Health Tips : डार्क चॉकलेट आरोग्यासाठी चांगले! असा विचार करून तुम्ही खूप चॉकलेट खाताय? तर सावधान...
Health Tips : डार्क चॉकलेट हा अँटिऑक्सिडंट्सचा उत्तम स्रोत आहे आणि आरोग्याच्या दृष्टीनेही उत्तम आहे. पण खरंच असं आहे का? पाहूया...
Dark Chocolate: आजकाल लोकांची सर्वात मोठी समस्या म्हणजे वाढते वजन (Weight Gain). प्रत्येक माणसाला आपले वजन नियंत्रणात ठेवायचे असते. जेव्हा जेव्हा आरोग्य (Health) आणि चॉकलेटचा प्रश्न येतो तेव्हा आपण अनेकदा डार्क चॉकलेटची निवड करतो. कारण डार्क चॉकलेट रक्तातील साखरेची पातळी (Sugar Level) कमी करण्यास मदत करते. डार्क चॉकलेट (Dark Chocolate) खाल्ल्याने तुमच्या मेंदूचे कार्य सुधारते आणि तुमची सतर्कताही वाढते. अनेक संशोधनांमध्ये असेही म्हटले गेले आहे की, डार्क चॉकलेट हे अँटीऑक्सिडंट्सचा उत्तम स्रोत आहे आणि आरोग्याच्या दृष्टीनेही चांगले आहे.
पण आज आम्ही तुम्हाला डार्क चॉकलेटबद्दल जी माहिती सांगणार आहोत, ती वाचून तुम्हाला थोडा विचार करावा लागेल. अमेरिकन ब्रँड 'Hershey' अलीकडे चर्चेत आहे. कारण त्याच्या गुणवत्ता तपासणीत एक धक्कादायक बाब समोर आली आहे. अमेरिकन ब्रँड Hershey च्या डार्क चॉकलेटमध्ये शिसे आणि कॅडमियमसारखे धातू मोठ्या प्रमाणात आढळून आले आहेत. जे मानवी आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक आहे.
डार्क चॉकलेट खाण्याचे अनेक फायदे
सामान्य चॉकलेटच्या तुलनेत डार्क चॉकलेट (Dark Chocolate) हे आरोग्यासाठी खूप चांगले मानले जाते. आतापर्यंतच्या अनेक संशोधनातून ही बाब समोर आली आहे. ऑक्सफॉर्ड युनिव्हर्सिटी (Oxford University) प्रेसच्या एका मासिकानेही याचे पुनरावलोकन केले आहे. कॅथरीन पी. बोंडानो यांच्या 2015 च्या संशोधनात असे आढळून आले की, डार्क चॉकलेटमध्ये काही असे घटक असतात जे खाल्ल्यानंतर आपल्या शरीराला आराम मिळतो आणि ते आपले बीपी देखील नियंत्रित ठेवते.
ConsumerReports.org पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, विविध ब्रँडच्या 28 प्रकारच्या डार्क चॉकलेटमध्ये आर्सेनिक, कॅडमियम, शिसे आणि पारा यांची पातळी तपासण्यात आली. पण त्यातून समोर आलेली माहिती चांगली नाही. चाचणी केलेल्या 28 पैकी 5 डार्क चॉकलेटमध्ये शिसे आणि कॅडमियमची पातळी जास्त होती, जी मानवी आरोग्यासाठी हानिकारक आहे.
डार्क चॉकलेट हानिकारक कसे?
डार्क चॉकलेट (Dark Chocolate) मध्ये या धातूंचे प्रमाण जास्त असल्याने ते वापरासाठी धोकादायक असल्याचे सिद्ध झाले आहे. ते गर्भाच्या विकासाच्या विविध समस्यांना कारणीभूत ठरू शकतात, म्हणून गर्भवती महिलांना त्यांच्या आहारात कोणत्याही अशा प्रकारच्या खाद्याचा समावेश न करण्याची चेतावणी दिली जाते. हे लहान मुलांसाठी देखील सुरक्षित नाही, कारण यामुळे मेंदूचा विकास खुंटू शकतो आणि IQ कमी होऊ शकतो. जर्नल ऑफ इकोटॉक्सिकोलॉजी अँड एन्व्हायर्नमेंटल सेफ्टीमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, कॅडमियमच्या उच्च पातळीचे आयुष्यभर सेवन केल्यास मूत्रपिंडावर परिणाम होऊ शकतो.
संबंधित बातम्या:
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )