पलटण विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी सज्ज, पहिल्या टप्प्यात किती सामने खेळणार? मुंबई इंडियन्सचा पहिला सामना 'या' संघाविरुद्ध
मुंबई इंडियन्सची पलटण विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी सज्ज, पहिल्या टप्प्यात किती सामने खेळणार?
Hormuz Strait Attack : हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत युद्धाचा भडका, ब्रिटिश कंटेनर जळून खाक, इराणकडे बोट?
हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत युद्धाचा भडका, ब्रिटिश कंटेनर जळून खाक, इराणकडे बोट?
राज्यातील तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुणे अन् पिंपरी चिंचवडकरांना मिळाले नवे सनदी अधिकारी
राज्यातील तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुणे अन् पिंपरी चिंचवडकरांना मिळाले नवे सनदी अधिकारी
CM फडणवीसांनी स्टे देऊनही महापौरांकडून बदली, खरं काय? रितू तावडेंचं स्पष्टीकरण, क्रोनॉलॉजी सांगितली
CM फडणवीसांनी स्टे देऊनही महापौरांकडून बदली, खरं काय? रितू तावडेंचं स्पष्टीकरण, क्रोनॉलॉजी सांगितली
LPG Supply : घरगुती सिलेंडरच्या किमती वाढल्या, पुरवठ्यावर गोंधळाची स्थिती; सरकार म्हणतंय, जनतेने घाबरण्याची गरज नाही
घरगुती सिलेंडरच्या किमती वाढल्या, पुरवठ्यावर गोंधळाची स्थिती; सरकार म्हणतंय, जनतेने घाबरण्याची गरज नाही
अमित देशमुख विधानसभेत कडाडले; उपमुख्यमंत्री सुरक्षित नसतील तर सर्वसामान्यांचं काय? व्हिडिओ शेअर
अमित देशमुख विधानसभेत कडाडले; उपमुख्यमंत्री सुरक्षित नसतील तर सर्वसामान्यांचं काय? व्हिडिओ शेअर
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 मार्च 2026 | बुधवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 मार्च 2026 | बुधवार 
IPL 2026 Schedule : मोठी बातमी, आयपीएलचं पहिल्या 20 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर, पहिल्या सामन्यात आरसीबी विरुद्ध कोण लढणार? मुंबईचा पहिला सामना कधी?
IPL चं पहिल्या 20 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर, पहिल्या सामन्यात आरसीबी विरुद्ध कोण लढणार? मुंबईचा पहिला सामना कधी?
Embed widget