एक्स्प्लोर

India vs New Zealand, Final T20 World Cup: टीम इंडियाला न्यूझीलंडच्या 'फाईव्ह स्टार राॅकेट'चा अडथळा! एकाचं सर्वात जलद शतक, दुसऱ्याने 3 अर्धशतके ठोकली अन् उर्वरित दोघांनी..

संपूर्ण स्पर्धेत भारतीय संघाने वर्चस्व राखले असले तरी, न्यूझीलंडचे काही प्रमुख खेळाडू भारताचे 'विश्वविजेते' बनण्याचे स्वप्न धुळीस मिळवू शकतात.

India vs New Zealand, Final T20 World Cup: टी-20 वर्ल्ड कपच्या महाअंतिम सामन्यात आज भारत आणि न्यूझीलंड हे दोन बलाढ्य संघ आमनेसामने येणार आहेत. संपूर्ण स्पर्धेत भारतीय संघाने वर्चस्व राखले असले तरी, न्यूझीलंडचे काही प्रमुख खेळाडू भारताचे 'विश्वविजेते' बनण्याचे स्वप्न धुळीस मिळवू शकतात. भारताला साखळी फेरीत दक्षिण आफ्रिकेने पराभूत केले होते, तर अमेरिका आणि वेस्ट इंडिजनेही कडवी झुंज दिली होती. त्यामुळे अंतिम सामन्यात किवी संघाला हलक्यात घेणे भारताला महागात पडू शकते.

न्यूझीलंडच्या विजयाची धुरा प्रामुख्याने या 5 खेळाडूंवर असेल:

1. फिन ॲलन: वादळी सलामीवीर

फिन ॲलन सध्या कारकिर्दीतील सर्वोत्तम फॉर्ममध्ये आहे. त्याने 7 डावात 200 पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने 289 धावा कुटल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अवघ्या 33 चेंडूंत त्याने टी-20 वर्ल्ड कपच्या इतिहासातील सर्वात वेगवान शतक झळकावले. ॲलनने अर्धशतक केल्यावर न्यूझीलंडने 9 विकेट्सनी विजय मिळवला आहे, ही आकडेवारी भारतीय गोलंदाजांची झोप उडवणारी आहे.

2. रचिन रवींद्र: अष्टपैलू 'मॅजिक'

रचिन रवींद्रने 6 डावात 128 धावा करण्यासोबतच 8 सामन्यात 11 बळी घेतले आहेत. श्रीलंकेविरुद्धच्या 'करा किंवा मरा' सामन्यात त्याने 4/27 अशी कामगिरी करत सामनावीराचा किताब पटकावला होता. मधल्या षटकांत त्याची फिरकी भारतीय फलंदाजांना जाळ्यात अडकवू शकते.

3. मिचेल सँटनर: अनुभवी कर्णधार

न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनर अत्यंत किफायती गोलंदाजी (6.33 इकॉनॉमी) करत आहे. त्याने 1 हजार धावा आणि 100 बळी घेणारा पहिला किवी खेळाडू होण्याचा मान मिळवला आहे. कठीण प्रसंगी त्याने खालच्या फळीत फलंदाजी करत संघाला सावरले आहे, ज्यामुळे तो 'मॅच विनर' ठरतो.

4. मॅट हेन्री: स्विंगचा बादशाह

मॅट हेन्रीने 8 सामन्यांत 9 बळी घेत न्यूझीलंडच्या वेगवान आक्रमणाचे नेतृत्व केले आहे. त्याची स्विंग आणि अचूक टप्पा भारताच्या टॉप ऑर्डरसाठी (रोहित-विराट) घातक ठरू शकतो. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताचे 5 बळी घेण्याचा अनुभव त्याच्या गाठीशी आहे.

5. टिम सायफर्ट: स्फोटक फलंदाजी

सायफर्टने या स्पर्धेत 3 अर्धशतकांच्या मदतीने २७४ धावा केल्या आहेत. 161 च्या स्ट्राईक रेटने खेळणारा सायफर्ट फिन ॲलनसोबत मिळून भारतावर सुरुवातीपासूनच दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करेल.

भारताची रणनीती काय असावी?

भारतीय संघाला जर जेतेपद पटकावायचे असेल, तर फिन ॲलनला पॉवरप्लेमध्येच बाद करणे आणि रचिन रवींद्रच्या फिरकीवर सावध खेळ करणे आवश्यक आहे. या पाच खेळाडूंव्यतिरिक्त ग्लेन फिलिप्स आणि डॅरिल मिचेल यांच्यावरही लक्ष ठेवावे लागेल.

इतर महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rashid Khan: 'आयपीएलच्या 2023 च्या मोसमात मला अफगाणिस्तान सोडून...' राशिद खानचा सनसनाटी खुलासा! नेमकं काय म्हणाला फिरकी स्टार?
'आयपीएलच्या 2023 च्या मोसमात मला अफगाणिस्तान सोडून...' राशिद खानचा सनसनाटी खुलासा! नेमकं काय म्हणाला फिरकी स्टार?
IPL 2026 CSK vs SRH: IPL मध्ये काळीजादू...लिंबू घेऊन तंत्रमंत्र, CSK ची बीसीसीआयकडे तक्रार, SRH विरुद्धच्या सामन्यात काय घडलं?, VIDEO
IPL मध्ये काळीजादू...लिंबू घेऊन तंत्रमंत्र, CSK ची बीसीसीआयकडे तक्रार, SRH विरुद्धच्या सामन्यात काय घडलं?, VIDEO
IPL 2026 PBKS vs LSG: 3 कॅच सोडल्या, रिकी पॉन्टिंग संतापला; श्रेयस अय्यर शशांक सिंहला तोंड लपवून घेऊन गेला, VIDEO
3 कॅच सोडल्या, रिकी पॉन्टिंग संतापला; श्रेयस अय्यर शशांक सिंहला तोंड लपवून घेऊन गेला, VIDEO
IPL 2026 PBKS vs LSG : नवा राजा, नवा रुबाब! श्रेयससमोर ऋषभ पंतची शरणागती, पंजाबचा विजयरथ सुसाट, तर लखनऊच्या पराभवाची हॅट्रिक
नवा राजा, नवा रुबाब! श्रेयससमोर ऋषभ पंतची शरणागती, पंजाबचा विजयरथ सुसाट, तर लखनऊच्या पराभवाची हॅट्रिक
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Navneet Rana vs Vijay Wadettiwar | महिला आरक्षणावरुन राणा विरुद्ध काँग्रेस Special Report
Ralegaon Special Report : खरात,टीसीएस,परतवाड्यानंतर आता राळेगाव! यवतमाळमध्ये आदिवासी मुलींची तस्करी
Narishakti Bill Special Report :पंतप्रधानांविरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार,मोदी सरकारवर जोरदार टीका
Special Report Mumbai Local : मुंबईमध्ये आता अंडरग्राऊंड लोकल सुरु होणार?
Shyam Manav Akola : अशोक खरात प्रकरण सरकारचंच पाप, श्याम मानव यांची प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rashid Khan: 'आयपीएलच्या 2023 च्या मोसमात मला अफगाणिस्तान सोडून...' राशिद खानचा सनसनाटी खुलासा! नेमकं काय म्हणाला फिरकी स्टार?
'आयपीएलच्या 2023 च्या मोसमात मला अफगाणिस्तान सोडून...' राशिद खानचा सनसनाटी खुलासा! नेमकं काय म्हणाला फिरकी स्टार?
Kolhapur Crime: ऑनलाईन गेमिंगमध्ये लावलेले सगळे पैसे हरला, कोल्हापुरात तरुणाने नैराश्याच्या भरात आयुष्य संपवलं; अवघ्या वर्षभरापूर्वीच वडिलांचे निधन
ऑनलाईन गेमिंगमध्ये लावलेले सगळे पैसे हरला, कोल्हापुरात तरुणाने नैराश्याच्या भरात आयुष्य संपवलं; अवघ्या वर्षभरापूर्वीच वडिलांचे निधन
Hingoli Crime : अनैसर्गिक संबंधांसाठी नांदेड पोलीस अधीक्षक कार्यालयातील लिपिकाचा तगादा, सततच्या त्रासाला कंटाळून 24 वर्षीय तरुणाने आयुष्य संपवलं, कळमनुरी हादरलं!
अनैसर्गिक संबंधांसाठी नांदेड पोलीस अधीक्षक कार्यालयातील लिपिकाचा तगादा, सततच्या त्रासाला कंटाळून 24 वर्षीय तरुणाने आयुष्य संपवलं, कळमनुरी हादरलं!
Sudhir Mungantiwar vs Kishor Jorgewar: 'हा वाद माझ्या आटोक्याबाहेर'; चंद्रपुरातील मुनगंटीवार-जोरगेवार वादासमोर भाजप प्रदेशाध्यक्षांनी टेकले हात, आता थेट दिल्लीतून होणार फैसला, नेमकं काय घडलं?
'हा वाद माझ्या आटोक्याबाहेर'; चंद्रपुरातील मुनगंटीवार-जोरगेवार वादासमोर भाजप प्रदेशाध्यक्षांनी टेकले हात, आता थेट दिल्लीतून होणार फैसला, नेमकं काय घडलं?
Sanjeev Jaiswal Motilal nagar: 'घरं कशी मिळतात बघतो, तू घुसखोर आहेस का?, इथूनच उचलतो', म्हाडाच्या संजीव जयस्वालांची रहिवाशांच्या बैठकीत मुजोरी
'घरं कशी मिळतात बघतो, तू घुसखोर आहेस का?, इथूनच उचलतो', म्हाडाच्या संजीव जयस्वालांची रहिवाशांच्या बैठकीत मुजोरी
Bigg Boss Marathi 6 Deepali Sayed Post: पाच लाखांची पैशांची बॅग खाली ठेवली; बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताच दिपाली सय्यदची पहिली पोस्ट, म्हणाली..
पाच लाखांची पैशांची बॅग खाली ठेवली; बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताच दिपाली सय्यदची पहिली पोस्ट, म्हणाली..
Local Train Accident Dombivli: मोठी बातमी: डोंबिवलीत लोकल ट्रेनचा डबा रुळावरुन खाली घसरला, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
मोठी बातमी: डोंबिवलीत लोकल ट्रेनचा डबा रुळावरुन खाली घसरला, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
Ameet Satam BMC Fund: बीएमसीच्या निधी वाटपात ‘साटम फॅक्टर’ची जोरदार चर्चा; भाजपमध्ये अंतर्गत नाराजीचा सूर?
बीएमसीच्या निधी वाटपात ‘साटम फॅक्टर’ची जोरदार चर्चा; भाजपमध्ये अंतर्गत नाराजीचा सूर?
Embed widget