एक्स्प्लोर

BJP Rajya Sabha Candidate List : भाजपची राज्यसभेसाठी पहिली यादी जाहीर, महाराष्ट्रातील नावांचं काय? पक्षाचे अध्यक्ष नितीन नवीन राज्यसभेवर जाणार

BJP : भाजपनं राज्यसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर केली आहे. भाजपनं पहिल्या यादीत 9 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे.

नवी दिल्ली : राज्यसभेच्या 37 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरु आहे. 10 राज्यांमधील 37 जागांसाठी ही निवडणूक प्रक्रिया राबवली जात आहे. उमेदवारी दाखल करण्यास 5 मार्चपर्यंत मुदत आहे. भाजपनं त्यापूर्वी 9 राज्यांमधील उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. तर, महाराष्ट्रातील उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आलेली नाही. विशेष बाब म्हणजे भाजपचे अध्यक्ष नितीन नवीन राज्यसभेवर जाणार आहेत. त्यांचं नाव बिहार मधून जाहीर करण्यात आलं आहे. 

भाजपनं कोणाला उमेदवारी दिली? 

बिहार : नितीन नवीन, शिवेश कुमार
आसाम : तेराश गोवाला, जोगेन मोहन
छत्तीसगड :लक्ष्मी वर्मा
हरियाणा : संजय भाटिया
ओडिशा : मनमोहन सामल, सुजीत कुमार
पश्चिम बंगाल : राहुल सिन्हा 

भाजपनं पहिल्या यादीत 9 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहगे. यात बिहार, आसाम, छत्तीसगड, हरियाणा, ओडिशा आणि पश्चिम बंगाल राज्यातील उमेदवारांची नावं आहेत. बिहारमधून राज्यसभेवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भाजपकडून 6 राज्यातील राज्यसभेच्या  जागांवर उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. बिहार, आसाम, छत्तीसगड, ओडिशा, हरियाणा, पश्चिम बंगालमधील एकूण 9 जागांवर भाजपनं उमेदवार जाहीर केले आहेत. 

राज्यसभेच्या 37 जागांसाठी निवडणूक

राज्यसभा निवडणुकीसाठी 16 मार्चला मतदान होणार आहे. राज्यसभेच्या 37 जागांपैकी सर्वाधिक 7 जागा महाराष्ट्रातून निवडून दिल्या जाणार आहेत. तामिळनाडूतून  6,  बिहार आणि पश्चिम बंगालमधून 5 आणि ओडिशा राज्यातून 4, आसामधून 3, तेलंगाणातून 2 आणि छत्तीसगड, हरियाणा आणि हिमाचल प्रदेशमधून प्रत्येकी एक जागेसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. 

महाराष्ट्रातून कोणाला संधी? 

भारतीय जनता पार्टीकडून राज्यसभेवर कोणाला पाठवलं जाणार यासंदर्भात विविध नावं चर्चेत आहेत. केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, धैर्यशील पाटील, भागवत कराड हे निवृत्त झाल्यानंतर त्यांच्या जागी कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. भाजपच्या विनोद तावडे, रावसाहेब दानवे, डॉ. भागवत कराड, विजया रहाटकर, मिलिंद कांबळे, कुणाल पाटील, भारती पवार, दिलीप कांबळे, माधव भंडारी, अमर साबळे, प्रीतम मुंडे, डॉ. संगीता फुसाटे यांच्या नावांचा समावेश असल्याचे समजते.  

महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण मागील आठवड्यात नवी दिल्लीच्या दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी महाराष्ट्र भाजपकडून उमेदवारी कोणाला देण्यात यावी यासंदर्भातील नावं सुचवण्यात आली होती. 

महाराष्ट्रातून एकूण 7 जागा निवडून दिल्या जाणार आहेत. विधानसभेतील संख्याबळानुसार भाजप 3 जागा सहजपणे जिंकू शकतं. तर, चौथ्या जागेसाठी त्यांना एकनाथ शिंदे यांची मदत लागेल. एकनाथ शिंदे  यांच्या शिवसेनेची एक जागा निवडून येऊ शकते. तर, राष्ट्रवादी काँग्रेसकडून एका जागी उमेदवार दिला जाईल. महाविकास आघाडीचा केवळ एक उमेदवार विजयी होईल. महाराष्ट्र विधानसभा संख्याबळानुसार राज्यसभा निवडणुकीत विजयासाठी 37 मतं आवश्यक आहेत.

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

युद्धाचा परिणाम थेट उद्योगांवर, पाच दिवसांपासून बीडमध्ये ठिबक सिंचनच्या पाईपचे उत्पादन बंद, पुरवठ्याची साखळी विस्कळीत
युद्धाचा परिणाम थेट उद्योगांवर, पाच दिवसांपासून बीडमध्ये ठिबक सिंचनच्या पाईपचे उत्पादन बंद, पुरवठ्याची साखळी विस्कळीत
Farooq Abdullah Firing : माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्लांवर गोळीबार, जम्मूतील लग्न समारंभातून बाहेर पडताच हल्ला, उपमुख्यमंत्री सुरिंदर चौधरी जखमी
माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्लांवर गोळीबार, जम्मूतील लग्न समारंभातून बाहेर पडताच हल्ला, उपमुख्यमंत्री सुरिंदर चौधरी जखमी
Congress :  काँग्रेसचं ठरलं, केरळमध्ये 90 जागा लढणार; काँग्रेस खासदारांना विधानसभा निवडणुकीत मैदानात उतरवणार
 काँग्रेसचं ठरलं, केरळमध्ये 90 जागा लढणार; काँग्रेस खासदारांना विधानसभा निवडणुकीत मैदानात उतरवणार
LPG गॅसची कमतरता भासणार नाही, मध्य पूर्वेतील युद्धाच्या भारतावर परिणाम नाही, केंद्र सरकारनं उचललं मोठं पाऊल
LPG गॅसची कमतरता भासणार नाही, मध्य पूर्वेतील युद्धाच्या भारतावर परिणाम नाही, केंद्र सरकारनं उचललं मोठं पाऊल
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Iran Israel Effect : गॅसटंचाईचं कारण, भडकलं राजकारण, युद्धावरुन विरोधक-सत्ताधाऱ्यांमध्ये लढाई Special Report
Iran Israel attack Effect On Maharashtra : युद्धाचं फलित, गॅस गेला चुलीत! Special Report
Iran Israel attack Effect On Maharashtra : अफवांचा भडका,भीतीची रांग, बुकिंगसाठी गर्दी Special Report
Danve Vs Bamb : काल पकडली कॉलर, आज सत्तेचा पदर Special Report
Judgment on Harish Rana's : देशात निष्क्रिय इच्छामरणाला प्रथमच परवानगी Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL : आयपीएलच्या 20 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर, कोहली, धोनी आणि रोहित शर्माचा पहिला सामना कधी?
IPL : आयपीएलच्या 20 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर, कोहली, धोनी आणि रोहित शर्माचा पहिला सामना कधी?
Congress :  काँग्रेसचं ठरलं, केरळमध्ये 90 जागा लढणार; काँग्रेस खासदारांना विधानसभा निवडणुकीत मैदानात उतरवणार
 काँग्रेसचं ठरलं, केरळमध्ये 90 जागा लढणार; काँग्रेस खासदारांना विधानसभा निवडणुकीत मैदानात उतरवणार
Mumbai Indians : मुंबईची पलटण विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी सज्ज, पहिल्या टप्प्यात किती सामने खेळणार? मुंबई इंडियन्सचा पहिला सामना 'या' संघाविरुद्ध
मुंबई इंडियन्सची पलटण विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी सज्ज, पहिल्या टप्प्यात किती सामने खेळणार?
Hormuz Strait Attack : हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत युद्धाचा भडका, ब्रिटिश कंटेनर जळून खाक, इराणकडे बोट?
हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत युद्धाचा भडका, ब्रिटिश कंटेनर जळून खाक, इराणकडे बोट?
राज्यातील तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुणे अन् पिंपरी चिंचवडकरांना मिळाले नवे सनदी अधिकारी
राज्यातील तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुणे अन् पिंपरी चिंचवडकरांना मिळाले नवे सनदी अधिकारी
CM फडणवीसांनी स्टे देऊनही महापौरांकडून बदली, खरं काय? रितू तावडेंचं स्पष्टीकरण, क्रोनॉलॉजी सांगितली
CM फडणवीसांनी स्टे देऊनही महापौरांकडून बदली, खरं काय? रितू तावडेंचं स्पष्टीकरण, क्रोनॉलॉजी सांगितली
LPG Supply : घरगुती सिलेंडरच्या किमती वाढल्या, पुरवठ्यावर गोंधळाची स्थिती; सरकार म्हणतंय, जनतेने घाबरण्याची गरज नाही
घरगुती सिलेंडरच्या किमती वाढल्या, पुरवठ्यावर गोंधळाची स्थिती; सरकार म्हणतंय, जनतेने घाबरण्याची गरज नाही
अमित देशमुख विधानसभेत कडाडले; उपमुख्यमंत्री सुरक्षित नसतील तर सर्वसामान्यांचं काय? व्हिडिओ शेअर
अमित देशमुख विधानसभेत कडाडले; उपमुख्यमंत्री सुरक्षित नसतील तर सर्वसामान्यांचं काय? व्हिडिओ शेअर
Embed widget