(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Star Pravah : स्टार प्रवाह वाहिनीचा अभिनव उपक्रम; ठाणे तलावपाली येथे आधुनिक तंत्राच्या माध्यमातून प्रेक्षकांना घडवलं अष्टविनायक दर्शन
यंदा ठाणे येथील तलावपाली येथे मेश या आधुनिक तंत्राच्या माध्यमातून स्टार प्रवाह वाहिनीने अष्टविनायकाचं दर्शन घडवून आणलं.
Star Pravah : महाराष्ट्राची नंबर वन वाहिनी स्टार प्रवाहवरील (Star Pravah) सर्वच कार्यक्रम प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. मनोरंजनाचा प्रवाह घराघरात पोहोचवणारी महाराष्ट्राची लोकप्रिय वाहिनी वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांद्वारे देखिल प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असते. कोविड काळात पडद्यामागे काम करणाऱ्या तंत्रज्ञांच्या घरी बाप्पाची मूर्ती घरपोच करणं असू दे वा मुंबई (Mumbai) पोलिसांना भव्यदिव्य वाळूशिल्पाच्या माध्यमातून शुभेच्छा देणं असू दे. स्टार प्रवाह वाहिनीने वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला आहे.
यंदा ठाणे येथील तलावपाली येथे मेश या आधुनिक तंत्राच्या माध्यमातून स्टार प्रवाह वाहिनीने अष्टविनायकाचं दर्शन घडवून आणलं. गणपती बाप्पाच्या आगमनासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. मात्र स्टार प्रवाह वाहिनीच्या या अनोख्या प्रयत्त्नातून गणेशोत्सवाच्या आधीच अष्टविनायकाचं दर्शन प्रेक्षकांना घडलं.
लहानांपासून ते अगदी मोठ्यापर्यंत प्रत्येकानेच या अनोख्या संकल्पनेचं भरभरुन कौतुक केलं आणि बाप्पाचं दर्शनही घेतलं. या उपक्रमाप्रमाणेच रविवार 28 ऑगस्टला स्टार प्रवाह परिवार गणेशोत्सव 2022 मध्येही स्टार प्रवाह परिवार नृत्य आणि कथेच्या माध्यमातून अष्टविनायकाचं दर्शन घडवणार आहे. तेव्हा हा गणपती विशेष कार्यक्रम नक्की पाहा. 28 ऑगस्टला दुपारी 12 वाजता.
स्टार प्रवाह परिवारातले 100 कलाकार एकत्र येऊन साजरा करणार कलेच्या दैवताचा उत्सव
स्टार प्रवाह परिवार गणेशोत्सव 2022 या गणपती विशेष कार्यक्रमात यंदा अष्टविनायकाचा गजर होणार आहे. स्टार प्रवाह परिवारातील 100 कलाकार एकत्र येऊन अष्टविनायकाच्या कधीही न ऐकलेल्या कथा नृत्य आणि गोष्टीच्या माध्यमातून सादर करतील. आजीच्या गोष्टी ऐकत आपण लहानाचे मोठे झालो. हे मंतरलेले दिवस या गणपती विशेष कार्यक्रमाच्या निमित्ताने पुन्हा अनुभवता येतील. स्टार प्रवाह परिवारातल्या बच्चेकंपनीला अष्टविनायकाच्या या कथा आजीच्या तोंडून ऐकायला मिळणार आहेत. मराठी टेलिव्हिजन विश्वात असा प्रयोग पहिल्यांदाच होणार आहे.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या:
- Star Pravah : स्टार प्रवाह परिवारातले 100 कलाकार एकत्र येऊन साजरा करणार कलेच्या दैवताचा उत्सव; होणार गजर अष्टविनायकाचा
- Appi Amchi Collector : कलेक्टर अप्पीची मोठी शान! अभिनेत्री शिवानीच्या ढोल वादनाने वेधले साऱ्यांचे लक्ष्य
- Drishyam 3 : अभिनेते मोहनलाल यांच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; निर्माते अँटोनी पेरुम्बावूर यांच्याकडून 'दृश्यम 3' ची घोषणा