(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Russia-Ukraine War : देशासाठी आधी हातात रॅकेट घेतलं, बलाढ्य फेडररला हरवलं, आता रशियाला हरवण्यासाठी रायफल हाती!
Russia-Ukraine War : रशिया आणि युक्रेनमध्ये मागील तीन आठवड्यांपासून युद्ध सुरु आहे. कुणीही मागे हटण्यास तयार नाही.
Russia-Ukraine War : रशिया आणि युक्रेनमध्ये मागील तीन आठवड्यांपासून युद्ध सुरु आहे. कुणीही मागे हटण्यास तयार नाही. अशातच रशियासारख्या मोठ्या देशाचा सामना कऱण्यासाठी युक्रेनमधील खेळाडूही सरसावले आहेत. देशासाठी सर्वसामान्य नागरिक युद्धाच्या मैदानात उतरले आहेत. देशासाठी मैदानात उतरणाऱ्या युक्रेनच्या सर्जी स्तिखोस्की या टेनिसपटूचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सर्जी स्तिखोस्की याने टेनिस कोर्टावर रॉजर फेडररचाही पराभव केला होता. सर्जी स्तिखोस्की याची सध्या चर्चा सुरु आहे.
36 वर्षीय सर्जी स्तिखोस्की याने आपल्या टेनिस करिअरमध्ये चार वेळा एटीपी चषकावर नाव कोरलेय. इतकेच नाही तर सर्जी स्तिखोस्की याने 2013 मध्ये विम्बल्डन स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीमध्ये रॉजर फेडररला हरवलं होतं. त्याच सर्जी स्तिखोस्की देशासाठी टेनिस रॅकेटऐवजी हातात एके रायफल घेतली आहे. कधी काळी टेनिस कोर्टवर लढणारा युक्रेनचा हा खेळाडू रशिया विरुद्ध लढाईच्या मैदानात उतरला आहे. सर्जी स्तिखोस्की याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सर्जी स्तिखोस्की युक्रेनच्या राखीव पोलिसांत दाखल झाला आहे. तो रशियाविरोधात लढत आहे. देशासाठी त्याने टेनिस रॅकेटसोडून रायफल हातात घेतली आहे.
मला माझ्या देशाच्या सैन्याचा आणि राष्ट्रपती झेलेन्सकी यांचा अभिमान आहे. तसेच मी युक्रेनमध्ये असल्याचाही मला अभिमान आहे. माझ्या सैन्यावरही मला विश्वास आहे. आपल्या विजयी पराक्रमावर विश्वास ठेवा. युक्रेनचा विजय असो, अशी इन्स्टाग्राम पोस्ट काही दिवसांपूर्वी सर्जी स्तिखोस्की याने केली होती. सर्जी स्तिखोस्कीसह युक्रेनचे इतरही अनेक खेळाडू आणि सर्वसामान्य नागरिक देशासाठी सैन्यासोबत उभे राहिले आहेत. दरम्यान, 36 वर्षीय सर्जी स्तिखोस्की याच्याआधी विटाली क्लित्शकोनेही रायफल घेतल आहे. विताली माजी चॅम्पियन बॉक्सर आहे. इतकेच नाही तर कीवचे महापौर आणि त्यांचे भाऊ व्लादिमीर क्लित्शको यांनाही रायफल उचलली आहे. दरम्यान, रशिया आणि युक्रेनमधील संघर्षात शेकडो लोक मारले गेले आहेत. शिवाय युक्रेमधील पूल, शाळा आणि अपार्टमेंट इमारतींचे मोठे नुकसान झाले आहे.