(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Health Tips : वयाच्या चाळीशीनंतर रोज खा अंडी, आरोग्याला मिळतील 'हे' फायदे
Health Tips : अंडी खाण्याचे अनेक फायदे आहेत. 40 वर्षांनंतर, दररोज एक अंडे खाल्ल्याने तुमची हाडे मजबूत होतील. याबरोबरच स्नायूही मजबूत होतील.
Egg Benefits : अंडी (Egg) खाण्याचे अनेक फायदे आहेत. अंडी हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. अंड्यात जीवनसत्त्व आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात. जरी दररोज एक अंडे खाल्ले तरी त्याचे शरीराला अनेक फायदे मिळतात.. अंडी हा प्रथिनांचा चांगला स्रोत आहे. त्यामुळे स्नायू मजबूत होतात. तसे, सर्व वयोगटातील लोकांनी अंडी खावीत. पण वाढत्या वयात निरोगी राहण्यासाठी रोज एक अंड खाल्लं गेलं पाहिजे. वयाच्या चाळीशीनंतर दररोज अंडी खाण्याचे काय फायदे आहेत ते जाणून घ्या.
चाळीशीनंतर रोज एक अंडे खाण्याचे फायदे
हाडे मजबूत होतील - वाढत्या वयात हाडे कमकुवत होणे स्वाभाविक आहे. अशा वेळी रोज एक अंडे खाणे फायदेशीर ठरू शकते. अंड्यांमध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी असते. हे दोन्ही घटक हाडे मजबूत करतात, अंडी हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक असतात.
सांधेदुखीपासून सुटका - वय वाढतं तसं शरीर कमकुवत होत जातं. अशा वेळी सांधेदुखी ही एक सामान्य समस्या आहे. पण रोज एक अंडे खाल्ल्यास सांधेदुखीपासून मुक्ती मिळते. अंड्यातील जीवनसत्त्वे हाडे आणि सांधेदुखीपासून आराम देतात. तसेच शरीरातील जीवनसत्त्वांची कमतरता दूर करते. अंडी हे व्हिटॅमिन बी 12 चा चांगला स्रोत आहे.
स्नायू मजबूत होतात - अंडी हे प्रथिनांचा चांगला स्रोत आहे. प्रथिने स्नायू तयार करतात. वाढत्या वयात स्नायू कमकुवत होतात, अशा वेळी रोज एक अंड खाणं फायदेशीर ठरते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :
- Lassa fever : ओमायक्रॉननंतर धुमाकूळ घालतोय 'लासा फिवर'; काय आहेत लक्षणं?
- Weight Loss : वजन कमी करण्यासाठी अनोशेपोटी घ्या 'हे' ड्रिंक्स
- Weight Loss : हळदीचा करा आहारात समावेश ; झटपट कमी होईल वजन
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha