Bollywood Films : मोदींच्या काळात विरोधी पक्षांवर टीका करणारे 'हे' सिनेमे झाले प्रदर्शित
Movies : विरोधी पक्षांवर टीका करणारे अनेक सिनेमे मोदी सरकारच्या काळात प्रदर्शित झाले आहेत.
Bollywood : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने आता अनेक बिग बजेट सिनेमे प्रदर्शित होत आहेत. हे सिनेमे बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत असून सिनेमागृहांबाहेर हाऊसफुल्लचे बोर्ड झळकत आहेत. सोशल मीडियावर सध्या 'द काश्मीर फाइल्स' हा सिनेमा चर्चेत आहे. भाजपशासित राज्यांमध्ये हा सिनेमा करमुक्त करण्यात आला आहे. विरोधी पक्षांवर टीका करणारे अनेक सिनेमे मोदी सरकारच्या काळात प्रदर्शित झाले आहेत. यात 'द अॅक्सिडेन्टल प्राइम मिनिस्टर'पासून 'आर्टिकल 15' पर्यंत अनेक सिनेमांचा समावेश आहे.
'द अॅक्सिडेन्टल प्राइम मिनिस्टर' (The Accidental Prime Minister) : 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी 'द अॅक्सिडेन्टल प्राइम मिनिस्टर' हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. संजय बारू यांच्या पुस्तकावर आधारित हा सिनेमा आहे. अनुपम खेर या सिनेमात मुख्य भूमिकेत होते. विजय गुट्टे यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे.
बाटला हाऊस (Batla House) : बाटला हाऊस या सिनेमाचे दिग्दर्शन निखिल आडवाणी यांनी केले आहे. 13 सप्टेंबर 2008 रोजी दिल्लीत साखळी बॉम्बस्फोट झाला होता. यात 39 लोकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर 19 सप्टेंबर रोजी
पोलिसांना बाटला हाऊसमध्ये दहशतवादी लोक लपल्याची माहिती मिळाली. 15 ऑगस्ट 2019 रोजी प्रदर्शित झालेल्या या सिनेमात जॉन अब्राहम, मृणाल ठाकूर, नोरा फतेही मुख्य भूमिकेत होते.
आर्टिकल 15 (Article 15) : 'आर्टिकल 15' या सिनेमाचे दिग्दर्शन अनुभव सिन्हा यांनी केले आहे. या सिनेमात आयुष्मान खुराना पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळाला होता. जातीपातीच्या राजकारणावर भाष्य करणारा हा सिनेमा आहे.
पीएम नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) : पीएम नरेंद्र मोदी हा सिनेमा 2019 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. उमंग कुमारने या सिनेमाचे दिग्दर्शन केले होते. 2019 च्या लोकसभा निवडणुकीनंतर 'पंतप्रधान नरेंद्र मोदी' यांचा बायोपिक सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता. या सिनेमात अभिनेता विवेक ओबेरॉयने मोदींची भूमिका साकारली होती. या सिनेमाला कॉंग्रेसने कडाडून विरोध केला होता.
संबंधित बातम्या
Viju Mane : कुठे चाललो आहोत आपण? विजू मानेंनी सिनेप्रेक्षकांवर साधला निशाणा
Chinmay Mandlekar : काश्मिरी पंडितांना बेघर करणारा क्रूर बिट्टा कराटे, चिन्मय मांडलेकरने साकारलेले पात्र पाहून अंगावर येतील शहारे!
Me Vasantrao : माझं घराणं माझ्यापासूनच सुरू होतं! 'मी वसंतराव'चा ट्रेलर प्रदर्शित
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha