Health Tips : तुमच्या स्मार्टफोनद्वारेसुद्धा Covid-19 पसरू शकतो, अशा प्रकारे सॅनिटाईझ करा
Health Tips : Omicronचा धोका खूप वेगाने पसरतोय. यासाठी हातांबरोबरच मोबाईलची स्वच्छताही खूप महत्त्वाची आहे. अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला स्मार्टफोन कसा स्वच्छ करायचा ते सांगणार आहोत.
Covid-19 : कोविड -19 चा नवीन व्हेरियंट ओमायक्रॉन (omicron) खूप वेगाने पसरत आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या रूग्णांच्या संख्येने चिंता वाढवली आहे. यासाठी तुम्ही स्वतःला निरोगी ठेवणे आणि कोविड-19 पासून बचाव करण्यासाठी खबरदारी घेणे गरजेचे आहे. तुम्ही दररोज वापरत असलेली सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मोबाईल. हातांसोबतच मोबाईलची स्वच्छताही खूप गरजेची आहे. पण स्मार्टफोन साफ करताना किंवा सॅनिटाइज करताना तुम्हाला अनेक खबरदारी घ्यावी लागेल. आता, आम्ही तुम्हाला स्मार्टफोन कसा स्वच्छ करायचा ते सांगणार आहोत.
मोबाईल सॅनिटाईझ करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
- मोबाईलची स्क्रीन अतिशय नाजूक असते. त्यामुळे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे कोणतेही ओरखडे टाळण्यासाठी नेहमी लिंट-फ्री मायक्रोफायबर कापड वापरावे.
- तुम्ही तुमच्या स्मार्टफोन आणि टॅबलेटवर विंडो क्लीन्सर किंवा क्लिनिंग सॉल्व्हेंट्स कधीही वापरू नका. यामुळे तुमचे डिव्हाइस खराब होऊ शकते.
- अल्कोहोल-आधारित द्रावण वापरण्यापूर्वी तुमच्या स्मार्टफोनमध्ये स्क्रीनगार्ड असल्याची खात्री करा.
स्मार्टफोन योग्य प्रकारे स्वच्छ करण्याची प्रक्रिया
- डिव्हाइस बंद करा. निर्जंतुकीकरण करताना ते चालू ठेवू नका.
- स्क्रीनवरील घाण पुसण्यासाठी लिंट-फ्री मायक्रोफायबर कापड डावीकडून उजवीकडे आणि वरपासून खालपर्यंत वापरा.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
- Omicron Variant : ओमायक्रॉन व्हेरिएंटचे 'हे' आहे लक्षण, चाचणीपूर्वीच संसर्ग झाल्याचे कळेल
- Omicron : चिंता वाढली! ओमायक्रॉन व्हेरियंटचा नवा उपप्रकार BA.2, भारतात सापडले 530 नमुने; किती धोकादायक?
- Stealth Omicron : धोका वाढताच! ओमायक्रॉन व्हेरियंटचा नवा स्ट्रेन 'स्टिल्थ ओमायक्रॉन', 'या' बाबी जाणून घ्या...
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )