January 2025 Bank Holidays: नववर्षात बँक संबंधित काम असेल, तर लक्ष द्या! जानेवारी 2025 बँकाच्या सुट्ट्यांची यादी जाहीर; किती दिवस बँका बंद राहणार?
January 2025 Bank Holidays: अनेकवेळा असे घडते की, लोक कोणतीही शहानिशा न करता बँकेत पोहोचतात आणि बँक बंद असल्याचे समजते, त्यामुळे जानेवारी 2025 महिन्यातील सुट्ट्यांची यादी जाणून घ्या..

January 2025 Bank Holidays: येत्या काही दिवसातच नवीन वर्ष 2025 चं आगमन होणार आहे. नववर्षाच्या आगमनाची तयारी संपूर्ण जगभरात तयारी सुरू आहे. अशात, जर तुमचेही बँकेशी संबंधित काही काम असेल तर आणि ते जानेवारी 2025 मध्ये पूर्ण होईल असा विचार करत असाल तर बँकेत जाण्यापूर्वी ही बातमी वाचा.. कारण भारतीय रिझर्व बॅंकेने जानेवारी 2025 मधील सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. जाणून घ्या 2025 नवीन वर्षातील जानेवारी महिन्यात किती दिवस बँका बंद राहतील?
जानेवारी 2025 बँकाच्या सुट्ट्यांची यादी जाहीर
अनेकवेळा असे घडते की लोक कोणतीही शहानिशा न करता बँकेत पोहोचतात आणि बँक बंद असल्याचे समजते, जानेवारी 2025 मध्ये मकर संक्रांत, प्रजासत्ताक दिन यासह अनेक महत्त्वपूर्ण प्रसंग येत आहेत, पहिल्या महिन्यात म्हणजेच जानेवारीमध्ये देशाच्या विविध भागात 16 दिवस बँका बंद राहतील. तर एकंदरीत, जानेवारीत असे आठ दिवस असतील जेव्हा देशभरातील बँका बंद राहतील. यामध्ये दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारचाही समावेश आहे. जानेवारी 2025 बँकाच्या सुट्ट्यांची यादी जाणून घ्या..
जानेवारी 2025 बँकाच्या सुट्ट्यांची यादी
7 जानेवारी 2025- रविवार, देशभरातील बँका बंद राहतील.
11 जानेवारी 2025- मिझोरममध्ये मिशनरी डेनिमित्त बँका बंद राहतील.
12 जानेवारी 2025- स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त पश्चिम बंगालमध्ये बँका बंद राहतील.
13 जानेवारी 2025- महिन्याचा दुसरा शनिवार आणि लोहरीमुळे बँका बंद राहतील.
14 जानेवारी 2025- मकर संक्रांती आणि रविवारमुळे देशभरात बँका बंद राहतील.
15 जानेवारी 2025- तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशमध्ये पोंगलमुळे बँकांना सुट्टी असेल.
16 जानेवारी 2025- तुसू पुजेमुळे पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये बँका बंद राहतील.
17 जानेवारी 2025- गुरु गोविंद सिंह जयंतीनिमित्त अनेक राज्यांतील बँकांना सुट्टी असेल.
20 जानेवारी 2025- रविवार, देशभरातील बँका बंद राहतील.
23 जानेवारी 2025- नेताजी सुभाषचंद्र बोस जयंतीनिमित्त अनेक राज्यांमध्ये बँका बंद राहतील.
25 जानेवारी 2025- हिमाचल प्रदेश राज्य दिनानिमित्त राज्यात सुट्टी असेल.
26 जानेवारी 2025- प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरात बँका बंद राहतील.
27 जानेवारी 2025- चौथा शनिवार, देशभरातील बँका बंद राहतील.
28 जानेवारी 2025- रविवार, देशभरातील बँका बंद राहतील.
31 जानेवारी 2025- मी-डॅम-मी-फीमुळे आसाममध्ये सुट्टी
सुट्टीच्या दिवशी बँकेची कामं कशी कराल?
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया दर महिन्याला बँकांच्या सुट्ट्यांची यादी प्रसिद्ध करते. जर तुम्ही पुढील जानेवारी महिन्यात बँकिंगशी संबंधित महत्त्वाची कामे पूर्ण करणार असाल, तर तुम्हाला पुढील वर्षी जानेवारी महिन्यात येणाऱ्या बँक सुट्ट्यांची माहिती घ्यावी. पुढील वर्षी जानेवारी महिन्यात नवीन वर्ष, गुरु गोविंद सिंग जयंती, मकर संक्रांती, विवेकानंद जयंती, प्रजासत्ताक दिन इत्यादी अनेक महत्त्वाच्या प्रसंग येत आहेत. या विशेष प्रसंगी बँका बंद राहतील. पुढील वर्षी जानेवारी महिन्यात बँका कोणत्या दिवशी बंद राहतील? जर तुम्हाला याची माहिती नसेल तर तुम्हाला बँकिंगशी संबंधित काम पूर्ण करण्यात अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. तथापि, आजच्या डिजिटल युगात, तुम्ही सुट्टीच्या दिवशीही बँकिंगशी संबंधित अनेक कामे ऑनलाइन करू शकता.
हेही वाचा>>>
Tirupati Online Darshan: व्यंकटरमणा...गोविंदा.. तिरुपती दर्शनासाठी ऑनलाइन तिकीट बुकिंग सुरू, कसं कराल बुकिंग? गर्दी टाळण्यासाठी काय काळजी घ्याल?
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

