Star Pravah : स्टार प्रवाह परिवारातले 100 कलाकार एकत्र येऊन साजरा करणार कलेच्या दैवताचा उत्सव; होणार गजर अष्टविनायकाचा
Star Pravah : स्टार प्रवाह परिवारातील 100 कलाकार एकत्र येऊन अष्टविनायकाच्या कधीही न ऐकलेल्या कथा नृत्य आणि गोष्टीच्या माध्यमातून सादर करतील.
Star Pravah : गणपती बाप्पा हे आपल्या सर्वांचच लाडकं दैवत. गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या म्हणत आपण वर्षभर बाप्पाच्या आगमनाकडे डोळे लावून बसलेले असतो. भक्तीमय वातावरणाने भारावून टाकणारे हे 10 दिवस वर्षभर पुरेल इतकी ऊर्जा आणि नवचैतन्य देऊन जातात. बाप्पाच्या आगमनासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. लाडक्या बाप्पाचा हा उत्सव जल्लोषात साजरा करण्यासाठी स्टार प्रवाहचा परिवार सज्ज आहे. स्टार प्रवाह परिवार गणेशोत्सव 2022 या गणपती विशेष कार्यक्रमात यंदा अष्टविनायकाचा गजर होणार आहे. स्टार प्रवाह परिवारातील 100 कलाकार एकत्र येऊन अष्टविनायकाच्या कधीही न ऐकलेल्या कथा नृत्य आणि गोष्टीच्या माध्यमातून सादर करतील. आजीच्या गोष्टी ऐकत आपण लहानाचे मोठे झालो. हे मंतरलेले दिवस या गणपती विशेष कार्यक्रमाच्या निमित्ताने पुन्हा अनुभवता येतील. स्टार प्रवाह परिवारातल्या बच्चेकंपनीला अष्टविनायकाच्या या कथा आजीच्या तोंडून ऐकायला मिळणार आहेत. मराठी टेलिव्हिजन विश्वात असा प्रयोग पहिल्यांदाच होणार आहे.
स्टार प्रवाह वाहिनीने मराठी परंपरा मराठी प्रवाह हे ब्रीदवाक्य प्रत्येक कार्यक्रमातून जपलं आहे. त्यामुळे गजर अष्टविनायकाचा हा कार्यक्रम देखिल पुन्हा एकदा मराठी परंपरेचं दर्शन घडवेल. या कार्यक्रमात गणपतीच्या आवडीच्या पाच गोष्टींवर आधारित एक खास गाणं देखिल बनवण्यात आलं आहे. मी होणार सुपरस्टार आवाज कुणाचा महाराष्ट्राचा मधील स्पर्धकांच्या आवाजाने हे गाणं नटलं आहे. अष्टविनायकाच्या कथांसोबतच सुप्रसिद्ध युवा कीर्तनकार शिवलीला पाटील यांच्या कीर्तनाचा आस्वादही प्रेक्षकांना घेता येणार आहे. त्यासोबतच नंदेश उमप यांनी सादर केलेला लोककलेचा जागर या कार्यक्रमाची रंगत आणखी वाढवेल.
स्टार प्रवाह परिवाराचा गणपती असल्यामुळे या परिवाराचा अतिशय महत्त्वाचा भाग असणाऱ्या प्रेक्षकांना या कार्यक्रमाचं खास निमंत्रण आहे. रविवार 28 ऑगस्टला दुपारी 12-- वाजल्यापासून प्रेक्षकांना या कार्यक्रमाचा आस्वाद घरबसल्या घेता येईल. तेव्हा पाहायला विसरु नका रविवार 28 ऑगस्टला दुपारी 12 वाजल्यापासून स्टार प्रवाह परिवार गणशोत्सव 2022.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या:
- Entertainment News Live Updates 20 August : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!
- 'मराठी बिग बॉस' गाजवल्यानंतर विशाल निकम नव्या अवतारात दिसणार, अल्बम ‘तू संग मेरे’मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार!