(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Health Care Tips: चहामध्ये साखरे ऐवजी करा गुळाचा वापर; जाणून घ्या फायदे
अनेक लोक त्यांच्या दिवसाची सुरूवात चहाने करतात. काहींना चहा पिण्याची सवय असते. चहा पिण्याची सवय असणाऱ्यांनी चहामध्ये साखरेऐवजी जर गुळाचा वापर केला, तर ते त्यांच्या आरोग्यासाठी फायद्याचे आहे.
Benefits of Eating Jaggery: अनेक लोक त्यांच्या दिवसाची सुरूवात चहाने करतात. अनेकांना चहा पिण्याची सवय असते. चहा पिण्याची सवय असणाऱ्यांनी चहामध्ये साखरेऐवजी जर गुळाचा वापर केला, तर ते त्यांच्या आरोग्यासाठी फायद्याचे आहे. जाणून घेऊयात गुळाचा चहा पिण्याचे फायदे
-पोटाची चर्बी कमी होते.
-वजन कमी होण्यास मदत होते. गुळाच्या चहामुळे तुमच्या शरिरातील साखरेचं प्रमाण कमी होईल.
-चेहऱ्यावर तेज येईल.
-साखर जास्त खाल्याने ब्लॅक हेड आणि व्हाइट हेड वाढू शकतात. त्यामुळे साखरे ऐवजी जर तुम्ही चहामध्ये गुळाचा वापर केला तर या समस्या होणार नाहित.
-चेहऱ्यावर नैसर्गिक तेज येते.
Health Tips | आल्याचा चहा पिताय? उद्भवू शकतात 'या' समस्या
-पचन क्रिया चांगली राहते.
-गुळाचा चहा पिल्याने पचनक्रिया सुधारते आणि छातीत जळजळ होत नाही. कारण गुळामध्ये आर्टिफिशल स्वीटनचे प्रमाण कमी आहे तसेच गुळामध्ये अनेक व्हिटॅमिन आणि मिनरल आहेत. जे आरोग्यासाठी फायदेशीर आहेत.
-जर तुम्हाला मायग्रेनचा त्रास आसेल तर दुधामध्ये गुळाचा चहा तयार करून पिल्याने आराम मिळतो.
रक्ताचे प्रमाण वाढेल.
गुळामध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे गुळाचा चहा पिल्याने शरिरातील रक्ताची कमतरता दूर होईल.
(टिप : सदर गोष्टी केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत, ABP माझा यातून कोणताही दावा करत नाही.)
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )