(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Weight Loss : हळदीचा करा आहारात समावेश ; झटपट कमी होईल वजन
Turmeric : हळदीचा जर तुम्ही आहारात समावेश केला तर तुमचे वजन झटपट कमी होऊ शकते.
Weight Loss Tips : सर्वांना माहित आहे की हळद (Turmeric) घातलेले दूध हे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. जर जखम झाली तर अनेकजण हळदीचा वापर औषध म्हणून करतात. सर्दी झाल्यावर देखील हळद घातलेले दूध पितात. काही लोकांना झोपायच्या आधी किंवा सकाळी उठल्यानंतर हळद टाकून दूध पिण्याची सवय असते. हळद उष्ण असते. हळदीचा जर तुम्ही आहारात समावेश केला तर तुमचे वजन झटपट कमी होऊ शकते.
हळदीचा आहारात समावेश केल्यानं ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात राहते. हळदीमुळे शरीरातील फॅट्स कमी होतात. हळदीमध्ये पोली फेनोल असते. ज्यामध्ये अँटी इन्फ्लेमेटरी आणि अँटीओबेसिटी हे गुण असतात. हे गुणधर्म शरीराच्या पांढर्या अनुकूली टिश्यूंमधील जळजळ आणि सूज कमी करण्यास मदत करतात. यासोबतच हळदीचे नियमित सेवन केल्याने पोटात असलेल्या 'बाइल' चे प्रमाणही वाढते. बाइलमुळे चरबी कमी होते.
दूध आणि हळद प्या
फॅट फ्रि दूधा गरम करून त्यामध्ये हळद मिक्स करून प्यावे. यामुळे वजन कमी होईल आणि इम्यूमिटी देखील वाढेल. हळद दुधामुळे पचन क्रिया चांगली होते.
हळदीचा चहा प्या
हळदीचा चहा बाजारांमध्ये अगदी सहज उपलब्ध होतो. गरम पाण्यात हळदीच्या चहाची टीबॅग टाकून त्या चहाचे सेवन करा. हे अत्यंत आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं. त्यामुळे रोज हळदीचा चहा प्या.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :
- Omicron variant : त्वचेच्या 'या' प्रकारच्या समस्यांना थंडीचे दुष्परिणाम समजू नका, होऊ शकतो गंभीर परिणाम
- Sapota For Health : चिकू खाल्ल्याने मिळते झटपट एनर्जी, अशक्तपणा दूर होण्याबरोबरच शरीराला मिळतात 'हे' आश्चर्यकारक फायदे
- Weight Loss Diet : पनीर खाल्ल्याने पोटाची चरबी कमी होते, जाणून घ्या पनीरचे आश्चर्यकारक फायदे
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha