Tirupati Online Darshan: व्यंकटरमणा...गोविंदा.. तिरुपती दर्शनासाठी ऑनलाइन तिकीट बुकिंग सुरू, कसं कराल बुकिंग? गर्दी टाळण्यासाठी काय काळजी घ्याल?
Tirupati Online Darshan: तिरुमला येथील भगवान व्यंकटेश्वर तिरुपती मंदिरात भाविकांच्या सोयीसाठी ऑनलाईन तिकीट बुकिंगची सुविधा सुरू करण्यात आली आहे.
Tirupati Online Darshan: तिरुमला तिरुपती देवस्थानम हे असं श्रद्धास्थान आहे, जिथे दरवर्षी लाखो भाविक (TTD) भेट देतात. तुम्ही इथे कधीही जाल तेव्हा तुम्हाला नेहमीच गर्दी दिसेल. देशाच्या कानाकोपऱ्यातून आणि जगाच्या विविध भागातून दररोज लाखो भाविक येथे येतात. मात्र आता याठिकाणी दर्शनासाठी आणखी गर्दी होणार असून, याचं कारण म्हणजे मंदिरातील वैकुंठ द्वार दर्शन... कसं कराल बुकिंग? गर्दी टाळण्यासाठी काय काळजी घ्याल? जाणून घ्या..
ऑनलाइन तिकीटासाठी सुरुवात
मंदिरातील वैकुंठ द्वार दर्शनासाठी 23 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजल्यापासून ऑनलाइन तिकीटासाठी सुरुवात झाली आहे. विशेष फॉर्म अर्थात विशेष प्रवेश दर्शन (SED) तिकिटाची सुविधा 24 डिसेंबरपासून म्हणजेच सुरू झाली आहे. सकाळी 11 वाजल्यापासून भाविकांसाठी ऑनलाइन बुकिंग लाइन सुरू करण्यात आली आहे. ऑनलाइन बुकिंगची माहिती ऐकून भाविक आणखीनच खूश झाले आहेत.
भाविकांना ऑनलाइन बुकिंगची सुविधा का देण्यात येतेय?
तिरुपती येथे दरवर्षी वैकुंठ एकादशी उत्सवाचे आयोजन केले जाते. यावर्षी 10 ते 19 जानेवारी 2025 या कालावधीत येणाऱ्या वैकुंठ एकादशीसाठी भक्तांसाठी बुकिंग सुविधा आधीच खुली करण्यात आली आहे. दरवर्षी वैकुंठ एकादशीला मंदिरात विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. तिरुपतीमधील थिम्मप्पा मंदिराच्या गर्भगृहाभोवतीचा आतील मार्ग वैकुंठ द्वार म्हणून ओळखला जातो. त्यामुळे येथे दरवर्षी एकादशी उत्सवात सहभागी होणे शुभ मानले जाते.
वैकुंठ दरवाजाच्या दर्शनासाठी जाणाऱ्यांनी काय काळजी घ्याल?
- वैकुंठ द्वार 10 ते 19 जानेवारीपर्यंत खुले राहणार आहे.
- एकादशीच्या वेळी वैकुंठ द्वारचे दर्शन घेणे ही भाग्याची गोष्ट आहे, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
- व्हीव्हीआयपींसाठी 10 जानेवारीला सकाळी 4.45 वाजता दर्शनाची सुविधा उपलब्ध होणार आहे.
- यानंतर सकाळी 9 ते 11 या वेळेत थिम्मप्पाची सुवर्ण रथातून मिरवणूक निघेल.
- त्यामुळे तुम्ही इथे जात असाल तर या प्रवासात सहभागी होण्यासाठी नक्की जा.
- द्वादशीच्या दिवशी म्हणजेच 11 जानेवारीला सकाळी 5.30 ते 6.30 या वेळेत मंदिरात चक्र स्नान होईल.
- भाविकांच्या हितासाठी वैकुंठ दर्शनादरम्यान दररोज सकाळी 6 ते दुपारी 12 वाजेपर्यंत अन्न प्रसाद दिला जाणार आहे.
तिकीट कसे बुक कराल?
- ऑनलाइन तिकीट बुक करण्यासाठी, भाविकांना प्रथम तिरुमला तिरुपती देवस्थानमच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
- येथे तुम्हाला अधिकृत वेबसाइटवर वेगवेगळ्या दर्शनासाठी वेगवेगळ्या पाससाठी तिकीट बुक करण्याचे पर्याय मिळतील.
- तुम्ही VIP किंवा सामान्य बुकिंगनुसार पर्यायावर क्लिक करा.
- येथे तुम्हाला प्रथम तुमच्या मोबाईल नंबरने लॉगिन करावे लागेल,
- त्यानंतर तुमच्या नंबरवर एक OTP येईल, जो वेबसाइटवर सबमिट करावा लागेल.
- सबमिशन केल्यानंतर, तुमच्यासमोर एक कॅलेंडर उघडेल, तारीख निवडा आणि बुक तिकिटावर क्लिक करा.
- यानंतर पेमेंट करा आणि तुमचे तिकीट बुक केले जाईल.
- तिरुपती दर्शनासाठी टूर पॅकेजही उपलब्ध आहेत.
हेही वाचा>>>
Mahakal Darshan: शिवभक्तांसाठी बातमी, उज्जैन महाकालच्या 'भस्म आरतीचे' ऑनलाइन बुकिंग बंद, 2025 साठी ऑफलाइन तिकिट 'येथे' मिळतील
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )