(Source: ECI/ABP News/ABP Majha)
The Godfather : ...असा चित्रपट ज्यानं इतिहास रचला; 'द गॉडफादर' ची 50 वर्ष
The Godfather : 'द गॉडफादर' या चित्रपटाला 50 वर्ष पूर्ण झाली आहेत.
The Godfather : रिलीज झाल्यानंतर फक्त सात चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होऊन इतिहास रचणारा चित्रपट म्हणजे 'द गॉडफादर' (The Godfather). हा चित्रपट लोक आजही आवडीनं पाहतात. 'द गॉडडफादर' चित्रपट हा मार्च 1972 मध्ये रिलीज झाला. या चित्रपटाला प्रदर्शित होऊन 50 वर्ष झाली. फ्रांसिस फोर्ड कोपोला (Francis Ford Coppola) यांच्या या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या चित्रपटाला अमेरिकन फिल्म इंस्टिट्यूटनं 'वन ऑफ द बेस्ट अमेरिकन फिल्म्स एवर मेड' असं संबोधलं.
जेव्हा द गॉडफादर हा चित्रपट रिलीज झाला तेव्हा त्यानं बॉक्स ऑफिसर धुमाकूळ घातला होता. या चित्रपटानं 1972 मध्ये चित्रपटसृष्टीच्या सर्वात जास्त कमाई करून इतिहास रचला. या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली म्हणून 1974 आणि 1990 मध्ये या चित्रपटाचे दोन सिक्वेल रिलीज करण्यात आले. चित्रपटाला ऑस्कर पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं आहे. या चित्रपटाचे कथानरक मरियो पुजो यांच्या 'द गॉडफादर' कादंबरीवर आधारित आहे.
Released on this day 50 years ago (14 March, 1972):
— World Cinema 🎬 (@WorldCinemania) March 14, 2022
'The Godfather'
Directed by Francis Ford Coppola pic.twitter.com/XBK4Qqo7CG
'द गॉडफादर' चित्रपटाचे खथानक 1945 ते 1955 दरम्यान न्यूयॉर्कमध्ये राहणाऱ्या एका डॉनच्या आयुष्यावर आधारित आहे. वीटो कोरलियॉन (मार्लन ब्रांडो) हा या कुटुंबाचा प्रमुख आहे. ज्याला लोक 'गॉडफादर' म्हणतात. या चित्रपटाला गँगस्टर चित्रपटांचा 'बादशाह' देखील म्हणलं जातं. जेव्हा या चित्रपटाचा रिमेक रिलीज झाला तेव्हा त्यामध्ये सर्व भूमिका या ग्रे- शेडमध्ये दाखवण्यात आल्या.
संबंधित बातम्या
- Bollywood Films : मोंदीच्या काळात विरोधी पक्षांवर टीका करणारे 'हे' सिनेमे झाले प्रदर्शित
- Mishan Impossible : तापसी पन्नूच्या 'मिशन इम्पॉसिबल' सिनेमाचा ट्रेलर आऊट
- Top Gun Maverick : 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये टॉम क्रूझच्या 'Top Gun Maverick' सिनेमाचा होणार प्रीमिअर
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha