Weight Loss : वजन कमी करण्यासाठी अनोशेपोटी घ्या 'हे' ड्रिंक्स
Weight Loss Drinks : वाढलेले वजन कमी करण्यासाठी अनेकजण प्रयत्न करतात. मात्र आम्ही तुम्हाला वजन कमी करण्याची सोपी पद्धत सांगणार आहोत.
Weight Loss Drinks : आजकाल बहुतेक लोक त्यांच्या वाढत्या वजनामुळे हैराण झाले आहेत. लठ्ठपणामुळे सामान्य आजारापासून गंभीर अशा अनेक आजारांना सामोरे जावे लागते. त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. वजन कमी करण्यासाठी अनेक प्रकारचे आहार आणि खाण्याच्या पद्धती पाळल्या जातात. अशा परिस्थितीत, आपण वजन कमी करण्यासाठी आपल्या आहारात काही विशेष वजन कमी करणारे पेय म्हणजेच ड्रिंक्स समाविष्ट करू शकता. हे पेय सकाळी अनोशेपोटी प्यायल्याने चयापचय सुधारते. यासोबतच शरीराला ऊर्जा मिळते आणि वजनही कमी होते.
वजन कमी करणारी पेये
वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी कमी कॅलरीयुक्त आहार घ्यावा लागेल. वजन कमी करणारी ही पेये तुम्हाला जास्त कॅलरी वापरण्यापासून रोखतील. ही पेये रोज रिकाम्या पोटी प्यायल्याने तुमचे वजनही हळूहळू कमी होऊ लागते.
जिऱ्याचे पाणी : जिऱ्याचे पाणी वजन कमी करण्यासाठी उत्तम घरगुती उपाय म्हणून काम करते. जिऱ्याचे पाण्यामुळे चयापचय सुधारते, जे वजन कमी करण्यास मदत करते. याशिवाय पचनशक्तीही मजबूत होते. जिऱ्याचे पाणी प्यायल्याने शरीरात साचलेले विषारी पदार्थही सहज बाहेर पडतात. वजन कमी करण्यासाठी हे एक उत्तम पेय आहे. यासाठी तुम्ही रोज रात्री एक ग्लास पाण्यात एक चमचा जिरे भिजत ठेवा. हे पाणी सकाळी रिकाम्या पोटी सेवन करा.
कोथिंबिरीचे पाणी : कोथिंबिरीत अनेक औषधी गुणधर्म असतात. कोथिंबीरीचे पाणी वजन कमी करण्यासाठी देखील फायदेशीर आहे. शरीरात साचलेली सर्व घाणही सहज निघून जाते. हे पाणी प्यायल्याने शरीर डिटॉक्स होते, चरबीही जळते. यासाठी रात्री एका ग्लासमध्ये कोथिंबीर टाका. हे पाणी सकाळी रिकाम्या पोटी गाळून प्या. या पाण्याचे रोज सेवन केल्याने तुमचे वजन हळूहळू कमी होऊ लागते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
संबंधित बातम्या
- Omicron variant : त्वचेच्या 'या' प्रकारच्या समस्यांना थंडीचे दुष्परिणाम समजू नका, होऊ शकतो गंभीर परिणाम
- Sapota For Health : चिकू खाल्ल्याने मिळते झटपट एनर्जी, अशक्तपणा दूर होण्याबरोबरच शरीराला मिळतात 'हे' आश्चर्यकारक फायदे
- Omicron Variant : तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढवतात 'हे' सुपरफूड, जाणून घ्या याचे फायदे
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )