(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Dhanush : 'फक्त साऊथ अभिनेता नाही, भारतीय अभिनेता म्हणा'; धनुषनं व्यक्त केली नाराजी
धनुषला दाक्षिणात्य चित्रपटांमुळे विशेष लोकप्रियता मिळाली. अनेक जण धनुषला साऊथ अभिनेता म्हणतात, या गोष्टीवर धनुषनं नाराजी व्यक्त केली आहे.
Dhanush Reaction On Calling Him As South Actor : अभिनेता धनुषनं (Dhanush) दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीबरोबरच बॉलिवूडमध्ये देखील काम केलं आहे. धनुष आता हॉलिवूड चित्रपटसृष्टीतमध्ये देखील काम करणार आहे. त्याचा 'द ग्रे मैन' (The Grey Man) हा हॉलिवूड चित्रपट प्रदर्शित होणार आहे. आता धनुषच्या या हॉलिवूड चित्रपटाची वाट प्रेक्षक उत्सुकतेने बघत आहेत. धनुषला दाक्षिणात्य चित्रपटांमुळे विशेष लोकप्रियता मिळाली. अनेक जण धनुषला साऊथ अभिनेता म्हणतात. या गोष्टीवर धनुषनं नाराजी व्यक्त केली आहे.
काय म्हणाला धनुष?
धनुष सध्या 'द ग्रे मैन' या त्याच्या हॉलिवूड चित्रपटाचे प्रमोशन करत आहे. प्रमोशन दरम्यान धनुषला साऊथ अभिनेता असं संबोधण्यात आलं. त्यावेळी धनुषनं नाराजी व्यक्त केली. यावेळी धनुषनं सांगितलं की, 'त्याला साऊथ अभिनेता असं म्हणण्यापेक्षा भारतीय अभिनेता म्हणा.' पुढे धनुष म्हणाला की, 'फक्त साऊथ किंवा नॉर्थ अभिनेता म्हणण्यापेक्षा भारतीय अभिनेता म्हटलं पाहिजे. आता जग बदलत आहे. आता कोणत्याही सीमा नाहीयेत. सर्वांनी एकत्र यायची आणि मोठी इंडस्ट्री तयार करायची वेळ आता आली आहे. आपण एकत्र आलो तर खूप चांगलं काम करु शकतो. '
धनुषचा 'द ग्रे मॅन' हा चित्रपट नेटफ्लिक्सवर 22 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा प्रीमिअर शो हा 21 जुलै रोजी संध्याकाळी मुंबईमध्ये पार पडला. प्रीमिअरला बॉलिवूडबरोबरच काही हॉलिवूड कलाकारांनी देखील हजेरी लावली होती. विक्की कौशल, रणदीप हुड्डा हे कलाकार प्रीमिअरला उपस्थित होते. प्रीमिअर वेळी धनुषनं केलेल्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
धनुषचे पूर्ण नाव व्यंकटेश प्रभू कस्तुरी राजा आहे. अभिनेता असण्यासोबतच तो निर्माता, दिग्दर्शक आणि पार्श्वगायक देखील आहे. त्यानं 46 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे.ऐश्वर्या आणि धनुष 2004 साली लग्नबंधनात अडकले होते. तसेच त्यांना दोन मुले आहेत. धनुष आणि ऐश्वर्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्यांनी घटस्फोटाबाबत माहिली दिली होती.
हेही वाचा: