Top Gun Maverick : 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये टॉम क्रूझच्या 'Top Gun Maverick' सिनेमाचा होणार प्रीमिअर
Top Gun Maverick : कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये टॉम क्रूझच्या 'टॉप गन: मॅव्हरिक' सिनेमाचा प्रीमिअर होणार आहे.
Top Gun Maverick : टॉम क्रूझच्या (Tom Cruise)'टॉप गन मॅव्हरिक' (Top Gun Maverick) सिनेमाचा कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रीमिअर होणार आहे. कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये कोणत्याही सिनेमाचा प्रीमिअर केला जात नाही. पण यंदाच्या फेस्टिव्हलमध्ये 'टॉप गन: मॅव्हरिक' सिनेमाचा प्रीमिअर होणार, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
यंदाचा कान्स फिल्म फेस्टिव्हल 17 ते 28 मे दरम्यान होणार आहे.'टॉप गन मॅव्हरिक' सिनेमात क्रूझ मुख्य भूमिकेत असणार आहे. 27 मे रोजी अमेरिकेत या सिनेमाचा प्रीमिअर होणार आहे. 'टॉप गन मॅव्हरिक' सिनेमात जेनिफर कॉनेली, जॉन हॅम, ग्लेन पॉवेल, लुईस पुलमन, डॅनी रामिरेझ, मोनिका बार्बरो, एड हॅरिस आणि व्हॅल किल्मर मुख्य भूमिकेत आहे.
View this post on Instagram
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली होती. 2019 मध्ये या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. सिनेप्रेक्षक या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या सिनेमाचा प्रीमिअर होणार असल्याने यंदाचा कान्स फिल्म फेस्टिव्हल खास असणार आहे.
संबंधित बातम्या
Bollywood Films : मोंदीच्या काळात विरोधी पक्षांवर टीका करणारे 'हे' सिनेमे झाले प्रदर्शित
Viju Mane : कुठे चाललो आहोत आपण? विजू मानेंनी सिनेप्रेक्षकांवर साधला निशाणा
Chinmay Mandlekar : काश्मिरी पंडितांना बेघर करणारा क्रूर बिट्टा कराटे, चिन्मय मांडलेकरने साकारलेले पात्र पाहून अंगावर येतील शहारे!
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)