एक्स्प्लोर

इन्स्टा Live करताना 150च्या स्पीडने गाडी डिव्हाडरला धडकली; रस्त्यावर तडफडताना दिसला 'बिग बॉस'फेम अभिनेता, मॅनेजरनं सांगितली परिस्थिती

त्याची कार सुमारे 150 च्या वेगाने धावत असल्याचा सांगितलं जात आहे. मेरठ एक्सप्रेसवर कार अनियंत्रित होऊन डिवाइडरला जाऊन धडकली.

Bigg boss Fame Actor Accident Update: लोकप्रिय यूट्यूबर आणि 'बिग बॉस 17'फेम अनुराग डोभाल (Anurag Dobhal) सध्या गंभीर अपघातामुळे रुग्णालयात दाखल आहे. इंस्टावर Live स्ट्रीम करत असताना भरधाव वेगात धावणारी त्याची कार अचानक डिव्हायडरला धडकली आणि हा संपूर्ण प्रकार कॅमेरात कैद झाला. अपघातानंतर कारचा चक्काचूर झाला असून युट्युबर अनुराग सध्या ICU मध्ये उपचार घेत आहे. त्याच्या मॅनेजरने सोशल मीडियावर पोस्ट करत त्याच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली आहे. 

Live स्ट्रीम दरम्यान भीषण अपघात

मिळालेल्या माहितीनुसार अपघाताच्यावेळी 'बिग बॉस 'फेम अभिनेता अनुराग डोभाल instagram वर Live स्ट्रीम करत होता. त्यावेळी तो अत्यंत त्रासलेला दिसला.  प्रचंड तणावाखाली तो दिसत होता. गाडी चालवताना तो रडतानाही दिसला. हजारो चाहते त्याला इन्स्टा Live वर पहात होते. कौटुंबिक कलहाविषयी तू बोलत होता. 'मम्मी पुढच्या वेळी मी येईन तेव्हा माझ्यावर खूप प्रेम करा ' असं म्हणताना तो दिसला. लाईव्ह दरम्यान त्याची गाडी खूप वेगाने जात होती. तो वारंवार स्वतःचा जीव घेण्याबद्दल बोलत होता. 'हा माझा शेवटचा निरोप आहे 'असं लाईव्ह व्हिडिओच्या शेवटी म्हणाला आणि त्याची गाडी क्रॅश झाली. त्याची कार सुमारे 150 च्या वेगाने धावत असल्याचा सांगितलं जात आहे. मेरठ एक्सप्रेसवर कार अनियंत्रित होऊन डिवाइडरला जाऊन धडकली. ही धडक इतकी जोरदार होती की Live प्रिमिंग अचानक बंद झालं. त्याच्या कारचा चक्काचूर झाला . हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून अपघातानंतर घटनास्थळी लोकांची गर्दी जमली होती. अनेकांनी अनुरागला मदत करण्याचा प्रयत्न केला. भीषण अपघातानंतर रस्त्यावर जखमी अवस्थेत तो तडफडताना दिसला. त्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये काळजीचे वातावरण होते. 

 

सध्या कशी आहे प्रकृती ?

अपघातानंतर अनुरागला तातडीने मेरठ येथील 'सुभारती हॉस्पिटल' येथे दाखल करण्यात आले.अनुरागचा मॅनेजर रोहित पांडे याने instagram स्टोरीवर माहिती देत त्याच्या प्रकृती विषयी माहिती दिली. त्याने लिहिलं ' अनुरागला दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आला असून तो आयसीयूमध्ये उपचार घेत आहे. चाहत्यांनी त्याच्यासाठी प्रार्थना करावी असं आवाहनही त्याने केले आहे.' आम्ही सर्वजण डॉक्टरांच्या संपर्कात आहोत. जे लोक आम्हाला सपोर्ट करत आहेत त्यांचे मनापासून आभार. विशेषतः त्याचा अपघात नेमका कुठे झाला आहे हे शोधण्यासाठी आम्हाला मदत करणाऱ्या चाहत्यांचे आभार. तुम्ही खरंच देवासारखे आलात. हेच कमावलं आहे Uk भाईने ... तुम्ही नसला असता तर काय झालं असतं. कितीही आभार मानले तरी ते कमी आहेत. त्याला काही होऊ देणार नाही हे माझे वचन आहे तुम्हा सगळ्यांना. खूप खूप धन्यवाद. सोशल मीडियावरचे फॉलोवर्स खरे नसतात असं अनेकजण म्हणतात. चार-पाच लोकांनी हे दाखवून दिलं की हे खरे असतात.' 


इन्स्टा Live करताना 150च्या स्पीडने गाडी डिव्हाडरला धडकली; रस्त्यावर तडफडताना दिसला 'बिग बॉस'फेम अभिनेता, मॅनेजरनं सांगितली परिस्थिती

कौटुंबिक वादामुळे तणावात होता अनुराग

काही दिवसांपासून अनुराग डोभाल कौटुंबिक वादामुळे मानसिक तणावत असल्याचे सांगितलं जात आहे. 5 मार्च रोजी त्याने youtube वर जवळपास दोन तासाचा व्हिडिओ शेअर करत वैयक्तिक आयुष्यातील समस्यांबाबत सांगितलं होतं. या व्हिडिओमध्ये त्याने आई-वडील आणि भावावर मानसिक छळ केल्याचा आरोप केला होता.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajay Atul: बापाच्या सुरांनी महाराष्ट्र वेडावला, आता लेक काळजात घर करणार! अतुल यांच्या मुलाची 'राजा शिवाजी'च्या अँथम साँगमध्ये दिसली पहिली झलक
बापाच्या सुरांनी महाराष्ट्र वेडावला, आता लेक काळजात घर करणार! अतुल यांच्या मुलाची 'राजा शिवाजी'च्या अँथम साँगमध्ये दिसली पहिली झलक
Bigg Boss: विशाल कोटियनसाठी खुशखबर; बिग बॉसच्या फिनाले आधीच मोठी गोष्ट घडली, चाहतेही आनंदी
विशाल कोटियनसाठी खुशखबर; बिग बॉसच्या फिनाले आधीच मोठी गोष्ट घडली, चाहतेही आनंदी
Shiv Thakare: 'बिग बॉसमध्ये जाण्यापूर्वी ब्रेकअप, 9 वर्षांचं रिलेशनशिप...' शिव ठाकरेनं सांगितली कॉलेजमधील प्रेमाची गोष्ट
'बिग बॉसमध्ये जाण्यापूर्वी ब्रेकअप, 9 वर्षांचं रिलेशनशिप...' शिव ठाकरेनं सांगितली कॉलेजमधील प्रेमाची गोष्ट
Bigg Boss Marathi 6: बिग बॉसच्या घरात ‘लाइव्ह कॉन्सर्ट’! अभिजितच्या एन्ट्रीने सगळेच झाले फॅन; हे 'एव्हरग्रीन' गाणं म्हणत दिला सुखद धक्का
बिग बॉसच्या घरात ‘लाइव्ह कॉन्सर्ट’! अभिजितच्या एन्ट्रीने सगळेच झाले फॅन; हे 'एव्हरग्रीन' गाणं म्हणत दिला सुखद धक्का
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

PM Modi UNCUT : काँग्रेसने महिलांच्या अधिकारांची भ्रूणहत्या केली, स्वप्नांचा चक्काचूर केला- मोदी
PM Modi on Women Reservation Bill : काँग्रेसने त्यांचं अस्तित्व गमावलं तुफान हल्लाबोल
PM Modi on Women Reservation Bill : नारीशक्ती विधेयक नामंजूर, पंतप्रधान मोदींनी मागितली माफी
Sanjay Raut PC : 'मोदी हैं तो नामुमकिन हैं' अशी परिस्थिती, राऊतांचा हल्लाबोल
Sharad Ponkshe Nanded Speech : 1 लाख खरात एकत्र केले तर 1 अकबर तयार होईल, शरद पोंक्षे यांचं विधान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Crude Oil in India : जगाला चकवा देत जया, डोरना आणि फेलिसिटी भारतात दाखल, हॉर्मुझमधून 60 लाख बॅरेल इराणी तेल देशात
जगाला चकवा देत जया, डोरना आणि फेलिसिटी भारतात दाखल, हॉर्मुझमधून 60 लाख बॅरेल इराणी तेल देशात
AI In Power Sector : वीजपुवठा सुरळीत ठेवण्यासाठी AI चा वापर करा; मुख्यमंत्र्यांचे ऊर्जा विभागाला निर्देश
वीजपुवठा सुरळीत ठेवण्यासाठी AI चा वापर करा; मुख्यमंत्र्यांचे ऊर्जा विभागाला निर्देश
महागाई भत्त्यात केंद्र सरकारकडून मोठी वाढ; 50 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 69 लाख निवृत्तीवेतनधारकांना फायदा होणार
महागाई भत्त्यात केंद्र सरकारकडून मोठी वाढ; 50 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 69 लाख निवृत्तीवेतनधारकांना फायदा होणार
Iran War Live Update: अमेरिकेला लाल समुद्रातील हुथी बंडखोरांची धडकी भरली; जगातील सर्वाधिक शक्तिशाली नौदलाच्या युद्धनौकेला अख्ख्या आफ्रिका खंडाला वळसा घालून इराणकडे येण्याची वेळ!
अमेरिकेला लाल समुद्रातील हुथी बंडखोरांची धडकी भरली; जगातील सर्वाधिक शक्तिशाली नौदलाच्या युद्धनौकेला अख्ख्या आफ्रिका खंडाला वळसा घालून इराणकडे येण्याची वेळ!
Iran War Live Update: 'तोपर्यंत जहाजांना होर्मुझमधून जहाजांना अजिबात जाऊ देणार नाही' इराणनं अवघ्या 24 तासांमध्येच मार्ग करत जगाची नाडी पुन्हा आवळली, अमेरिकेला गर्भित इशारा
'तोपर्यंत जहाजांना होर्मुझमधून जहाजांना अजिबात जाऊ देणार नाही' इराणनं अवघ्या 24 तासांमध्येच मार्ग करत जगाची नाडी पुन्हा आवळली, अमेरिकेला गर्भित इशारा
Pat Cummins: वनडे वर्ल्डकपमध्ये 140 कोटी जनतेला एका झटक्यात शांत करणारं 'ब्रह्मास्त्र' हैदराबाद संघात दाखल, तरीही संघाचं टेन्शन कायम!
वनडे वर्ल्डकपमध्ये 140 कोटी जनतेला एका झटक्यात शांत करणारं 'ब्रह्मास्त्र' हैदराबाद संघात दाखल, तरीही संघाचं टेन्शन कायम!
Rahul Gandhi on Women's Reservation Bill: राहुल गांधींच्या भाषणावेळी 'ती' गोष्ट सर्वांच्याच नजरेत भरली, एका कृतीने देशभरातील महिलांना सूचक संदेश
राहुल गांधींच्या भाषणावेळी 'ती' गोष्ट सर्वांच्याच नजरेत भरली, एका कृतीने देशभरातील महिलांना सूचक संदेश
Priyanka Gandhi on BJP: संसदेत तुम्ही स्वत:ला महिलांचे कैवारी म्हणवून घेता, पण उन्नाव, हाथरस, मणिपूरमध्ये सगळ्यांनी पाहिलंय... प्रियांका गांधींचा भाजपला सणसणीत टोला
संसदेत तुम्ही स्वत:ला महिलांचे कैवारी म्हणवून घेता, पण उन्नाव, हाथरस, मणिपूरमध्ये सगळ्यांनी पाहिलंय... प्रियांका गांधींचा भाजपला सणसणीत टोला
Embed widget