The Kashmir Files OTT Debut: ‘द कश्मीर फाइल्स’ आता घरबसल्या पाहता येणार! जाणून घ्या कधी आणि कुठे...
The Kashmir Files : ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाची क्रेझ अजूनही कमी झालेली नाही. आता हा चित्रपट प्रेक्षकांना घर बसल्या पाहता येणार आहे.
The Kashmir Files : दिग्दर्शक विवेक रंजन अग्नीहोत्री (Vivek Agnihotri) यांच्या ‘द कश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच कल्ला केला. काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचाराची कहाणी सांगणारा हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची अक्षरशः झुंबड उडाली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमवला होता. अजूनही या चित्रपटाची क्रेझ कमी झालेली नाही. मात्र, आता हा चित्रपट प्रेक्षकांना घर बसल्या पाहता येणार आहे.
बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्यानंतर ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट ‘झी 5’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. 13 मेपासून हा चित्रपट झी5 वर स्ट्रीम होणार आहे. त्यामुळे आता प्रेक्षक घरबसल्या या चित्रपटाचा आनंद घेऊ शकणार आहेत. हिंदीत प्रदर्शित झालेला हा चित्रपट आता तामिळ, तेलुगु, कन्नड आणि अनेक भारतीय भाषांमध्ये पाहता येणार आहे.
चित्रपटाने प्रेक्षकांना रडवलं!
दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींचा हा चित्रपट 11 मार्च रोजी थिएटरमध्ये रिलीज झाला होता. काश्मिरी हिंदूंवर झालेल्या अमानुष छळाचे चित्रण करणारा हा चित्रपट प्रेक्षकांना भावूक करत आहे. या चित्रपटात पल्लवी जोशी (Pallavi Joshi), दर्शन कुमार (Darshan Kumaar), मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraboty), चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandlekar) आणि अनुपम खेर (Anupam Kher) या कलाकारांच्या अभिनयाने रसिकांना अक्षरशः रडवले आहे.
चित्रपटाचं यश महत्त्वाचं!
अवघ्या 14 कोटींच्या बजेटमध्ये बनलेला ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट नव्वदच्या दशकात काश्मीर खोऱ्यातील पंडितांच्या हत्येच्या आणि अमानुष अत्याचारांच्या घटनांचे वर्णन करतो. ‘द काश्मीर फाइल्स’चे घवघवीत यश हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात हे निश्चितच महत्त्वाचे आहे. कारण, कमी बजेट आणि बिग बजेट कलाकार नसतानाही या चित्रपटाने उत्कृष्ट कामगिरी करून दाखवली आहे.
हेही वाचा :
- Laal Singh Chaddha : आमिर खानच्या 'लाल सिंह चड्ढा'वर बंदी घालण्याची मागणी, नेमकी कारणं तरी काय?
- Ankit Tiwari : ‘...त्यांच्यामुळे माझ्या 3 वर्षांच्या मुलीला उपाशी राहावं लागलं’, पंचतारांकित हॉटेलवर संतापला गायक अंकित तिवारी
- Rocky Aur Rani Ki Prem Kahani Release Date : आलिया-रणवीरच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'ची रिलीज डेट जाहीर