The Kashmir Files ,Varun Dhawan : 'द कश्मीर फाइल्स'चं कौतुक केल्यानंतर वरूण धवन ट्रोल; नेटकरी म्हणाले...
वरुण धवन (Varun Dhawan) नं पोस्ट शेअर केल्यानंतर त्याला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं.
The Kashmir Files ,Varun Dhawan : गेली काही दिवस द कश्मीर फाइल्स (The Kashmir Files) या चित्रपटाची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. प्रेक्षक या चित्रपटाबद्दल संमिश्र प्रतिक्रिया देत आहेत. बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) नं या चित्रपटाबद्दल नुकतीच एक पोस्ट शेअर केली. वरूणनं या चित्रपटाचं कौतुक केलं आहे. पण पोस्ट शेअर केल्यानंतर नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केल.
वरूणची पोस्ट
वरूणनं पोस्टमध्ये लिहिले, 'हा सर्वात हार्ट हिटिंग चित्रपट आहे. सर्व टेक्नीशियन्सनं चांगलं काम केलं आहे. अनमुपम खेर यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात यावं,दर्शन कुमार, पल्लवी जोशी, मिथुन सर आणि दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी चांगलं काम केलं आहे.'
नेटकऱ्यांनी वरूणला केलं ट्रोल
'आत्तापर्यंत तु कुठे होतास भावा, हा तुझा ढोंगीपणा आहे', अशी कमेंट करत एका नेटकऱ्यानं वरूणला ट्रोल केलं आहे. तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, 'हळू हळू सर्व जण लाइनवर येत आहेत.' एक नेटकरी म्हणाला, 'जेव्हा चित्रपटाचं प्रमोशन करायचं होतं तेव्हा कोणी आलं नाही. आता हळू हळू या लोकांनी कौतुक करायला सुरूवात केली.' काही लोकांनी वरूणच्या या पोस्टचं कौतुक केलं आहे. 'आम्हाला तुझा अभिमान वाटतो', असं म्हणत एका नेटकऱ्यानं वरूणचं कौतुक केलं.
View this post on Instagram
द कश्मीर फाइल्सचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ
'द कश्मीर फाइल्स' रिलीजच्या 6व्या दिवशी, चित्रपटाने 19.05 कोटी रुपयांची कमाई केली. आता या चित्रपटाचे एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन 79.25 कोटी रुपये. 11 मार्च रोजी हा चित्रपट रिलीज झाला होता.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Russia-Ukraine War : देशासाठी आधी हातात रॅकेट घेतलं, बलाढ्य फेडररला हरवलं, आता रशियाला हरवण्यासाठी रायफल हाती!
- व्लादिमीर पुतीन यांच्यावर टीका करणाऱ्या मॉडेलचा मृतदेह सुटकेसमध्ये सापडला!
- Russia Ukraine : रशियासोबतचे युद्ध संपेना; युक्रेनला अमेरिकेकडून मोठी लष्करी मदत जाहीर
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha