(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Health Tips : उकाड्यामुळे एसीमध्ये झोपायची सवय लागलीये? जाणून घ्या काय होतील याचे दुष्परिणाम...
Health Tips : उन्हात आराम देणारा एसी तुम्हाला आजारी बनवू शकतो. जर, तुम्ही एसीमध्ये जास्त वेळ झोपलात, तर त्यामुळे तुमच्या आरोग्याला अनेक प्रकारे नुकसान होऊ शकते. जाणून घ्या...
AC Health Problems : उष्मा वाढत असल्याने लोकांना घराबाहेर पडणे कठीण होत आहे. उन्हापासून वाचण्यासाठी काही जण दिवसभर एसीमध्ये बसतात. एसीमध्ये राहिल्याने उष्णतेची झळ कमी होते. त्याच वेळी, काही लोक उष्णतेपासून वाचण्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधत असतात. काही लोक घरात कूलर लावतात, तर काहीजण उन्हापासून आराम मिळवण्यासाठी एसीचा वापर करतात. उन्हाळ्यात कूलरला जास्त आर्द्रता येऊ लागते, त्यामुळे बहुतेक लोक एसी लावतात. एसीमध्ये गेल्यावर लगेचच घाम सुकतो आणि उन्हापासून आराम मिळतो.
पण, तुम्हाला माहिती आहे का, की एसीमध्ये जास्त वेळ बसणे तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. एसीमध्ये बराच वेळ बसून, अचानक एसीमधून बाहेर आल्यावर उष्णता जास्त जाणवते. त्यामुळे आरोग्याची अधिक हानी होण्याचा धोका आहे. एसीमध्ये जास्त वेळ राहिल्यास जाणून घ्या, तुम्हाला कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
त्वचा कोरडी होऊ लागते : जेव्हा तुम्ही एसीमध्ये जास्त वेळ झोपता, तेव्हा ते तुमच्या त्वचेतील ओलावा हळूहळू शोषून घेते, ज्यामुळे तुमची त्वचा कोरडी होते. अशा परिस्थितीत त्वचेवर चमक हवी असेल, तर एसीमध्ये जास्त वेळ झोपू नका. यामुळे तुमची त्वचा कोरडी आणि निर्जीव होईल.
तब्येत खराब होऊ शकते : तुम्ही एसीमध्ये जास्त वेळ झोपल्यास तुम्हाला उष्णता जाणवत नाही आणि खूप थंडावा जाणवू शकतो. पण, त्यामुळे सर्दी होण्याची समस्या वाढतात. यामुळे तुम्हाला सर्दी, ताप आणि थंडीची समस्या होऊ शकते. अशा परिस्थितीत, लक्षात ठेवा की, फक्त काही वेळ एसी लावा आणि आजारी पडणे टाळा.
शरीरदुखी वाढवते : एसीमध्ये जास्त वेळ झोपल्याने हळूहळू शरीरात वेदना होऊ लागतात. रात्रभर एसीमध्ये झोपल्याने कंबरदुखी, डोकेदुखी इत्यादी समस्या होण्याची शक्यता वाढते. अशा स्थितीत शरीर दुखी टाळण्यासाठी काही वेळच एसीमध्ये राहा.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
- Health Tips : टरबूजाच्या बियांमध्ये आहेत अनेक गुणधर्म, जाणून घ्या याचे फायदे
- Health Care: प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी 'व्हिटॅमिन सी' आहे आवश्यक, जाणून घ्या आरोग्यदायी फायदे
- Health Tips : चुकूनही केळी आणि पपई एकत्र खाऊ नका, तब्येतीवर होऊ शकतात 'हे' गंभीर परिणाम
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )