Tom Holland-Zendaya : 'स्पायडर मॅन' कपल टॉम हॉलेंड अन् झेंडायाने गुपचूप उरकला साखरपुडा, अभिनेत्रीच्या महागड्या डायमंड रिंगने वेधलं लक्ष
Tom Holland-Zendaya Engagement : 'स्पायडर मॅन' फेम कपल अभिनेता टॉम हॉलेंड आणि अभिनेत्री झेंडाया यांनी गुपचूप साखरपुडा उरकला आहे.
Tom Holland-Zendaya Engagement : हॉलिवूडमधील प्रसिद्ध कपल अभिनेता टॉम हॉलेंड आणि अभिनेत्री झेंडाया यांचा साखरपुडा झाला आहे. 'स्पायडर मॅन' फेम स्टार कपल अभिनेता टॉम हॉलेंड आणि अभिनेत्री झेंडाया यांनी गुपपूच साखरपुडा उरकला आहे. टॉम आणि झेंडाया बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करत आहेत. आता दोघांनीही गुपचूप इंगेजमेट केल्याच्या बातम्या समोर येत आहेत. अलीकडेच, अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे 82 वा गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळा पार पडला, ज्यामध्ये अभिनेत्री झेंडायाने सहभागी झाली होती. या कार्यक्रमात झेंडायाच्या हातातील डायमंड रिंगने सर्वांच लक्ष वेधलं आहे.
'स्पायडर मॅन' कपलची गुपचूप इंगेजमेंट
अलीकडेच, स्पायडर-मॅनमधील भूमिकेसाठी प्रसिद्ध टॉम हॉलंड आणि झेंडाया यांच्या साखरपुडा झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत. गोल्डन ग्लोब्स पुरस्कार सोहळ्यात झेंडायाच्या उपस्थितीनंतर, अनेक मीडिया रिपोर्टमध्ये सांगण्यात येत आहे की, दोघांनी गुपचूप साखरपुडा उरकला आहे. आता त्यांच्या साखरपुड्याशी संबंधित एक अतिशय मनोरंजक गोष्ट समोर आली आहे. झेंडायासोबतच्या नाताला एक पाऊल पुढे नेण्यापूर्वी टॉमने तिच्या वडिलांची परवानगी मागितली होती, असं म्हटलं जात आहे.
टॉम हॉलेंड अन् झेंडायाने गुपचूप उरकला साखरपुडा
View this post on Instagram
टॉमने झेंडायाच्या वडिलांकडून मागितली परवानगी
जस्ट जेरेडच्या वृत्तानुसार, टॉम हॉलंडने ख्रिसमसच्या सुट्टीत झेंडायाला प्रपोझ केल्याचं सांगितलं जात आहे. झेंडायाला प्रपोझ करण्याआधी टॉमने झेंडायाच्या वडिलांकडून परवानगी मागितली होती, अशी माहिती समोर आली आहे. टॉम हॉलंड आणि झेंडाया यांनी ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या सुट्ट्या तिच्या अमेरिकेतील घरी साजऱ्या केल्या. यावेळीच टॉमने अत्यंत खाजगी कार्यक्रमात झेंडायाला प्रपोझ केल्याची माहिती आहे. मीडिया रिपोर्टनुसार, टॉमने काही महिन्यांपूर्वी झेंडायाचे वडील काझेम्बे अजामू कोलमन यांच्याकडे यासाठीची परवानगी मागितली होती, असं सांगितलं जात आहे.
झेंडायाची महागडी डायमंड रिंग
गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्री झेंडाया रेड कार्पेटवर ऑरेंज गाऊनमध्ये फारच सुंदर दिसत होती. तिच्या स्टायलिश लूकने नेहमीप्रमाणेच सर्वांचं लक्ष वेधलं. तिने गळ्यात डायमंड नेकलेस आणि डायमंड रिंग घातली होती. झेंडायाच्या हातातील हिऱ्याची अंगठी या सोहळात सर्वात जास्त चर्चेचा विषय ठरली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, झेंडायाची अंगठी डायमंड ज्वेलरी कंपनी जेसिका मॅककॉर्मॅकने डिझाइन केली आहे आणि तिचे वजन 5.02 कॅरेट आहे. त्याची किंमत अंदाजे 5 लाख डॉलर्स म्हणजेच भारतीय रुपयांमध्ये 4 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.