Iran Vs Israel Kolhapur Family : मुलं कतारमध्ये, मिसाईल हल्ले पाहिले, कोल्हापूरचे कुटुंबीय भयभीत
Iran Vs Israel Kolhapur Family : मुलं कतारमध्ये, मिसाईल हल्ले पाहिले, कोल्हापूरचे कुटुंबीय भयभीत
अमेरिका- इस्रायलआणि इराण यांच्यातील युद्धामुळे सर्वत्र भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.... महाराष्ट्रातील अनेक तरुण कामानिमित्त त्या भागात आहेत...कोल्हापूरच्या समीर मुजावर यांची दोन्ही मुलं कतार याठिकाणी कामानिमित्त वास्तव्यास आहेत...हल्ले सुरू झाल्यानंतर मुजावर कुटुंब चिंतेत आहेत...कारण मुजावर यांची मुलं ज्याठिकाणी राहतात त्या इमारतीवरून मिसाईल पडत असल्याची माहिती मुजावर यांच्या मुलांनी दिली....मुजावर कुटुंबाशी चर्चा केलीय आमचे प्रतिनिधी विजय केसरकर यांनी....
जसा आपल्याकडे कोरोना आला होता आणि त्या दरम्यान कोरोनाच्या ते सगळं सुनसान होतं तसं या वेळेला कतारमध्ये सगळे रस्ते सुनसान आहेत इमर्जन्सी सेवेला ज्या काही पोलिसांच्या वगैरे जे वाहन आहेत तेवढीच रस्त्यावर धावताना दिसतात असं माझ्या मुलांचं म्हणणं आहे. अमेरिका इझ्राइल आणि इरान मधल्या युद्धामुळे संपूर्ण जगभरामध्ये भीतीचं सावट निर्माण झालेला आहे महाराष्ट्रातील देखील अनेक तरुण या संपूर्ण देशांमध्ये नोकरीच्या निमित्ताने आहेत कोल्हापुरातील देखील समीर मुजावर यांची दोन्ही मुलं आहेत ती या कतार या ठिकाणी नोकरीच्या निमित्ताने आहेत खूप लहान वयात मुलं कतारला गेलेले आहेत ज्यावेळी ही घटना घडली त्या ठिकाणी हल्ले चालू झाले माहिती मिळाली तुम्हाला कधी आणि मुलांशी संपर्क झाला का माझी दोन्ही मुलं कतारमध्ये गेल्या मोठा मुलगा माझा जो आहे तो सात वर्षापासून कतारमध्ये नोकरीच्या निमित्ताने आहे आणि धाकटा मुलगा जो आहे छोटा मुलगा जो आहे तो साधारणपणे तीन वर्षापासून कतारमध्ये जॉबच्या निमित्ताने आहे तर गेल्या काही वर्ष महिन्यापासून कतारमध्ये असलेल्या अमेरिकन बेस कॅम्पवर इरानचे हल्ले होताना ते आम्हाला तिकडून ते दाखवतात म्हणजे मोबाईलवर वगैरे ते दाखवतात त्यामुळे आमची कायमची धाकधूक ही आहेच गेल्या काही महिन्यापासून तर परवा जो काही इराननं तिथं हल्ला केला होता त्यादरम्यान आमचे रमजानचे महिने चालू असल्यामुळे रोजे चालू असल्यामुळे आम्ही सकाळी उपवास वगैैरे झाल्यानंतर विश्रांती घेण्यासाठी जात असताना सोशल मीडियाच्या माध्यमातून पहिल्यांदा ते वृत्त आमच्यापर्यंत भेटलं आणि आमच्या म्हणजे आम्ही गर्भगळीत झालो की नेमके काय झालंय तिथं आम्हाला काय समजायला तयार नाही मग माझ्या मिसेसने माझ्या मुलांना संपर्क साधला तर त्या दरम्यान साधारण भारतीय वेळेनुसार तिथला जो देशाचा टाइमिंग आहे तिथली जी वेळ आहे ती अडीच तास मागे आहे म्हणजे हे साधारण साडेदहा अकराच्या दरम्यान आम्हाला हे समजलं होतं तर तिथं साडेआठ नऊच्या दरम्यान तिथं हल्ले चालू झालेले होते आणि त्यावेळेला संपर्क साधल्यानंतर मुलांनी माझ्या पत्नीला असं सांगितलं की आम्ही सेफ आहोत आम्हाला आता आमच्या ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांमध्ये अशा सूचना दिलेल्या आहेत तुम्ही तुमच्या तुमच्या फ्लॅटवर तुम्ही जाऊन तिथं विश्रांती घ्या आणि जोपर्यंत सरकार सांगत नाही जोपर्यंत इथलं मिनिस्ट्री सांगत नाही





















