Bharti Singh : ‘कॉमेडी क्वीन’ भारती सिंहने चाहत्यांना दाखवली लेकाची पहिली झलक, फोटो शेअर करत म्हणाली...
Bharti Singh : भारती सध्या सकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रित करत आहे. कामातून वेळ मिळताच ती पूर्ण वेळ मुलासोबत घालवते.
Bharti Singh Baby’s Photo : कॉमेडीयन भारती सिंह (Bharti Singh) आणि हर्ष लिंबाचिया (Haarsh Limbachiyaa) हे नुकतेच आई-बाबा झाले आहेत. मुलाच्या जन्मानंतर केवळ 12 दिवसांनी भारती कामावर देखील परतली आहे. त्यामुळे तिला सोशल मीडियावर ट्रोलही व्हावे लागले. यावर उत्तर देताना भारती म्हणाली होती की, ती फक्त सकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रित करत आहे. कामातून वेळ मिळताच ती पूर्ण वेळ मुलासोबत घालवते. भारतीने तिच्या व्लॉगमध्ये सध्याचा दिवसभराचा दिनक्रमही सांगितला आहे. आता भारतीने पहिल्यांदाच इंस्टाग्रामवर मुलाचा फोटो शेअर केला आहे.
या फोटोत भारतीने बाळाची झलक दाखवली असली, तरी त्याचा चेहरा दाखवलेला नाही. भारतीच्या नवजात बाळाला गुंडाळलेले आहे. तिने बाळाला कुशीत घेतले आहे. हा क्युट फोटो भारतीने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोला भारतीने ‘लाईफ लाईन’ असं खास कॅप्शन लिहिले आहे.
पाहा फोटो :
भारती सिंह पहिल्यांदाच मातृत्वाचा आनंद घेत आहे. अद्याप तिने बाळाचा चेहरा चाहत्यांना दाखवलेला नाही. भारतीच्या बाळाचा चेहरा पाहण्यासाठी चाहते खूप आतुर झाले आहेत. बाळाचा चेहरा का दाखवला नाही, याचं कारण सांगताना भारती म्हणाली की, घरातील वडीलधारी मंडळी म्हणतात बाळाचा चेहरा किमान 40 दिवस तरी दाखवत नाहीत, आणि मोठ्यांचं म्हणणं नेहमी ऐकलं पाहिजे. म्हणूनच आम्ही देखील याची वाट पाहत आहोत.
हेही वाचा :
- Laal Singh Chaddha : आमिर खानच्या 'लाल सिंह चड्ढा'वर बंदी घालण्याची मागणी, नेमकी कारणं तरी काय?
- Kshitij Date : ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ सिनेमात एकनाथ शिंदे यांची व्यक्तिरेखा साकारणार क्षितिज दाते
- Rocky Aur Rani Ki Prem Kahani Release Date : आलिया-रणवीरच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'ची रिलीज डेट जाहीर