एक्स्प्लोर

ग्रहण खगोलशास्त्रीय घटना, मानवी जीवनावर परिणाम नाही; अंधश्रद्धा पसरवणाऱ्यांवर कारवाई करा, डॉ. दाभोळकरांची मागणी

चंद्रग्रहणासंबधी अंधश्रद्धा पसरवणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली आहे.

सातारा : भारतात आज होळी-धुळवड सणाचा उत्साह सर्वत्र पाहायला मिळत आहे, पण या होळीच्या सणावर ग्रहणाचे (Eclipse) सावटही आहे. त्यामुळे, अनेक ठिकाणी काही गोष्टी आणि रुढी पंरपरा पाळल्या जात आहेत. ग्रहणात काय करावे आणि काय करु नये, हे पूर्वजांनी, वयोवृद्धांनी किंवा जाणकारांनी सांगितल्याप्रमाणे प्रथा पाळल्या जातनाचे दिसून येते. अनेक मंदिरात दर्शनासाठी प्रवेश बंद करण्यात आला आहे. तर, काही महत्त्वाच्या आणि शुभ कामांनाही मनाई केली जाते. मात्र, अंधश्रद्धा (Superstition) निर्मूलन समितीने ग्रहणाती या प्रथा म्हणजे अंधश्रद्धा असल्याचं म्हटलं आहे. तसेच, अंधश्रद्धा पसरवणाऱ्यांवर कारवाईची मागणीही केली आहे. 

चंद्रग्रहणासंबधी अंधश्रद्धा पसरवणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली आहे. आज बुधवार 3 मार्च रोजी या वर्षातले पहिले चंद्रग्रहण होत आहे. मात्र, ग्रहण ही एक खगोल शास्त्रीय घटना असून त्याचा मानवी जीवनावर कोणताही परिणाम होत नाही, असे अंनिसचे डॉ. हमीद दाभोळकर यांनी म्हटलं आहे. सोशल मिडियातून ग्रहणाविषयी अनेक अतिरंजित दावे केले जात आहेत. गर्भवती महिलांनी ग्रहण काळात एकाच जागेवर बसावे, पाणी पिऊ नये, तसेच मलमूत्र विसर्जन करू नये अशा स्वरूपाचे अवैज्ञानिक सल्ले दिले जात होते. त्या पार्श्वभूमीवर ग्रहणविषयी अंधश्रद्धा पसरवणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांवर शासनाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी डॉ. हमीद दाभोळकर यांनी केली आहे. 

चंद्रग्रहणानिमित्त पुण्यातील दगडूशेठ मंदिर बंद

ग्रहण लागल्यानंतर पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर बंद करण्यात आलय. साडे सहाच्या सुमारास ग्रहण संपल्यानंतर विधिपत पूजा करून दगडूशेठ मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यात येणार आहे. आज दुपारी 3 वाजून 20 मिनिटे ते संध्याकाळी 6 वाजून 48 मिनिटांपर्यंत खग्रास चंद्रग्रहण असल्याने मंदिर बंद ठेवण्यात येणार आहे.

टीम इंडियाने सराव टाळला

टीम इंडिया पुढील सामन्यासाठी मुंबईत दाखल होताच आजच्या खग्रास चंद्रग्रहणाची माहिती भारतीय संघ व्यवस्थापनाला मिळाली. त्यानंतर टीम इंडियाच्या सरावाची वेळ संध्याकाळी सहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत करण्यात आली आहे. प्रत्यक्षात भारतीय संघ आज संध्याकाळी 7 वाजल्यानंतर फ्लडलाईट्समध्ये सराव करताना दिसेल. तर, इंग्लंड संघाचा सराव पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार दुपारी सुरू झाला आहे. मात्र, खग्रास ग्रहणामुळे टीम इंडियाने आपला दुपारचा सराव टाळल्याची माहिती समोर आली आहे. 

हेही वाचा

Team India: सूर्याच्या संघाला चंद्राचं ग्रहण, टीम इंडियानं पाळला क्षण; सरावाची वेळ बदलली, चर्चा तर होणारच

महत्त्वाच्या बातम्या

गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, IPS अधिकारी स्मार्तना पाटील ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर 
सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, IPS अधिकारी स्मार्तना पाटील ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर 
Tukaram Mundhe: डॉमिनोज, केएफसी, मॅकडोनाल्ड, सबवे, बर्गरकिंगसह प्रमुख आस्थापनांची FDA कडून तपासणी; 2 व्यावसाय तात्काळ बंद, 5 परवाने निलंबित, 95 जणांना सुधारणा नोटिसा
डॉमिनोज, केएफसी, मॅकडोनाल्ड, सबवे, बर्गरकिंगसह प्रमुख आस्थापनांची FDA कडून तपासणी; 2 व्यावसाय तात्काळ बंद, 5 परवाने निलंबित, 95 जणांना सुधारणा नोटिसा
Manoj Jarange Patil: डिफेंडर कारवरून डिवचलं, मनोज जरांगेंनी विरोधकांना चांगलच सुनावलं; म्हणाले, ‘यांच्या आईच्या नवऱ्याने पैसे दिले का?’
डिफेंडर कारवरून डिवचलं, मनोज जरांगेंनी विरोधकांना चांगलच सुनावलं; म्हणाले, ‘यांच्या आईच्या नवऱ्याने पैसे दिले का?’

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पत्नीला मारहाण करताच बेशुद्ध पडली, घाबरून इंजिनिअर पतीनं सुद्धा आईला फोन करून गळ्याला दोरी लावली, कौटुंबिक वादात दोघांचाही हकनाक जीव गेला
पत्नीला मारहाण करताच बेशुद्ध पडली, घाबरून इंजिनिअर पतीनं सुद्धा आईला फोन करून गळ्याला दोरी लावली, कौटुंबिक वादात दोघांचाही हकनाक जीव गेला
हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत गडबड, परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ; विद्यार्थ्यांचा ठिय्या, पोलीस घटनास्थळी
हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत गडबड, परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ; विद्यार्थ्यांचा ठिय्या, पोलीस घटनास्थळी
शाळेत शिक्षक नाही, रस्ते नाहीत, शिक्षणाची ऐशी तैशी झाली, प्रयागराजबरोबर स्पर्धा करत कुंभमेळ्यावर इतका पैसा खर्च करण्याची गरज काय? 20 हजार कोटी गिळंकृत करायचा डाव; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
शाळेत शिक्षक नाही, रस्ते नाहीत, शिक्षणाची ऐशी तैशी झाली, प्रयागराजबरोबर स्पर्धा करत कुंभमेळ्यावर इतका पैसा खर्च करण्याची गरज काय? 20 हजार कोटी गिळंकृत करायचा डाव; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
जातनिहाय जनगणनेबाबत छगन भुजबळ धादांत खोटं बोलतायंत; ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांचा दावा, म्हणाले, ते भाजपकडे झुकलेत
जातनिहाय जनगणनेबाबत छगन भुजबळ धादांत खोटं बोलतायंत; ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांचा दावा, म्हणाले, ते भाजपकडे झुकलेत
Video: 'म्हणून मी डान्स करायचा नाही का?' टीम इंडियाची क्रिकेटर श्रेयंका पाटीलचा 'बबली बदमाश है' वर भन्नाट डान्स व्हायरल, ट्रोल करणाऱ्यांनाही सडेतोड प्रत्युत्तर
Video: 'म्हणून मी डान्स करायचा नाही का?' टीम इंडियाची क्रिकेटर श्रेयंका पाटीलचा 'बबली बदमाश है' वर भन्नाट डान्स व्हायरल, ट्रोल करणाऱ्यांनाही सडेतोड प्रत्युत्तर
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर त्यांचे प्राण वाचले असते; संजय राऊतांचा खळबळजनक दावा, सांगितला इतिहास
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर त्यांचे प्राण वाचले असते; संजय राऊतांचा खळबळजनक दावा, सांगितला इतिहास
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
Embed widget