Lassa fever : ओमायक्रॉननंतर धुमाकूळ घालतोय 'लासा फिवर'; काय आहेत लक्षणं?
Lassa Fever : ओमायक्रॉननंतर धुमाकूळ घालतोय धोकादायक 'लासा फिवर'. कुठे आढळून येतो व्हायरस?
Lassa Fever : जगभरात धुमाकूळ घालणारा कोरोना व्हायरसचा (Coronavirus) व्हेरियंट ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव सध्या आटोक्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. पण ओमायक्रॉनची चिंता दूर झाली असली तर आता आणखी एका नव्या आजारानं डोकं वर काढलं आहे. सध्या जगभरात लासा फिवरनं (Lassa Fever) चिंता वाढवली आहे. चिंताजनक बाब म्हणजे, हा ताप साधारण ताप नसून उंदरांमुळे याचा फैलाव होतो. या व्हायरसची लागण झाल्यानंतर रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणं दिसून येत नाहीत.
युनायटेड किंगडममध्ये लासा फिवरमुळं एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. या व्यक्तीला आधीच ओमायक्रॉनची लागण झाली होती. लासा फिवरचा व्हायरस प्रामुख्यानं पश्चिम आफ्रिकन देशांतील प्रवाशांमध्ये आढळून आला आहे. असं सांगितलं जात आहे की, 11 फेब्रुवारी रोजी निदान झालेल्या तीन व्यक्तींपैकी एकाचा मृत्यू झाला आहे. तसेच, लासा फिवरमुळे मृत्यूचं प्रमाण सध्या 1 टक्के असलं तरी, काही लोक आणि गर्भवती महिलांना त्यांच्या तिसऱ्या तिमाहीत याचा जास्त धोका असतो.
चिंतेची बाब म्हणजे, लासा फिवरची लागण झालेल्या 80 टक्के रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणं आढळून येत नाहीत. यूरोपियन सेंटर फॉर डिजीज प्रिवेंशन एंड कंट्रोल (CDC) च्या प्राथमिक विश्लेषणावरुन समजलं आहे की, या व्हायरसची लागण झालेल्या काही रुग्णांना गंभीर लक्षणांमुळे रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासते. तसेच रुग्णालयात दाखल झालेल्या 15 टक्के रुग्णांचा या व्हायरसमुळे मृत्यू होतो.
लासा फिवर म्हणजे काय?
लासा फिवर पहिल्यांदा 1969 मध्ये नायजेरियातील लासामध्ये आढळून आला होता. यादरम्यान या व्हायरसची लागण झाल्यामुळे दोन परिचारिकांचा मृत्यू झाला होता. हा व्हायरस सिएरा लियोन, गिनी, लाइबेरिया आणि नायजेरिया यांसारख्या पश्चिम आफ्रिकेतील देशांसाठी साधारण आहे. तसेच या व्हायरसचा फैलाव उंदरांमुळे होतो.
कसा पसरतो लासा फिवर?
लासा फिवर संक्रमित उंदरांच्या विष्ठेद्वारे आणि लघवीद्वारे पसरतो. जर एखादी व्यक्ती उंदराची विष्ठा आणि मूत्र यांच्या संपर्कात आली तर त्याला या व्हायरसचा संसर्ग होण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे त्या संक्रमित व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीलाही संसर्ग होऊ शकतो. क्वचित प्रसंगी, संसर्ग शारीरिक द्रव किंवा संक्रमित व्यक्तीचे डोळे, तोंड, नाक यांच्या संपर्कातून देखील पसरतो.
लासा फिवरची लक्षणं
लासा फिवरची लागण झालेल्या रुग्णांमध्ये थकवा, डोकेदुखी, अशक्तपणा, ताप यांसारखी लक्षणं आढळून येतात. तसेच याव्यतिरिक्त श्वास घेण्यात अडचण, चेहरा लाल होणं, रक्तस्त्राव, छातीत दुखणं, ओटीपोटात दुखणं किंवा उलट्या होऊ शकतात.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Weight Loss : वजन कमी करण्यासाठी अनोशेपोटी घ्या 'हे' ड्रिंक्स
- Weight Loss : हळदीचा करा आहारात समावेश ; झटपट कमी होईल वजन
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह | ABP Majha
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )